RBI News: डिजिटल युगात एटीएमचा वापर झाला कमी; आरबीआयचा मोठा खुलासा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
तथापि, या काळात स्वतंत्रपणे चालवल्या जाणाऱ्या व्हाईट-लेबल एटीएमची संख्या ३६,२१६ पर्यंत वाढली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एटीएम ग्रामीण, अर्ध शहरी, शहरी आणि महानगरीय भागात समान प्रमाणात वितरीत केले जातात, तर खाजगी आणि परदेशी बँकांनी प्रामुख्याने शहरी आणि महानगरीय क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात बैंक शाखांची संख्या १६४,००० पर्यंत वाढली, जी मागील वर्षाच्या तुलनेत २.८ टक्के वाढ आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नवीन शाखा उघडण्यात सक्रिय भूमिका बजावली, ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात त्यांच्या दोन तृतीयांश नवीन शाखा उघडल्या.
हेही वाचा: Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? वर्षा अखेरीस चांदीचे दर पुन्हा चर्चेत!
नवीन शाखांमध्ये खासगी बँकेचा वाटा घसरला
नवीन शाखांमध्ये खासगी बँकांचा वाटा ६७.३ टक्क्यांवरून ५१.८ टक्क्यांपर्यंत घसरला. अहवालानुसार, बेसिक सेव्हिंग्ज बैंक डिपॉझिट अकाउंट्स बीएसबीडीए) ची संख्या ७२४ दशलक्ष झाली आहे आणि एकूण देवी ३.३ लाख कोटीवर पोहोचल्या आहेत. यापैकी बहुतेक खाती बैंक करस्पॉन्डेंट मॉडेलद्वारे चालवली जातात. ठेव विम्याची मर्यादा ५ लाखांवरून वाढवण्याचा विचार केला जात असला तरी, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरीस ९७.६ टक्के बैंक खाती या विम्याने व्यापली गेली होती. वाढत्या तंत्रज्ञानाचा बँक क्षेत्रात देखील प्रगती करत आहे.






