दिवाळीत बक्कळ कमाईची संधी! ( सौजन्य - Pinterest)
सणासुदीच्या काळात घराची सजावट करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक आणि रंगीबेरंगी मेणबत्त्यांना मोठी मागणी असते.
अवघ्या १० ते १५ हजार रुपयांच्या भांडवलात घरच्या घरी सुवासिक आणि डिझायनर मेणबत्त्या बनवण्याचा व्यवसाय सुरू करता येतो.
मेणबत्त्या तयार करण्यासाठी मेण, विक्षेपक वाती, विविध प्रकारचे साचे आणि रंग-सुगंधाचा वापर केला जातो.
आकर्षक पॅकेजिंग करून तयार केलेल्या मेणबत्त्या दिवाळीत भेटवस्तू म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय ठरतात.
योग्य मार्केटिंग आणि सोशल मीडियाच्या मदतीने लहान व्यावसायिक स्थानिक बाजारात आपल्या उत्पादनांची विक्री करून चांगला नफा कमावू शकतात.