PhonePe launch daily SIP: तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणुक करत आहात? तर, सुरु करा 10 रुपयांच्या गुंतवणुकीपासून; जाणून घ्या एका क्लिकवर (फोटो-सोशल मीडिया)
PhonePe launch daily SIP: आज फोनपे वेल्थ ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडने म्युच्युअल फंडांमध्ये त्यांच्या ‘डेली SIP’ (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) सुविधेच्या लॉन्चची घोषणा केली. यामुळे युजर्सना फोनपे ॲपद्वारे दररोज किमान 10 रुपये इतकी कमी रक्कम गुंतवणे शक्य होणार आहे.यामुळे ज्यांच्याकडे रोजची बचत आहे, त्यांना ती लगेच गुंतवणुकीत बदलणं खूप सोपं होईल आणि जास्तीत जास्त भारतीय नागरिक हळू हळू संपत्ती कमवू शकतील.
भारताचा म्युच्युअल फंड उद्योग, विशेषत SIP बाबतीत, जलद गतीची वाढ अनुभवत आहे. ॲसोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया (AMFI) नुसार, ऑक्टोबर 2025 मध्ये मासिक SIP चा ओघ 29,000 कोटी रुपयांवर पोहोचला; जो मागील पाच वर्षांमध्ये वार्षिक 30% पेक्षा अधिक वाढ दर्शवतो. ही वाढ सातत्याने वाढत असलेल्या SIP खात्यांमध्ये देखील दिसून येते, जी ऑक्टोबर 2025 पर्यंत 9.45 कोटींवर पोहोचली आहेत. हे गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडांमध्ये नियमानुसार नियमितपणे योगदान देण्याची आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करण्याची तीव्र इच्छा दर्शवते.
हेही वाचा: GDP Growth news: परदेशी गुंतवणूकदार बाहेर, तरी सेन्सेक्स ८% वधारला; भारतीय शेअर बाजाराची ताकद कायम
या पार्श्वभूमीवर, ‘डेली SIP’ च्या लॉन्चमुळे युजर्सना दररोज फक्त 10 रुपये इतकी कमी रक्कम गुंतवणे शक्य होईल, ज्यामुळे दररोज रोकड आणि बचत असलेल्या व्यक्तींसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे अधिक सोयीचे आणि परवडणारे ठरेल. ही सुविधा आर्थिक संपत्ती निर्माण करण्याच्या दिशेने पहिले आणि महत्त्वाचं पाऊल आहे.
डेली SIP ची खास वैशिष्ट्ये:
फोनपे वेल्थचे न्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट हेड निलेश नाईक म्हणाले, “डेली SIP मुळे, आम्ही लाखो भारतीयांसाठी गुंतवणुकीला एक नियमित सवय बनवत आहोत. दररोजच्या गुंतवणुकीमुळे, गुंतवणूकदारांना ‘रूपी-कॉस्ट ॲव्हरेजिंग’ चा फायदा मिळतो, ज्यामुळे कमी कालावधीतील बाजारातील चढ-उतारांवर सहज मात करता येते. रोजचे फक्त 10 रु. देखील शिस्तबद्ध, दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन मोठी संपत्ती निर्माण करण्यास मदत करू शकतात. गुंतवणुकीची प्रक्रिया सोपी करणे आणि प्रत्येक भारतीयाला देशाच्या विकासामध्ये सहभागी होण्यासाठी मदत करणे, हे आमचे ध्येय आहे.”
डेली SIP च्या लॉन्चमुळे, फोनपे वेल्थने गुंतवणूक सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे आणि संपत्ती निर्माण करणे सगळ्यांसाठी सोपे करण्याचे आपले वचन पक्के केले आहे. मॅनेज करता येण्याजोग्या रकमेपासून सुरुवात करण्याची संधी देऊन आणि एक लवचिक, युजर-फ्रेंडली अनुभव देऊन, फोनपे वेल्थ पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांना आणि अनुभवी गुंतवणूकदारांना दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्यास सक्षम करते. हा उपक्रम फोनपे प्लॅटफॉर्मचे उत्पन्न गटांमध्ये आर्थिक समावेशन वाढवण्याचे आणि शिस्तबद्ध, दीर्घकालीन गुंतवणुकीची संस्कृती जोपासण्याचे ध्येय आणखी मजबूत करतो.






