आयसीआयसीआय आणि व्हिसा आता बिझनेस ट्रॅव्हलर्ससाठी आणणार नवे कार्ड (फोटो क्रेडिट - Bank/iStock)
आयसीआयसीआय बँक आणि व्हिसा यांनी कामाच्या निमित्ताने परदेशांत प्रवास करणाऱ्या भारतातील उद्योजकांना तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्चपदस्थांना सक्षम करण्याच्या उद्देशाने विकसित केलेले ‘कॉर्पोरेट सॅफिरो फोरेक्स कार्ड’ हे प्रीपेड कार्ड आणत असल्याची घोषणा केली आहे. व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्यांसाठी आणलेल्या या अशा प्रकारच्या पहिल्याच कार्डात व्हिसा इन्फिनिटीचे पाठबळ असलेल्या प्रीपेड फोरेक्स कार्डाची लवचिकता आहे, खास विकसित करण्यात आलेले जीवनशैलीविषयक लाभ आहेत, ते अत्यंत सोयीस्कर आहे आणि वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी ते मूल्यनिर्मितीही करते.
कॉर्पोरेट सॅफिरो फोरेक्स कार्ड अव्वल दर्जाचे प्रवास तसेच जीवनशैलीविषयक लाभ देऊ करते, बँकेच्या चालू खात्याला जोडलेल्या कॉर्पोरेट प्रीपेड फोरेक्स कार्डावर अशा ऑफर्स प्रथमच दिल्या जात आहेत. ₹१५,००० मूल्याच्या एक्सक्लुजिव लाभांमध्ये विमानतळावरील लाउंजेसमध्ये दोन मोफत भेटींचा समावेश आहे, व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्यांना विमानतळावर सुरळीत अनुभव मिळावा या उद्देशाने ‘मीट अँड असिस्ट’ सेवा यांद्वारे दिल्या जातात, त्याचप्रमाणे प्रवासभाडे व जीवनशैलीविषयक उत्पादनांच्या किंमतीत सवलतीही दिल्या जातात. १५ चलनांमध्ये लोडिंग करण्याचे तसेच व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य व सोय हे कार्ड देते. त्याचप्रमाणे कार्डधारकाने कार्डावर केवळ एकाच चलनात पैसे लोड केले तरीही ‘क्रॉस-करन्सी मार्क-अप’ शुल्कावर १०० टक्के सूट देऊन सोयीस्कर पद्धतीने जगभरात प्रवास करण्याची मुभाही हे कार्ड देऊ करते. वेलकम किटमध्ये दोन कार्डांचा समावेश आहे- एक प्राथमिक आणि दुसरे बदली (रिप्लेसमेंट) कार्ड. प्राथमिक कार्ड हरवल्यास बदली कार्ड पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते.
H-1B Visa : ट्रम्प यांचा $100,000 व्हिसा शुल्क नियम आजपासून होणार लागू; भारतीयांना बसणार फटका
कसे मिळेल कार्ड
बँकेमध्ये चालू खाते असलेले उद्योजक तसेच व्यवसायाचे एकमेव मालक (सोल प्रोप्रायटर्स) आता या कार्डासाठी डिजिटल पद्धतीने अर्ज करू शकतात, ते सक्रिय करवून घेऊ शकतात आणि ते लोडही करू शकतात. इन्स्टाबिझ या बँकेच्या बिझनेस बँकिंग App द्वारे ही प्रक्रिया त्वरित पार पाडली जाऊ शकते. मोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीही हे कार्ड लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे फोरेक्स कार्डांच्या विभागात बँकेच्या व्यावसायिक ग्राहकांना ‘एण्ड-टू-एण्ड’ डिजिटल प्रक्रिया देऊ करणारी आयसीआयसीआय ही भारतातील एकमेव बँक ठरली आहे. कार्डासाठी अर्ज करण्याचे, ते सक्रिय करवून घेण्याचे व लोड करण्याचे फीचर कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंगमध्ये लवकरच दिले जाणार आहे.
कशासाठी आणि कसे वापरावे
आयसीआयसीआय बँकेतील कार्डस् व पेमेंट सोल्युशन्स विभागाचे प्रमुख विपुल अगरवाल या नवीन कार्डाबद्दल म्हणाले, “बिझनेस ट्रॅव्हलर्ससाठी प्रीमियम फोरेक्स कार्ड या नवीन प्रवर्गात आपल्या फोरेक्स कार्डांच्या श्रेणीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने व्हिसासोबत सहयोग झाल्याचा आम्हाला आनंद वाटतो. भारतीय व्यवसाय व कॉर्पोरेट क्षेत्राचा जगभर विस्तार झाल्यामुळे व्यवसाय खात्याशी जोडलेल्या अनन्यसाधारण सोयी देणाऱ्या अव्वल दर्जाच्या फोरेक्स कार्डाची आवश्यकता आमच्या लक्षात आली.
इन्स्टाबिझ आणि कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग यांवरील डिजिटल प्रक्रियेद्वारे बिझनेस प्रवासी आता सहजतेने कार्डांसाठी अर्ज करू शकतील, ती लोड करू शकतील व त्यांचे व्यवस्थापनही करू शकतील. त्यानुसार सध्या भारतात प्रथमच उपलब्ध झालेले कॉर्पोरेट सॅफिरो फोरेक्स कार्ड व्यवसायांच्या मालकांसाठी तयार करण्यात आले आहे आणि आशियात प्रथमच व्हिसा इन्फिनाइट प्लॅटफॉर्मचे आकर्षक लाभ एका प्रीपेड फोरेक्स कार्डाला दिले जात आहेत.”
व्हिसाच्या भारत आणि दक्षिण आशिया प्रदेशातील कमर्शिअल अँड मनी मूव्हमेंट सोल्यूशन्स विभागाच्या प्रमुख श्रुती गुप्ता या समारंभात म्हणाल्या, “कॉर्पोरेट सॅफिरो फोरेक्स कार्ड आणण्यासाठी आयसीआयसीआय बँकेशी सहयोग केल्याचा आम्हाला आनंद वाटतो. व्यवसायातील पेमेंट्स तसेच ग्राहकांसाठी खास तयार केलेले अनुभव यांप्रती व्हिसा व आयसीआयसीआय बँक या दोघांची बांधिलकी या सहयोगातून अधोरेखित होते. या प्रीपेड फोरेक्स कार्डात लवचिकता, नियंत्रण तसेच व्हिसाच्या अमर्याद लाभांचा अनन्यसाधारण मेळ घालण्यात आला आहे, याला खात्रीशीरता, सुरक्षितता व व्हिसाबाबत जगभरात असलेली स्वीकृती यांचे पाठबळ आहे.”
व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे लाभ
डिजिटल अनुभव
कॉर्पोरेट सॅफिरो फोरेक्स कार्ड घेण्यासाठी ₹२,९९९+ जीएसटी एवढे प्रवेश शुल्क आहे. कार्डाबद्दल अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या- https://icici.co/ICICIT/k/DUvfEeC1ZIv अधिक तपशीलांसाठी, आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक इन्स्टाबिझ App वर लॉग इन करू शकतात. या App द्वारेच ते फोरेक्स कार्डासाठी अर्ज करू शकतात, कार्ड लोड करू शकतात व कार्डाचे व्यवस्थापनही करू शकतात.