धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? ( सौजन्य -Pinterest )
जेव्हा तुम्ही हिऱ्याची अंगठी, नेकलेस किंवा कानातले खरेदी करताना डायमंड ग्रेडिंग रिपोर्टची विनंती करणे महत्त्वाचे आहे.
सोन्याचे दागिने खरेदी करताना, केवळ त्याच्या चमक किंवा डिझाइन पाहणं पुरेसे नाही. ग्राहकांनी दागिन्यांवर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BIS चा हॉलमार्क, शुद्धता चिन्ह आणि सहा-अंकी HUID कोड आहे की नाही हे तपासणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
दागिन्यांच्या किमतीमध्ये सोन्याचे वजन, वापरलेल्या खड्यांची किंमत, घडणावळीचे शुल्क आणि त्यावरील टॅक्स यांचा समावेश असणार आहे. म्हणून, दुकानदाराकडून किमतीचा संपूर्ण तपशील विचारून आणि वेगवेगळ्या सराफांच्या ऑफर्सची तुलना करणं आवश्यक आहे.
धनतेरसच्या शुभ मुहूर्तांमुळे आणि मर्यादित कालावधीच्या ऑफर्समुळे ग्राहक घाईघाईने निर्णय घेण्याची चुक करतात. पण महागडे दागिने खरेदी करताना गुणवत्ता आणि प्रमाणपत्रांना तितकंच महत्त्व देणं फार महत्त्वाचं आहे.
दुकानदाराला वापरलेल्या रत्नांबद्दल, त्यांच्या गुणवत्तेबद्दल आणि त्यांच्यावर काही प्रक्रिया केली आहे का याबद्दल विचारा. ही सर्व माहिती लेखी स्वरूपात असणे उत्तम. यामुळे ग्राहकांना दागिन्यांची खरी रचना आणि मूल्य समजण्यास मदत होते.