रिलायन्स इंडस्ट्रीजकडून महाराष्ट्रात सरकारी बांधकाम कंपनीचे अधिग्रहण; 1,628 कोटींना झालाय व्यवहार
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी हे केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याची एकूण संपत्ती अंदाजे 116 अब्ज डॉलर इतकी आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, ते सध्या जगातील 12 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्यानंतर या यादीत 104 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र, तुम्ही कधी विचार केलाय का? की, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी दररोज किती रुपये कमावतात? आज आपण याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत…
किती घेतात मासिक पगार
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीचा अंदाज अशा प्रकारे लावला जाऊ शकतो की, एखाद्या भारतीयाने जर दरवर्षी 4 लाख रुपये कमावले तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चेअरमन असलेल्या मुकेश अंबानी यांच्या सध्याच्या संपत्तीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 1.74 कोटी वर्षे लागतील. जे जवळजवळ अशक्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी दरवर्षी सुमारे 15 कोटी रुपये पगार घेत होते.
दररोज कमावतात 163 कोटी रुपये
मात्र, कोरोनानंतर त्यांनी कंपनीकडून कोणताही पगार घेतलेला नाही. असे असूनही ते दररोज 163 कोटी रुपये कमावत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजमधील त्यांच्या शेअर होल्डिंगमधून हा पैसा त्यांच्याकडे आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने पेट्रोकेमिकल, तेल, दूरसंचार, रिटेल यासह अनेक क्षेत्रात व्यवसाय पसरवला आहे. याशिवाय त्यांनी मुंबईतील अँटिलिया घरासह रिअल इस्टेटमध्ये अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. अँटिलियाची किंमत अंदाजे 15 हजार कोटी रुपये आहे.
मुलाच्या लग्नासाठी ५००० कोटींचा खर्च
2020 पर्यंत मुकेश अंबानी हे प्रत्येक तासाला 90 कोटी रुपये कमावत होते. दुसरीकडे, भारतातील सुमारे 24 टक्के लोक दरमहा केवळ 3000 रुपये कमवू शकतात. अंबानी कुटुंबाचे घरगुती कार्यक्रम देखील त्यांच्या श्रीमंतीनुसार असतात. या वर्षी त्यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नावर सुमारे ५००० कोटी रुपये खर्च करून, जगभरात चर्चेत राहिले आहे. या लग्नाचे लग्नाआधीचे आणि लग्नानंतरचे कार्यक्रमही चर्चेत होते. याशिवाय त्यांनी सुमारे 1000 कोटी रुपयांच्या बोईंग 737 मॅक्सचाही त्यांच्या ताफ्यात समावेश केला होता.