Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought : मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा ‘या’ गोष्टीचा पुनरुच्चार, बळीराजाला दिलासा मिळणार

Maharashtra Drought : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी वाशिमचा दौरा केला. यावेळी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी नुकसान भरपाई देण्याच्या आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 24, 2026 | 05:37 PM
Maharashtra Drought : मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा 'या' गोष्टीचा पुनरुच्चार, बळीराजाला दिलासा मिळणार

Maharashtra Drought : मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा 'या' गोष्टीचा पुनरुच्चार, बळीराजाला दिलासा मिळणार

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्र्यांकडून वाशिम जिल्ह्याचा दौरा
  • दुष्काळाबाबतची अधिसूचना लवकरच जाहीर करणार
  • शेतकऱ्याच्या आईने मांडली दुष्काळाची कैफीयत
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्याचा दौरा करत, थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृष्य (Maharashtra Drought) परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक व पाणी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल अशी ग्वाही दिली.

दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील म्हणजे अमरावती विभागातील पिक पाणी परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. वाशिम जिल्ह्यातील म्हसला, (ता.कारंजा) येथील शेतकरी देविदास किशन काळे यांच्या शेतात जाऊन शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीन व तुर पिकाची पाहणी करीत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
त्यानंतर मोहगव्हाण (ता. मंगळूरपीर) येथील शेतकरी अनिल भगरे, तसेच अब्दुल नईम शेख रहीम यांच्या शेतातील नुकसानाची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

 

शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये

आपल्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर हे मोठे संकट आहे. तथापि, शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. शासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. यासंबंधीची अधिसूचनाही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

 

शेतकऱ्याच्या आईने मांडली दुष्काळाची कैफीयत

जऊळका (ता. मालेगाव) येथील शेतकरी संतोष सखाराम डुंबळे यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृष्य परिस्थितीची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी संतोष यांच्या आई शकुंतलाबाई यांनीही दुष्काळी परिस्थितीची कैफीयत मांडली.
या दौऱ्यात परिसरातील पिक व पाणी परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला. अत्यल्प पाऊसमानामुळे आसमानी संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांसोबत आहे.

त्यांनी कोणतीही चिंता करू नये. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन शासनाकडून आवश्यक मदत प्राधान्याने आणि लवकरात लवकर दिली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

 

या दौऱ्यात खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, आमदार बाबुसिंग महाराज, आमदार सईताई डहाके, आमदार श्याम खोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार भावना गवळी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्यासह प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी आणि शेतकरीबांधव उपस्थित होते.

Web Title: Maharashtra drought cm devendra fadnavis wasim farmer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • drought news
  • Washim

संबंधित बातम्या

Washim: जल जीवन मिशनचे काम रखडले! मेडशीकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
1

Washim: जल जीवन मिशनचे काम रखडले! मेडशीकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

Washim News: कर्ज काढून हळद लावली, पण पाण्याअभावी पीक उद्ध्वस्त! कंझरात २०० पैकी १०० एकर हळद वाळली; शेतकरी हवालदिल
2

Washim News: कर्ज काढून हळद लावली, पण पाण्याअभावी पीक उद्ध्वस्त! कंझरात २०० पैकी १०० एकर हळद वाळली; शेतकरी हवालदिल

Latur News: पीकविमा प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी! ई-केवायसीशिवाय पीकविमा भरता येत नसल्याच्या सूचनेमुळे शेतकऱ्यांची होणार धावपळ
3

Latur News: पीकविमा प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी! ई-केवायसीशिवाय पीकविमा भरता येत नसल्याच्या सूचनेमुळे शेतकऱ्यांची होणार धावपळ

वाशिममधील पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकरांचे आवाहन
4

वाशिममधील पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकरांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.