Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WEF Annual Meeting: दावोस 2026 मध्ये भारताचा दबदबा! अंबानी, टाटा, फडणवीस एकाच मंचावर, काय असणार खास?

जागतिक आर्थिक मंच वार्षिक बैठकीत भारतातील चार मुख्यमंत्री आणि १०० हून अधिक सीईओ उपस्थित राहणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) दावोस २०२६ मध्ये फडणवीस, नायडू, अंबानी, टाटा यांच्यासह प्रमुख व्यक्तींचा सहभाग असेल. 

  • By Priti Hingane
Updated On: Dec 14, 2025 | 02:37 PM
WEF Annual Meeting: दावोस 2026 मध्ये भारताचा दबदबा! 4 मुख्यमंत्री आणि 100+ CEO राहणार उपस्थित; अंबानी, टाटा, फडणवीस एकाच मंचावर

WEF Annual Meeting: दावोस 2026 मध्ये भारताचा दबदबा! 4 मुख्यमंत्री आणि 100+ CEO राहणार उपस्थित; अंबानी, टाटा, फडणवीस एकाच मंचावर

Follow Us
Close
Follow Us:
  • जागतिक आर्थिक मंच (WEF) ची वार्षिक बैठक होणार
  • भारतातील ४ मुख्यमंत्री आणि १००पेक्षा अधिक सीईओ राहणार उपस्थित
  • भारताकडून गुंतवणूक आणि व्यापारावर अधिक भर
 

WEF Davos 2026: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) दावोस २०२६ मध्ये जागतिक आर्थिक मंचावर भारताकडून ४ मुख्यमंत्री आणि १०० हून अधिक सीईओ उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आणि आंध्र प्रदेशचे एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह भारतातील इतर २ मुख्यमंत्री आणि १०० हून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ उपस्थित राहणार आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या वार्षिक बैठकीला ते उपस्थित राहतील. ही वार्षिक बैठक पाच दिवस १९ ते २३ जानेवारी २०२६ पर्यंत चालेल आणि सुमारे १३० देशांमधील अंदाजे ३,००० जागतिक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या बैठकीत अंदाजे ६० राष्ट्रप्रमुखांचा समावेश असून अनेक केंद्रीय मंत्री देखील उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत, तेलंगणाचे ए. रेवंत रेड्डी आणि मध्य प्रदेशचे मोहन यादव देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशसह इतर अनेक राज्यांचीही WEF वार्षिक बैठक २०२६ मध्ये उपस्थिती असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा : RBI Repo Rate impact: कमी महागाई, स्वस्त कर्ज आणि मजबूत वाढ तरीही शेतकरी अडचणीत का? 

ही बैठक “संवादाची भावना” या थीमखाली होणार असून केंद्रीय मंत्र्यांची नावे लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. भारतातून, जगभरातील प्रभावशाली उद्योगपती म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, टाटा ग्रुपचे एन चंद्रशेखरन, बजाज ग्रुपचे संजीव बजाज आणि जुबिलंट भरतिया ग्रुपचे हरी एस भरतिया हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे.

दावोसला जाणाऱ्या इतर भारतीय कॉर्पोरेट अधिकाऱ्यांमध्ये अ‍ॅक्सिस बँकेचे अमिताभ चौधरी, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे नादिर गोदरेज, जेएसडब्ल्यू ग्रुपचे सज्जन जिंदाल, झेरोधाचे निखिल कामथ, भारती ग्रुपचे सुनील भारती मित्तल, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी, इन्फोसिसचे सीईओ सलील एस. पारेख, विप्रोचे रिषद प्रेमजी, एस्सारचे सीईओ प्रशांत रुईया आणि पेटीएमचे विजय शेखर शर्मा यांसारख्या व्यावसायिकांचा देखील समावेश आहे.

हेही वाचा : RBI Report: RBI कडून धक्कादायक वास्तव उघड! राज्यांतील आर्थिक असमानता भारताच्या वाढीस धोका निर्माण करणार? 

उद्योग आणि व्यापार विभागाचे सचिव अमरदीप सिंग भाटिया यांच्या व्यतिरिक्त, अनेक सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे प्रमुख देखील दावोसला जाणार आहेत, ज्यात गेलचे संदीप कुमार गुप्ता, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष सी.एस. सेट्टी, एनटीपीसीचे गुरदीप सिंग आणि आरईसीचे जितेंद्र श्रीवास्तव यांचा समावेश आहे. जी-७, जी-२० आणि ब्रिक्स देशांसह इतर देशांचे नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख देखील सहभागी होतील.

Web Title: India to have a strong presence at davos 2026 4 chief ministers and 100 ceos will be present ambani tata and fadnavis on the same platform

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 02:10 PM

Topics:  

  • businessman mukesh ambani
  • CM Devendra Fadanvis
  • Tata

संबंधित बातम्या

दमदार मायलेज अन् कमी किंमत! ८,००,००० हून अधिक CNG कारची विक्री,‘या’ कार ठरल्या टॉप-5 बेस्ट सेलिंग कार
1

दमदार मायलेज अन् कमी किंमत! ८,००,००० हून अधिक CNG कारची विक्री,‘या’ कार ठरल्या टॉप-5 बेस्ट सेलिंग कार

कडे-कपारी, डोंगर माथा… हाणून काढेल टाटा! ही Ultimate 90° Drop Test विश्वास ठेवण्यासाठी पुरेशी
2

कडे-कपारी, डोंगर माथा… हाणून काढेल टाटा! ही Ultimate 90° Drop Test विश्वास ठेवण्यासाठी पुरेशी

SRA आणि म्हाडाचा डंका! राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या प्रगती पुस्तकात ‘एसआरए’ दुसऱ्या, तर ‘म्हाडा’ सहाव्या क्रमांकावर
3

SRA आणि म्हाडाचा डंका! राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या प्रगती पुस्तकात ‘एसआरए’ दुसऱ्या, तर ‘म्हाडा’ सहाव्या क्रमांकावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.