Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Manufacturing PMI: भारतातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची जोरदार कामगिरी; पीएमआय ९ महिन्यांच्या उच्चांकावर, ५६ वर पोहोचला

India Manufacturing PMI: भारतातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने नोव्हेंबरमध्ये दमदार कामगिरी केली असून उत्पादन क्षेत्राचा पीएमआय वाढून ५६ वर पोहोचला आहे. ऑक्टोबरमध्ये हा आकडा ५४.७ होता. तर उत्पादन आणि नव्या ऑर्डर्समध्ये झालेली वाढ यामागील प्रमुख कारण ठरली आहे. दरम्यान, सेवा क्षेत्रातील वाढीचा वेग काहीसा मंदावला असला...

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 23, 2026 | 12:34 PM
भारतातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची जोरदार कामगिरी; पीएमआय ९ महिन्यांच्या उच्चांकावर, ५६ वर पोहोचला

भारतातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची जोरदार कामगिरी; पीएमआय ९ महिन्यांच्या उच्चांकावर, ५६ वर पोहोचला

Follow Us
Follow Us:
  • भारतीय उत्पादन क्षेत्राला मागणीचा बूस्टर
  • नोव्हेंबरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयमध्ये वाढ
  • पीएमआय ५४.७ वरून वाढून ५६ वर
India Manufacturing PMI: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन क्षेत्राने नोव्हेंबर महिन्यात दमदार कामगिरी केली आहे. उत्पादन क्षेत्राचा परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) वाढून ५६ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, गेल्या नऊ महिन्यांतील हा सर्वोच्च स्तर असून ऑक्टोबर महिन्यात हा निर्देशांक ५४.७ इतका होता. सोमवारी (23 नोव्हेंबर 2026) जाहीर झालेल्या पीएमआयच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.(India Manufacturing PMI)

उत्पादन आणि नव्या ऑर्डर्समध्ये वाढ

नोव्हेंबरमध्ये उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीला मजबूत देशांतर्गत मागणीचा मोठा आधार मिळाला. कंपन्यांना मिळणाऱ्या नव्या ऑर्डर्समध्ये वाढ झाली असून उत्पादनाचा वेगही सुधारला आहे. बाजारातील अनुकूल परिस्थिती आणि नव्या ग्राहकांची वाढती संख्या यामुळे कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. मात्र, सेवा क्षेत्रातील व्यावसायिक घडामोडींच्या वाढीचा वेग काहीसा मंदावला. त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील वेगवान वाढीचा परिणाम एकूण खासगी क्षेत्राच्या कामगिरीवर मर्यादित राहिला. HSBC फ्लॅश इंडिया कंपोझिट आउटपुट इंडेक्स नोव्हेंबरमध्ये ५६.३ वर पोहोचला. ऑक्टोबरमध्ये हा निर्देशांक ५६.२ होता.

Share Market Today: शेअर बाजारात गॅप-अप ओपनिंगचे संकेत! स्विगीसह ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष, तज्ज्ञांनी दिला सल्ला

औषधनिर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मागणी

सर्वेक्षणात सहभागी कंपन्यांनी औषधनिर्मिती आणि आरोग्यसेवा, रसायने, इलेक्ट्रॉनिक घटक, धातू, वीज पारेषण उपकरणे, लॉजिस्टिक्स, वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांमध्ये मागणी मजबूत असल्याचे सांगितले. काही कंपन्यांनी मार्केटिंगचे प्रयत्न, सवलती आणि ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा यामुळेही विक्रीत वाढ झाल्याचे नमूद केले. एकूण नव्या व्यवसायात जून महिन्यानंतरची सर्वाधिक वेगवान वाढ नोव्हेंबरमध्ये नोंदवण्यात आली.

कंपन्यांचा भविष्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन

नोव्हेंबरमध्ये कंपन्यांच्या कर्मचारी संख्येत किरकोळ वाढ झाली. मात्र, सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी जवळपास वर्षभरानंतर प्रथमच कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली. दुसरीकडे, उत्पादन खर्चातील वाढ मर्यादित राहिली. उत्पादनांच्या विक्री किमतींमध्ये मात्र किंचित वाढ झाली. यामुळे कंपन्यांच्या नफ्याच्या मार्जिनला काही प्रमाणात आधार मिळाला. HSBCच्या मुख्य भारतीय अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सांगितले की, नव्या ऑर्डर्समधील वाढीमागे मजबूत देशांतर्गत मागणी हे प्रमुख कारण आहे. निर्यात ऑर्डर्समध्ये मात्र काहीशी नरमाई दिसून आली. सेवा क्षेत्रात नव्या निर्यात व्यवसायात चांगली वाढ होऊनही एकूण कामगिरी काहीशी कमकुवत राहिली.

दरम्यान, आगामी एका वर्षाबाबत भारतीय कंपन्यांचा आत्मविश्वास वाढला असून सकारात्मक व्यावसायिक दृष्टिकोन मे महिन्यानंतरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय उत्पादन क्षेत्रासाठी नोव्हेंबर महिना महत्त्वपूर्ण ठरला आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात किंचीत घसरण! एका क्लिकवर जाणून घ्या नागपूर, दिल्ली, चेन्नईसह प्रमुख शहरांतील दर

💡

Frequently Asked Questions

  • Que: नोव्हेंबर २०२६ मध्ये भारताचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय किती होता?

    Ans: नोव्हेंबरमध्ये भारताचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय ५६ वर पोहोचला. ऑक्टोबरमध्ये तो ५४.७ होता.

  • Que: मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयमध्ये वाढ होण्यामागील प्रमुख कारणे कोणती?

    Ans: उत्पादनात झालेली वाढ, नव्या ऑर्डर्समध्ये वाढ, मजबूत देशांतर्गत मागणी आणि नव्या ग्राहकांची भर पडणे ही प्रमुख कारणे आहेत.

  • Que: नोव्हेंबरमध्ये भारताचा कंपोझिट पीएमआय किती नोंदवला गेला?

    Ans: नोव्हेंबरमध्ये HSBC फ्लॅश इंडिया कंपोझिट आउटपुट इंडेक्स ५६.३ वर पोहोचला. ऑक्टोबरमध्ये तो ५६.२ होता.

Web Title: India manufacturing pmi rises to nine month high of 56 in november 2026 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • Business News
  • india
  • Indian Economy

संबंधित बातम्या

टाटा समूहात मोठ्या घडामोडी! TATA Son’sचा वाद सुरू असतानाच ट्रस्टचे 5 महत्त्वाचे निर्णय
1

टाटा समूहात मोठ्या घडामोडी! TATA Son’sचा वाद सुरू असतानाच ट्रस्टचे 5 महत्त्वाचे निर्णय

India’s Top Philanthropists 2026: अंबानी-अदानींनाही टाकलं मागे! देशातील सर्वात मोठा दानशूर उद्योगपती कोण?
2

India’s Top Philanthropists 2026: अंबानी-अदानींनाही टाकलं मागे! देशातील सर्वात मोठा दानशूर उद्योगपती कोण?

MakeMyTrip Travel Sale: Year-End Holiday चं प्लॅनिंग स्वस्तात! MakeMyTrip घेऊन आलं खास ऑफर्सचं पॅकेज
3

MakeMyTrip Travel Sale: Year-End Holiday चं प्लॅनिंग स्वस्तात! MakeMyTrip घेऊन आलं खास ऑफर्सचं पॅकेज

FICCI Executive Committee: राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड
4

FICCI Executive Committee: राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.