Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात पडझडीचे संकेत! नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Update: शेअर बाजारात आज नकारात्मक सुरुवात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आज बाजारात व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 14, 2026 | 08:03 AM
Share Market Today: शेअर बाजारात पडझडीचे संकेत! नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Today: शेअर बाजारात पडझडीचे संकेत! नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा लक्ष

Follow Us
Follow Us:
  • भारतीय शेअर बाजार नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता
  • अदानी एंटरप्रायझेस, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ट्रान्सफॉर्मर आणि रेक्टिफायर, भारतीय रेलटेल कॉर्पोरेशनवर ठेवा लक्ष
  • दीर्घकाळीन गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी केली हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस
India Share Market Update:  १४ ऑक्टोबर रोजी, आज भारतीय शेअर बाजार नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीन संथ सुरुवातीचे संकेत दिले आहेत. बुधवारी आशियाई बाजारांमध्ये तेजी पाहायला मिळाली, तर मंगळवारी अमेरिकेच्या स्टॉक फ्युचर्समध्ये घसरण झाली. निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा जवळपास ८५ अंकांनी घसरून २२,७६५ च्या पातळीवर व्यवहार करत होता, जे भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांसाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहे.

Todays Gold-Silver Price: दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा! चांदी 5 हजारांनी झाली स्वस्त, सोन्याचे दरही घसरले

आज या शेअर्सवर ठेवा लक्ष

भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणारे गुंतवणूकदार आज बीएचईएल, कॅनरा बँक, बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स ग्रोव, टाटा टेक्नॉलॉजीज, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, अदानी एंटरप्रायझेस, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ट्रान्सफॉर्मर आणि रेक्टिफायर, भारतीय रेलटेल कॉर्पोरेशन, ऑइल इंडिया, रिलायन्स पॉवर, झायडस लाइफसायन्सेस, ह्युंदाई मोटर, पॉलीकॅब इंडिया या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

नजीकच्या काळातील व्यवहारासाठी हे शेअर्स ठरू शकतात फायदेशीर

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे जय ठक्कर यांनी नजीकच्या काळातील व्यवहारासाठी गुंतवणूकदांराना महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) फ्युचर्स, श्री सिमेंट फ्युचर्स आणि चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी (चोला फायनान्स) फ्युचर्स या शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. रामकृष्णा फोर्जिंग्स आणि टीसीपीएल पॅकेजिंग हे दोन स्टॉक्स देखील गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला जात आहे.

70 तासांच्या वर्कवीकचा वाद! कंपनीने काढला जबरदस्त तोडगा… Swiggy च्या CREW कडून महिला संस्थापिकेला मोफत Bali Trip

दीर्घकाळीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतात हे शेअर्स

फंडामेंटल रिसर्च आणि ॲक्सिस डायरेक्टचे उपप्रमुख उत्तम कुमार श्रीमल यांनी दीर्घकाळीन गुंतवणुकीसाठी कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, इटरनल, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया, एपीएल अपोलो ट्यूब्स या स्टॉक्सची निवड केली आहे. तसेच, व्हेंचुराचे संशोधन प्रमुख विनीत बोलिंजकर यांनी दीर्घकाळीन गुंतवणुकीसाठी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया, पार्क मेडी वर्ल्ड, सन्मान कॅपिटल, डॉ. अगरवाल हेल्थ केअर, विपुल ऑर्गॅनिक्स या स्टॉक्सची निवड केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market today at october 14 sensex and nifty may open lower hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 08:03 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
1

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स
2

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
3

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? बाजाराची पुढील दिशा काय असणार? ‘हे’ 3 मोठे फॅक्टर्स ठरवणार दिशा
4

घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? बाजाराची पुढील दिशा काय असणार? ‘हे’ 3 मोठे फॅक्टर्स ठरवणार दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.