Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Low Investment Diwali Business : दिवाळीत बक्कळ कमाईची संधी! फक्त 10 हजार रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, बाजारात मोठी मागणी

Low Investment Diwali Business : दीपावलीच्या सणासुदीच्या काळात घराघरांमध्ये दिव्यांसोबतच डिझायनर आणि सुवासिक मेणबत्त्यांना प्रचंड मागणी असते. अशातच जर तुम्ही कमी खर्चात चांगला व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर कमी भांडवलात मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करून तुफान कमाई करू शकता.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 25, 2026 | 03:26 PM
दिवाळीत बक्कळ कमाईची संधी! ( सौजन्य - सोशल मीडिया )

दिवाळीत बक्कळ कमाईची संधी! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीत बक्कळ कमाईची संधी!
  • फक्त 10 हजार रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय
  • बाजारात आहे मोठी मागणी
Low Investment Diwali Business : दिवाळीचा सण सगळीकडे आनंद घेऊन येतो. सगळीकडे रंगीबेरंगी सजावट आणि सगळीकडे प्रकाशमय वातावरण असतं. सणांच्या काळात बाजारात सजावटीच्या वस्तूंची मागणीही वाढते. हाच काळ व्यवसाय सुरु करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक मोठी संधी घेऊन येतो. दिवाळीच्या काळात कमी गुंतवणूकीमध्ये तुम्ही व्यवसाय सुरु करु शकता. ( Low Investment Diwali Business ) 

ITR Filing : टेन्शन दूर! आयटीआर फाईलिंगची तारीख पुढे ढकलली; पण ‘ही’ चूक करु नकात, नाहीतर खिशाला बसेल मोठा फटका

जर तुम्हीही कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा एक उत्तम पर्याय असू शकतो. मुख्य म्हणजे हा व्यवसाय तुम्ही घरातून सुरु करु शकता. सुरुवातीला हा व्यवसाय 10000 ते 15000 च्या गुंतवणुकीत सुरु करता येतो. पण तुमची कमाई तुम्ही किती वस्तू विकता आणि तो बनवण्यासाठी किती खर्च येतो या गोष्टींवरही अवलंबून असतो.

दिवाळीत मेणबत्त्यांची मोठी मागणी

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. त्यामुळे लोकं आपली घरं, दुकानं आणि ऑफिस सजवण्यासाठी विविध प्रकारच्या मेणबत्या खरेदी करतात. रंगीबेरंगी, डिझायनर आणि सुगंधी मेणबत्त्यांचे बरेच प्रकार बाजारात लोकप्रिय आहेत. पण या अशा मेणबत्त्यांची मागणी फक्त दिवाळीपुरते मर्यादित नाही. त्यांचा उपयोग वेगवेगळ्या सेलिब्रेशनसाठी केल्या जातात. वाढदिवसाच्या पार्ट्या असोत लग्न असो किंवा धार्मिक विधी अगदी भेटवस्तू देण्यासाठी देखील या मेणबत्त्यांचा वापर केला जातो.
छोटे व्यावसायिक सणासुदीच्या काळातही स्थानिक बाजारपेठांमध्ये आपल्या मेणबत्त्या विकू शकतात. उत्पादनाची रचना आणि पॅकेजिंग चांगले असल्यास, त्या भेटवस्तू म्हणूनही बनवता येतात.

10000 मध्ये असा सुरु करा व्यवसाय?

या व्यवसायासाठी सुरुवातीला महागडी यंत्रांची अजिबात गरज नाही. लहान प्रमाणावर, साच्यांचा वापर करून हाताने मेणबत्त्या बनवता येतात.

सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल:
मेण: मेणबत्त्या बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल.
वाती आणि धागा: मेणबत्त्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाती.
साचे: विविध आकार आणि डिझाइनच्या मेणबत्त्या तयार करण्यासाठी.
रंग आणि सुगंध: सजावटीच्या आणि सुगंधी मेणबत्त्या तयार करण्यासाठी.
पॅकेजिंग: तयार उत्पादनाची सुरक्षित आणि आकर्षक विक्री करण्यासाठी

कसं करणार मार्केटिंग?

