Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: आज खरेदी करा हे स्टॉक्स, तुम्हीही व्हाल मालामाल! शेअर बाजारातील तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

Share Market Update: शेअर बाजारात काल किंचीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. हिंद युनिलिव्हर, टाटा कंझ्युमर आणि नेस्ले हे शेअर्स काल आघाडीवर होते. बीईएल , टेक महिंद्रा आणि ओएनजीसी यांना विक्रीच्या दबावाचा फटका बसला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2025 | 08:41 AM
Stock Market Today: आज खरेदी करा हे स्टॉक्स, तुम्हीही व्हाल मालामाल! शेअर बाजारातील तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

Stock Market Today: आज खरेदी करा हे स्टॉक्स, तुम्हीही व्हाल मालामाल! शेअर बाजारातील तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

Follow Us
Follow Us:

८ जुलै रोजी आज मंगळवारी शेअर बाजार कसा असणार आहे आणि कोणते शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरणार आहेत, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अनेक व्यापारी भागीदार देशांवर कर लादण्याच्या घोषणेनंतर जागतिक बाजारातील मिश्र संकेतांचा मागोवा घेत असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, ८ जुलै रोजी आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे.

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्यासाठी मोजावे लागणार तब्बल 98 हजार रुपये, चांदीही 1 लाखांच्या पार

गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड आज देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,४९५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४४ अंकांनी कमी होता. सोमवारी देखील शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. सोमवारी, भारत-अमेरिका व्यापार करारावरील अनिश्चिततेमुळे देशांतर्गत शेअर बाजार स्थिर राहिला. याशिवाय शेअर बाजार बंद होताना देखील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीत वाढ झाली. (फोटो सौजन्य – Pinterest) 

सोमवारी ७ जुलै रोजी सेन्सेक्स ९.६१ अंकांनी म्हणजेच ०.०१% ने वाढून ८३,४४२.५० वर बंद झाला, तर निफ्टी ५० ०.३० अंकांनी वाढून २५,४६१.३० वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ८२.७० अंकांनी किंवा ०.१५% ने घसरून ५६,९४९.२० वर बंद झाला. त्यामुळे आज शेअर बाजार कसा असणार, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टॉक मार्केट टुडेचे सह-संस्थापक व्हीएलए अंबाला यांना अपेक्षा आहे की निफ्टी ५० ला आजच्या बाजार सत्रात २५,३३० आणि २५,१८० च्या दरम्यान आधार मिळेल आणि २५,५१० आणि २५,६३० च्या दरम्यानच्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागेल.

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार काही स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकता. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांसाठी टाटा मोटर्स, टायटन, नॅव्हिन फ्लोरिन, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, फिनिक्स मिल्स, पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स, एसपीएमएल इन्फ्रा हे शेअर्स महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना रतनइंडिया पॉवर , इमामी आणि डीबी रियल्टी या शेअर्सची शिफारस केली आहे.

Tech Tips: तुमच्या WhatsApp चॅट्सवर कोणी नजर ठेवतंय का? आत्ताच ऑन करा या 5 प्रायव्हसी सेटिंग्स, जाणून घ्या

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगडिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांसाठी एरिस अ‍ॅग्रो लिमिटेड (सीएन), आयएनडी स्विफ्ट लॅबोरेटरीज, हुहतामाकी इंडिया , ब्लिस जीव्हीएस फार्मा आणि डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर या शेअर्सची शिफारस केली आहे. १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांसाठी रतनइंडिया पॉवर , टीटीएमएल आणि जैन इरिगेशन या शेअर्सची शिफारस करण्यात आली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 8 july 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 08:41 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत; कोणते शेअर्स राहणार चर्चेत?
1

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत; कोणते शेअर्स राहणार चर्चेत?

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरांचा रॉकेट स्पीड! एकाच दिवसात तब्बल 3000 ची मोठी वाढ; पाहा आजचे ताजे दर
2

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरांचा रॉकेट स्पीड! एकाच दिवसात तब्बल 3000 ची मोठी वाढ; पाहा आजचे ताजे दर

Stock Market Today : गुंतवणूकदारांना मोठा धक्का! शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स २५१ अंकांनी घसरला, निफ्टी २२,७०० च्या खाली
3

Stock Market Today : गुंतवणूकदारांना मोठा धक्का! शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स २५१ अंकांनी घसरला, निफ्टी २२,७०० च्या खाली

Share Market Today: शेअर बाजारात पडझडीचे संकेत! नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा लक्ष
4

Share Market Today: शेअर बाजारात पडझडीचे संकेत! नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.