
हाऊसिंग डॉटकॉमचा १५ नवीन शहरांत धमाका! संभाजीनगरसह टियर-२ शहरांमध्ये आता घर शोधणे होणार सोपे (Photo Credit- X)
मुंबई, २३ जानेवारी २०२६: हाऊसिंग डॉटकॉम या भारताच्या आघाडीच्या रियल इस्टेट अॅपने देशभरातील उच्च-क्षमता असलेल्या १५ टियर २ शहरांमध्ये धोरणात्मक विस्तार केल्याचे आज जाहीर केले. या धोरणाचे लक्ष्य झपाट्याने वाढत असलेल्या निवासी बाजारपेठांमध्ये हाऊसिंग डॉटकॉमची उपस्थिती सखोल करण्याचे आणि महानगरांच्या पलीकडे टियर २ शहरात राहणाऱ्या आणि घर खरेदी करू इच्छिणाऱ्या लक्षावधी लोकांपर्यंत एक सुव्यवस्थित, डिजिटल-फर्स्ट रियल इस्टेट शोध पोहोचवण्याचे आहे.
या नवीन लॉन्च झालेल्या बाजारपेठांमध्ये आग्रा, संभाजीनगर, जबलपूर, जोधपूर, कानपूर, लुधियाना, मदुरई, मंगळूर, मथुरा, म्हैसूर, रांची, त्रिची, उदयपूर, वापी आणि विजायवाडा यांचा समावेश आहे. या विस्तारासह, हाऊसिंग डॉटकॉम आता आणखी जास्त शहरांमधील लोकांना स्थानिक मालमत्तांचा शोध, सत्यापित यादी आणि डेटा-आधारित इनसाइट्स तसेच पडवडण्याजोग्या आणि त्यांना हव्या त्या ठिकाणी घरांचे पर्याय शोधण्याची सहज पोहोच प्रदान करू शकेल.
गेल्या काही वर्षांत, टियर २ शहरे भारतीय रियल इस्टेटसाठी महत्त्वपूर्ण विकासाची कॉरिडोर म्हणून उदयास आली आहेत. येथील इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढती गुंतवणूक, सुधारित कनेक्टिव्हिटी, औद्योगिक क्लस्टर्सचा विस्तार आणि तुलनेत मालमत्तेच्या कमी किंमती यामुळे येथील बाजारपेठांमध्ये घरांसाठी मोठी मागणी निर्माण झाली आहे. त्याच वेळी, छोट्या शहरांमधील उपभोक्ते मालमत्तेचा शोध आणि निर्णय घेण्यासाठी झपाट्याने ऑनलाइन मार्ग अंगिकारत आहेत, ज्यामुळे विश्वसनीय डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे.
हा विस्तार राष्ट्रीय पातळीवर घर खरेदी करण्याच्या, विकण्याच्या आणि भाड्याने देण्या-घेण्याच्या प्रक्रियेस सुलभ बनवण्याबाबत हाऊसिंग डॉटकॉम ची वचनबद्धता अधोरेखित करतो. हा प्लॅटफॉर्म या शहरांतील विकासक, ब्रोकर आणि घरमालक यांच्यासोबत काम करून एक पारदर्शक आणि कार्यक्षम ऑनलाइन मार्केटप्लेस उभारण्याचा प्रयत्न करेल. एक असे मार्केटप्लेस ज्यातून स्थानिक मार्केटच्या वास्तविकता प्रतिबिंबित होतील तर दुसरीकडे ते उत्पादन टेक्नॉलॉजी आणि यूझर अनुभव या बाबतीत जागतिक मानके सांभाळेल.
प्रस्तुत घोषणेविषयी टिप्पणी करताना आरईए इंडिया (हाऊसिंग डॉटकॉम) चे सीईओ श्री. प्रवीण शर्मा म्हणाले, “भारतातील निवासी विकासाचा पुढचा टप्पा मोठ्या महानगरांच्या पलीकडे लिहिला जाणार आहे. उभरत्या शहरांतील घर खरेदीदार ऑनलाइन मालमत्तांचा शोध घेताना सोय, विश्वसनीयता आणि पर्याय यांना प्राधान्य देत आहेत. १५ टियर २ शहरांत विस्तार करून हाऊसिंग डॉटकॉम रियल इस्टेटच्या शोधासाठी एक अधिक समावेशक डिजिटल ईकोसिस्टम उभी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. उपभोक्त्यांना दर्जेदार लिस्टिंगची पोहोच मिळवून देण्यात आणि त्यांना आत्मविश्वासाने माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे.”
हाऊसिंग डॉटकॉमची मालक आणि संचालक आरईए इंडिया प्रा. लि. टेक्नॉलॉजी, डेटा प्लॅटफॉर्म्स यामध्ये शाश्वत गुंतवणूक करून आणि मार्केट विस्ताराच्या माध्यमातून भारताच्या डिजिटल रियल इस्टेट ईकोसिस्टमला सशक्त करत आहे. हा उपक्रम एक स्केलेबल, टेक-सक्षम उपभोक्ता सोल्यूशन्स तयार करण्याच्या कंपनीच्या दीर्घकालीन धोरणाशी सुसंगत आहे- अशी सोल्यूशन्स जी ऑनलाइन मालमत्ता शोध आणि ऑफलाइन व्यवहार यांची बेमालूम सांगड घालतात.