स्थानिक बाजारातून किंवा ऑनलाइन माल खरेदी करत रहा. सुरुवातीला, बाजारातील ग्राहकांच्या पसंतीची कल्पना येण्यासाठी मर्यादित संख्येत आणि कमी प्रमाणात डिझाइन तयार करणे कधीही चांगलं असतं. व्यवसाय सुरू केल्यानंतर सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहोचणे. यासाठी, तुम्ही स्थानिक दुकाने, घाऊक विक्रेते किंवा सोशल मीडियाद्वारे विक्री करू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही नेहमीच्या मेणबत्त्यांसोबत सुगंधी, रंगीत आणि सजावटीच्या मेणबत्त्यांचा संग्रह तयार करू शकता. त्यांच्या किमती डिझाइन, आकार, माहितीपत्रक आणि पॅकेजिंगच्या आधारावर ठरवल्या जाऊ शकतात.

किती मिळेल नफा?

मेणबत्ती व्यवसायाच्या उत्पन्नासाठी कोणताही निश्चित आकडा नाही. नफा मोजण्यासाठी, तुम्हाला कच्चा माल, पॅकेजिंग, वजन, वाहतूक, विक्री आणि उत्पादनावरील अतिरिक्त खर्च विचारात घ्यावे लागतील. उदाहरणार्थ, जर एका बॅचच्या उत्पादन आणि विक्रीचा एकूण खर्च ₹ ५,००० असेल आणि तिसरी बॅच ₹ ८,००० ला विकली गेली, तर खर्च वजा केल्यावर तुमच्याकडे ₹ ३,००० शिल्लक राहतील. याचा अर्थ तुम्हाला ₹ ३,००० चा नफा मिळेल. पावसाळ्यात विक्री करण्यासाठी वेगळं मार्केटिंग स्टॅटर्जी वापरल्यास विक्री वाढू शकते. त्यामुळे तुमची कमाई देखील वाढू शकते.

Share Market Outlook : शेअर बाजारात पुढच्या आठवड्यात मोठी हालचाल? गुंतवणूकदारांनो, गुंतवणुकीपूर्वी ‘या’ फॅक्टर्सकडे लक्ष ठेवा

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोमबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज असते?

    Ans: हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रामुख्याने पॅराफिन वॅक्स म्हणजे मेण, वाती आणि धागा, Fragrance Oils, सिलिकॉन मोल्ड्स आणि मेण वितळवण्यासाठी एक भांडे एवढ्या साहित्याची आवश्यकता असते.

  • Que: अवघ्या १०,००० रुपयांच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय कसा सुरू करता येईल?

    Ans: सुरुवातीला व्यावसायिक यंत्रसामग्री न घेता मॅन्युअल मोल्ड्स आणि कच्चा माल घाऊक बाजारातून खरेदी करून तुम्ही घरच्या घरीच सुवासिक व डिझायनर मेणबत्त्या बनवण्याचे काम सुरू करू शकता.

  • Que: दिवाळीच्या काळात या व्यवसायातून किती नफा कमावता येऊ शकतो?

    Ans: दिवाळीत आकर्षक आणि सुवासिक मेणबत्त्यांना प्रचंड मागणी असते. उत्पादनाच्या किंमतीच्या तुलनेत बाजारात या मेणबत्त्या दुप्पट ते तिप्पट किमतीत विकल्या जातात, ज्यामुळे अवघ्या काही दिवसांत दुप्पट ते तिप्पट नफा मिळू शकतो.

Web Title: Diwali business idea candle making startup low investment profit marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Business Idea
  • Diwali
  • Investments

संबंधित बातम्या

Dhanteras Gold : धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या
1

Dhanteras Gold : धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या

Dhanteras Gold : धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? त्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या ‘या’ गोष्टी आणि नियम
2

Dhanteras Gold : धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? त्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या ‘या’ गोष्टी आणि नियम

Avadhut Sathe : Trading च्या नावाखाली फसवणूक? विना नोंदणी क्लास; अवधुत साठेंना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश
3

Avadhut Sathe : Trading च्या नावाखाली फसवणूक? विना नोंदणी क्लास; अवधुत साठेंना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश

Diwali Firecracker Rules: वेळीच सावध व्हा! रस्त्यावर फटाके फोडाल तर होणार कारवाई, विदेशी फटाक्यांच्या विक्रीलाही मनाई, जाणून घ्या
4

Diwali Firecracker Rules: वेळीच सावध व्हा! रस्त्यावर फटाके फोडाल तर होणार कारवाई, विदेशी फटाक्यांच्या विक्रीलाही मनाई, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.