Patel Engineering Project: सिंचन व जलविद्युत क्षेत्रात मोठी कामगिरी; पटेल इंजिनिअरिंगचा दुहेरी विजय
Patel Engineering Project: पटेल इंजिनिअरिंग ला जलसंपदा क्षेत्रातील दोन महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांसाठी सर्वात कमी बोलीदार (L1) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांचे एकत्रित मूल्य 978.04 कोटी इतके असून, जलविद्युत, सिंचन आणि बोगदा बांधकाम क्षेत्रातील कंपनीचे नेतृत्वस्थान अधिक दृढ झाले आहे.
पटेल इंजिनिअरिंग यांना हिमाचल प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (HPPCL) यांनी 910.08 कोटी (GST सहित) मूल्याच्या रेणुका जी धरण प्रकल्प (पॅकेज-1) साठी L1 म्हणून घोषित केले आहे. हा प्रकल्प हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील रेणुका तहसीलमधील, ददाहू गाव येथे असून, तो 30 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
हे देखील वाचा: PNG Reva Diamond IPO: पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी लिमिटेडचा आयपीओ बाजारात चमकला; १५ नव्या दालनांकडे वाटचाल
कामाच्या पुढील घटकांचा समावेश आहे 9.5 मीटर व्यासाच्या आणि अनुक्रमे 1,379 मीटर, 1,468 मीटर आणि 1,590 मीटर लांबीच्या तीन डायव्हर्शन बोगद्यांचे बांधकाम समाविष्ट आहे. तसेच इनलेट आणि आउटलेट पोर्टल्सची उभारणी, सुमारे 6 किलोमीटर प्रवेश रस्त्यांचे बांधकाम, हायड्रो-मेकॅनिकल गेट्सची स्थापना आणि सुरक्षित व कार्यक्षम संचालनासाठी आवश्यक उपकरणीय (इन्स्ट्रुमेंटेशन) रेणुका जी धरण प्रकल्प हा जलसाठा क्षमता वाढविणे, विश्वसनीय पाणीपुरवठा सुनिश्चित करणे आणि जलविद्युत निर्मितीस चालना देणे या उद्देशांसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो.
संयुक्त उपक्रमामधून, पटेल इंजिनिअरिंग यांना महाराष्ट्र कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, पुणे यांनी ₹133.25 कोटींच्या तासगाव लिफ्ट सिंचन योजनेसाठी L1 म्हणून घोषित केले आहे. या करारातील PEL चा करारातील हिस्सा 51% असून त्याची किंमत ₹67.96 कोटी आहे. हा प्रकल्प 48 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून, सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील तासगाव, वर्णे, करंदवाडी, देवकरवाडी, देगाव आणि निगडी या गावांमध्ये लाभ होणार आहे.
हे देखील वाचा: Stock Market Today: गिफ्ट निफ्टीत तेजीचे संकेत! बाजारात सकारात्मक सुरुवात होणार, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी?
कामाच्या व्याप्तीत पुढील घटकांचा समावेश आहे हेड वर्क्स, पंप हाऊसेस, स्विचयार्ड्स, रायझिंग मेन्स आणि डिलिव्हरी चेंबर्स यांचे बांधकाम तसेच पंपिंग मशिनरीची स्थापना समाविष्ट आहे. तसेच 2,277 हेक्टर सिंचनक्षम क्षेत्रासाठी बंद पाइप वितरण प्रणाली विकसित करणे, रायझिंग मेन्ससाठी खोल खंदक खोदकाम करणे, तसेच एम.एस., पी.सी.सी.पी. आणि एचडीपीई पाइप्सचा पुरवठा, टाकणे आणि जॉइंटिंग करणे यांचा समावेश आहे. तसेच, प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व नागरी, यांत्रिक आणि विद्युत कामे केली जाणार आहेत.
या संदर्भात व्यवस्थापकीय संचालिका सौ. कविता शिर्वाईकर म्हणाल्या,”या महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी L1 घोषित होणे हे जलसंपदा क्षेत्रातील आमच्या तांत्रिक कौशल्याचे आणि अंमलबजावणी क्षमतेचे द्योतक आहे. या प्रकल्पांमुळे आमची ऑर्डर बुक अधिक मजबूत झाली असून, शाश्वत जलव्यवस्थापन, सिंचन विकास आणि जलविद्युत पायाभूत सुविधांमध्ये योगदान देण्याची आमची बांधिलकी अधिक दृढ झाली आहे. अभियांत्रिकी उत्कृष्टता, नवकल्पना आणि वेळेत अंमलबजावणी यांवर आमचा कायम भर राहील.”






