
IDFC First Bank: बनावट कागदपत्रांवर फसवणूक; आयडीएफसी फर्स्ट बँकेची कठोर भूमिका (फोटो-सोशल मीडिया)
IDFC First Bank: आयडीएफसी फर्स्ट बँकेने चंदीगडमधील आपल्या एका शाखेत घडलेल्या घटनेच्या खुलाशा संदर्भात आपली तत्वनिष्ठ भूमिका आणखी स्पष्ट केली आहे. सदर घटना हरियाणा सरकारच्या काही विभागांच्या खात्यांशी संबंधित असून त्याबाबत बँकेने अलीकडेच माहिती जाहीर केली होती. प्राथमिक निष्कर्षांनुसार असे दिसून आले आहे की, शाखेतील काही कर्मचाऱ्यांनी बनावट दस्तऐवज आणि पेमेंट सूचना मंजूर करून फसवणूक केली आहे. या प्रकारामध्ये बाह्य व्यक्तींशी संगनमत असण्याची शक्यता आहे आणि संबंधित विभागांकडून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असतानाही बँकेने हरियाणा सरकारच्या संबंधित विभागांनी दावा केलेली १०० टक्के मुद्दल आणि व्याजाची रक्कम त्वरित अदा केली आहे. ही एकूण रक्कम ५८३ कोटी रुपये आहे. अदा करण्यात येणाऱ्या अंतिम रकमेत भविष्यातील कोणताही दावा किंवा ताळमेळ यानुसार फेरबदल होऊ शकतो. सदर प्रकरणाचे निराकरण करताना बँकेने अवलंबलेला तत्त्वनिष्ठ दृष्टिकोन, त्वरित केलेली कारवाई आणि व्यावसायिक वर्तणुकीबद्दल हरियाणा सरकारच्या संबंधित विभागांनी बँकेचे आभार मानताना कौतुक केले आहे.
हे देखील वाचा: NASSCOM Revenue Growth: भारतीय तंत्रज्ञान उद्योगामध्ये वाढ; महसूल ३१५ अब्ज डॉलर्सपर्यंत जाणार
हरियाणा सरकार आणि पोलीस तसेच तपास यंत्रणेच्या पूर्ण सहकार्याच्या आधारे आयडीएफसी फर्स्ट बँक या फसवणुकीतील गुन्हेगारांविरुद्ध लढण्यासाठी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक आर्थिकदृष्ट्या अतिशय भक्कम असून भांडवलाची पातळी अतिशय योग्य आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत, ‘क्रिसिल’ने बँकेच्या मुदत ठेवींसाठी ‘एएए’ दर्जा दिलेला आहे, तसेच क्रिसिल, इक्रा, इंडिया रेटिंग्स आणि केअरकडून दीर्घकालीन श्रेणीसाठी ‘एए+’ दर्जा मिळालेला आहे.
बँकेचा एकूण ग्राहक व्यवसाय (कर्ज आणि ठेवी) ५,६२,०९० कोटी रुपये आहे आणि तो मागील वर्षाच्या तुलनेत २२.६ टक्क्यांनी वाढला आहे. बँकेच्या कर्जाची गुणवत्ता उत्तम आहे. ‘ढोबळ एनपीए’ (जीएनपीए) १.६९ टक्के आणि ‘निव्वळ एनपीए’ (नेट एनपीए) केवळ ०.५३ टक्के आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर १६.२२ टक्के आहे, तर ‘कासा’ गुणोत्तर (बचत आणि चालू खात्यातील ठेवींचे प्रमाण) ५१.६ टक्के इतके उच्च आहे. बँकेचे प्रति-युनिट अर्थशास्त्र अतिशय भरभक्कम आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न ५.७६ टक्के इतके उत्तम राहिलेले आहे.
हे देखील वाचा: Patel Engineering Project: सिंचन व जलविद्युत क्षेत्रात मोठी कामगिरी; पटेल इंजिनिअरिंगचा दुहेरी विजय
बँक सध्या विस्ताराच्या टप्प्यात आहे आणि भविष्यात एक मोठी आणि वैविध्यपूर्ण बँक बनण्यासाठी बँकींग वित्तीय योजना, तंत्रज्ञान, शाखा विस्तार, एटीएम, ग्रामीण बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, कॅश मॅनेजमेंट, व्यापार, एनआरआय सेवा आणि क्रेडिट कार्ड्स यांसारख्या सेवांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. येत्या काही वर्षांत या गुंतवणुकीचा फायदा बँकेच्या उत्पन्नात दिसून येईल आणि आर्थिक वर्ष २०२७ पासून बँकेला भरभक्कम नफा मिळण्यास प्रारंभ होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
बँकेची उभारणी आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत डिजिटल पायाभूत सुविधांवर आधारलेली आहे आणि त्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट सेवेचा अनुभव मिळतो. ‘फॉरेस्टर’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संशोधन संस्थेने बँकेच्या मोबाईल बँकिंग प्लॅटफॉर्मला जागतिक स्तरावर व्दितीय क्रमांकाचे मानांकन प्रदान केलेले आहे. तसेच, ग्राहकांकडून या ॲपला गुगल प्ले स्टोअरवर ४.९ आणि आयओएसवर ४.८ गुण असा उच्च दर्जा मिळालेला आहे.