Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ITR भरण्याची आज अंतिम मुदत; पोर्टल स्लो झाल्याने करदाते हैराण, विभागाने सांगितला ‘हा’ सोपा मार्ग

आयटीआर भरण्याची आज शेवटची तारीख असल्याने पोर्टलवर प्रचंड ताण आला आहे. पोर्टल स्लो झाल्याने करदाते हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत आयकर विभागाने एक सोपा उपाय सांगितला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 15, 2025 | 05:37 PM
आयटीआरमध्ये छोटी चूक? लगेच येईल नोटीस! परंतु, यामध्ये ही 'किती' प्रकारच्या असतात नोटिस?(Concept Photo)

आयटीआरमध्ये छोटी चूक? लगेच येईल नोटीस! परंतु, यामध्ये ही 'किती' प्रकारच्या असतात नोटिस?(Concept Photo)

Follow Us
Close
Follow Us:
  • ITR भरण्याची आज अंतिम मुदत
  • पोर्टल स्लो झाल्याने करदाते हैराण
  • विभागाने सांगितला ‘हा’ सोपा मार्ग
Income Tax Return Filing Last Date: केंद्र सरकारने वित्त-वर्ष 2024-25 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत 31 जुलैवरून वाढवून 15 सप्टेंबर 2025 केली होती. म्हणजेच, आज ITR भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पण, पोर्टलवर प्रचंड लोड आल्यामुळे करदात्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, विशेषतः AIS (Annual Information Statement) डाउनलोड करताना. अनेक चार्टर्ड अकाउंटंट्स आणि करदात्यांनी AIS डाउनलोड न झाल्याची तक्रार केली आहे. मात्र, ही समस्या सर्वांसाठी सारखी नसून, आयकर विभागाने यावर काही सोपे उपाय सांगितले आहेत.

थर्ड-पार्टी सॉफ्टवेअरवरून AIS डाउनलोड बंद

आयकर विभागाने 13 सप्टेंबर 2025 रोजी सोशल मीडियावर स्पष्ट केले की, आता AIS कोणत्याही थर्ड-पार्टी सॉफ्टवेअर टूलमधून डाउनलोड करता येणार नाही. AIS डाउनलोड करण्याचा फक्त एकच मार्ग आहे: आधी ई-फायलिंग ITR पोर्टलवर लॉग इन करा आणि त्यानंतर AIS कंप्लायंस पोर्टल (https://ais.insight.gov.in/complianceportal/ais) वर जा.

माहितीनुसार, काही दिवसांपासून कंप्लायंस पोर्टलवरून AIS डाउनलोड करण्याचा आणि ITR अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही अनेक उपाय केले, जसे की Incognito Mode, ब्राउजरचा कॅश क्लियर करणे, वायर्ड इंटरनेट वापरणे आणि गुगल क्रोम व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजरचा वापर करणे.” कॅश क्लियर करून सकाळी लवकर किंवा उशिरा रात्री प्रयत्न केल्यावर काही यश मिळाले, पण दिवस पुढे गेल्यावर पोर्टल पुन्हा बंद होत होते.

हे देखील वाचा: आता पैसे काढण्यासाठी ATM मध्ये जाण्याची गरज नाही, फोनवरच QR कोड स्कॅन करून पैसे काढा, कसं ते जाणून घ्या

तुम्ही काय करू शकता?

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोर्टलवरील समस्या काही प्रमाणात कमी करण्यासाठी तुम्ही खालील उपायांचा अवलंब करू शकता:

  • योग्य ब्राउजरचा वापर: तुम्ही मायक्रोसॉफ्ट एज (व्हर्जन 88 किंवा त्यावरील), गुगल क्रोम (88+), मोझिला फायरफॉक्स (86+) किंवा ओपेरा (66+) यांसारखे ब्राउजर्स वापरू शकता.
  • ऑपरेटिंग सिस्टीम: विंडोज 7 किंवा त्यापुढील व्हर्जन, लिनक्स किंवा मॅक ओएसचा वापर करणे योग्य ठरेल.
  • कॅश आणि कुकीज क्लियर करा: तुमच्या ब्राउजरमधील कुकीज आणि साइट डेटा वेळोवेळी क्लियर करत राहा.
  • हाय-स्पीड इंटरनेट: शक्य असल्यास, हाय-स्पीड आणि लो-लेटेंसी असणारे वायर्ड इंटरनेट कनेक्शन (Ethernet) वापरा.
या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पोर्टलवरील अडचणी काही प्रमाणात कमी करू शकता आणि तुमचा आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता.

करदात्यांना भरावा लागणार दंड

जर आज आयटीआर दाखल केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. यासोबतच, आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की 2025-26 या कर निर्धारण वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. याचा अर्थ असा की आज आयटीआर दाखल न करणाऱ्या करदात्यांना उद्यापासून दंड भरावा लागेल.

Web Title: Income tax return filing issue department advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • Income Tax Return

संबंधित बातम्या

भारताला Global Trade Hub बनवण्याची मेगा तयारी! मोठ्या देशांसोबत होणार व्यापार करार, काय आहे महाप्लॅन?
1

भारताला Global Trade Hub बनवण्याची मेगा तयारी! मोठ्या देशांसोबत होणार व्यापार करार, काय आहे महाप्लॅन?

Share Market मध्ये Invest करताना रिस्कची भीती वाटतेय? LIC ने आणल्या 2 जबरदस्त स्कीम्स; पैशांवर मिळणार ‘गॅरंटीड रिटर्न’!
2

Share Market मध्ये Invest करताना रिस्कची भीती वाटतेय? LIC ने आणल्या 2 जबरदस्त स्कीम्स; पैशांवर मिळणार ‘गॅरंटीड रिटर्न’!

Rupee Fall: टेन्शन वाढलं… रुपयाच्या घसरणीमुळे सरकार चिंतेत; RBI आपला जुना ‘मास्टरस्ट्रोक’ वापरण्याच्या तयारीत
3

Rupee Fall: टेन्शन वाढलं… रुपयाच्या घसरणीमुळे सरकार चिंतेत; RBI आपला जुना ‘मास्टरस्ट्रोक’ वापरण्याच्या तयारीत

Surya Roshni Limited च्या शेअर्समध्ये डिमर्जरच्या चर्चांमुळे मोठी तेजी; व्हॅल्यू अनलॉकिंगकडे मार्केटचं लक्ष
4

Surya Roshni Limited च्या शेअर्समध्ये डिमर्जरच्या चर्चांमुळे मोठी तेजी; व्हॅल्यू अनलॉकिंगकडे मार्केटचं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.