
Mukesh Ambani's big leap Received special discount from US government for Russian oil
US sanction waiver for Reliance Industries Russian oil : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी (RIL) जागतिक स्तरावरून एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकन सरकारने रिलायन्सला रशियन तेल आयातीबाबत एका महिन्याची विशेष सवलत (Waiver) दिली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिकेने रशियन तेल कंपन्यांवर कडक निर्बंध लादले असतानाही, रिलायन्सला (Reliance) मिळालेली ही सवलत भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी आणि अंबानींच्या व्यवसायासाठी मोठा विजय मानला जात आहे.
अमेरिकेने रशियाच्या ‘रोझनेफ्ट’ (Rosneft) आणि ‘लुकोइल’ (Lukoil) यांसारख्या प्रमुख ऊर्जा कंपन्यांवर निर्बंध लादले होते. या कंपन्यांसोबतचे सर्व व्यवहार पूर्ण करण्यासाठी अमेरिकन ट्रेझरीने २१ नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. मात्र, रिलायन्सची गरज आणि त्यांचे अमेरिकेशी असलेले व्यावसायिक संबंध पाहता, वॉशिंग्टनने या मुदतीत एक महिन्याची वाढ केली आहे. आता डिसेंबर अखेरपर्यंत रिलायन्स रशियाकडून तेलाचे कार्गो मिळवू शकणार आहे. जरी अमेरिकन ट्रेझरीने यावर अधिकृत भाष्य करण्यास नकार दिला असला, तरी सूत्रांनी या सवलतीची पुष्टी केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : युद्ध अटळ! सलग दुसऱ्या दिवशीही चिनी युद्धनौका अन् ‘Spy balloons’ने तैवानमध्ये खळबळ; मिळाले गूढ संकेत
रिलायन्स इंडस्ट्रीजचा रशियाच्या रोझनेफ्ट या कंपनीसोबत एक मोठा आणि दीर्घकालीन करार आहे. या करारानुसार, रिलायन्स आपल्या गुजरात येथील १.४ दशलक्ष बॅरल प्रतिदिन क्षमता असलेल्या रिफायनिंग कॉम्प्लेक्ससाठी दररोज सुमारे ५,००,००० (५ लाख) बॅरल रशियन कच्चे तेल खरेदी करते. केप्लरच्या आकडेवारीनुसार, २२ नोव्हेंबरपासून रिलायन्सला रोझनेफ्टकडून सुमारे १५ तेलाचे कार्गो मिळाले आहेत. या सवलतीमुळे रिलायन्सला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातही प्रत्येकी एक कार्गो रशियन तेल मिळण्याची शक्यता आहे.
Mota Bhai is really very influential. US has agreed for one month concession to Reliance for importing Russian oil from Roseneft. pic.twitter.com/OwHX6PoUgE — Margin of Safety🇮🇳 (@InvestorOfJAMMU) December 25, 2025
credit : social media and Twitter
रिलायन्सने आपल्या धोरणात एक महत्त्वाचा बदल केला आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, २० नोव्हेंबरनंतर येणारे रशियन तेल त्यांच्या ‘भारत-केंद्रित’ (Domestic-focused) प्लांटमध्ये प्रक्रिया केले जाईल. यामुळे रिलायन्सला त्यांच्या ७,०४,००० बॅरल प्रतिदिन क्षमता असलेल्या ‘निर्यात-केंद्रित’ (Export-oriented) रिफायनरीमधून युरोपियन युनियनला (EU) इंधन विक्री सुरू ठेवता येईल. रशियन तेलावर प्रक्रिया करून तयार केलेले इंधन युरोपला विकण्यात तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी रिलायन्सने ही खबरदारी घेतली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Crisis: ‘I have a dream, जसे 1971 मध्ये सर्व धर्म एकत्र…; हिंदूंवरील हल्ल्यांवर Tariq Rahman नक्की काय म्हटले?
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर बहिष्कार टाकला, पण भारताने आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली. आज भारत समुद्रमार्गे रशियन कच्च्या तेलाचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार बनला आहे. रिलायन्सला मिळालेली ही नवीन सवलत केवळ एका कंपनीचा विजय नसून, ते भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत राजनैतिक आणि व्यापारी संबंधांचे प्रतीक आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेत इंधनाचे दर स्थिर राहण्यासही मदत होणार आहे.
Ans: अमेरिकेने रिलायन्स इंडस्ट्रीजला रशियन तेल कंपनी 'रोझनेफ्ट'कडून तेल आयात करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ (Sancion Waiver) दिली आहे.
Ans: रिलायन्सचा रोझनेफ्टसोबत दररोज ५,००,००० (५ लाख) बॅरल रशियन कच्चे तेल खरेदी करण्याचा दीर्घकालीन करार आहे.
Ans: रिलायन्स हे तेल आपल्या भारत-केंद्रित प्लांटमध्ये वापरणार आहे, जेणेकरून त्यांच्या दुसऱ्या रिफायनरीमधून युरोपला इंधन निर्यात करणे सोपे होईल.