Golad Rate Today: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर २७ ऑगस्टपासून अतिरिक्त २५ टक्के कर (Tariif) लावण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर भारतीय बाजारात मोठे बदल दिसून आले. या नवीन करामुळे देशातील सोन्याच्या दरात २७ आणि २८ ऑगस्ट रोजी लक्षणीय वाढ झाली. मात्र, आज म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी सोन्याच्या किमतीत कोणताही मोठा बदल झालेला नाही, असे म्हणायला हरकत नाही.
आज सोन्याच्या किमतीत केवळ १० रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे, ज्यामुळे सोने जवळपास स्थिर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किमतीत ५५० रुपयांची वाढ झाली असून, त्यानंतर आज पहिल्यांदाच सोन्याच्या दरात असा किरकोळ बदल दिसला आहे.
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज देशात सोन्याच्या किमतीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,०२,६१० रुपये आहे. या दरात केवळ १० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, १८ कॅरेट सोन्याचा दर ९४,०६० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर ७६,९६० रुपयांवर स्थिर आहे. ट्रम्प यांच्या टॅक्स घोषणेनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरात असा किरकोळ बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
२७ ऑगस्ट रोजी भारतात अतिरिक्त टॅक्स लागू झाल्यानंतर सोन्याच्या दरात ३८० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी पुन्हा १६० रुपयांची वाढ दिसून आली. अशाप्रकारे, गेल्या दोन दिवसांत सोन्याचा भाव ५४० रुपयांनी वाढला. यानंतर आजची १० रुपयांची वाढ मिळून एकूण वाढ ५५० रुपयांवर पोहोचली आहे.