Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळावरून काँग्रेस आक्रमक! शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याच्या आश्वासनाचं काय झालं? अतुल लोंढेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा

Atul Londhe on Devendra Fadnavis Farmer Loan Waiver : निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याचे दिलेले आश्वासन काय झाले, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांनाच द्यावे, असे आव्हान काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 23, 2026 | 09:22 PM
Atul Londhe on Devendra Fadnavis

Atul Londhe on Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • ‘७/१२ कोरा’ करण्याच्या आश्वासनाचं काय झालं?
  • अतुल लोंढेंचा फडणवीसांना थेट सवाल
  • दुष्काळावरून काँग्रेस आक्रमक

मुंबई: राज्यात कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. १९७२ च्या दुष्काळापेक्षाही गंभीर दुष्काळ असल्याचे चित्र आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे, तो सरकारकडे मदतीची आस लावून बसला आहे, पण भाजपाचे फडणवीस सरकार अजून अभ्यास करण्यातच मग्न आहे. शेतकऱ्यांचा संताप लक्षात आल्याने शेवटी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत पण त्याचा उपयोग काय? भाजपा सरकारने निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचा ७/१२ पूर्णपणे कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले?, याचे उत्तर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री महोदय तुम्हीच शेतकऱ्यांना द्या, असे आव्हान काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले आहे.

Girgaon Chowpatty: गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग, पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम

मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावर बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, भाषणाने केवळ राजकारण साधता येते पण सत्य परिस्थितीचा सामना करण्याची धमक त्याच्यामध्ये असत नाही, असेच भाजपा महायुती सरकारबद्दल म्हणावे लागेल. मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पहावा लागणार नाही, या विधानाचा पाढा याच देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत कितीतरी वेळा वाचला आहे. आज ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले ही चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचे स्वागतच करतो. हा दुष्काळ १९७२ नंतरचा सर्वात मोठा दुष्काळ आहे, असे ते म्हणाले, पण १९७२ च्या दुष्काळातून काँग्रेसच्या सरकारने शिकवण घेतली आणि रोजगार हमी योजना त्यातून जन्माला आली, या योजनेने लाखो हाताला रोजगार दिला, हीच योजना पुढे केंद्र सरकारने स्वीकारली, कायदा केला आणि त्याची मनरेगा झाली, कोरोनामध्येही याच मनरेगाने रोजगार दिला परंतु भाजपा सरकारने ही मनरेगा कशी तोडता येईल यासाठी सातत्याने काम केले. मनरेगाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली, आतातर ही योजनाच मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकार करत आहे.

अतुल लोंढे म्हणतात, राज्यात याआधीही अतिवृष्टी आली, दुष्काळ आला, खरेच भाजपा सरकारने शेतकऱ्यांना मदत केली का, ते सांगावे, किती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली हे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांनाच विचारावे. भाजपा महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तीही फसवी निघाली, हेच शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळेल. भाजपा सरकार यातून धडे घेणार आहे का? तुम्ही काही नव्याने उभे करणार आहात का? दुष्काळाचा सामना करता आला पाहिजे, यासाठी कोणत्या ठोस योजना या सरकारकडे आहेत? २०१४ साली जाहीर केलेल्या ४९ हजार कोटींच्या वॉटर ग्रीडचे काय झाले? काँग्रेसचे सरकार असताना शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या व त्याची अंमलबजावणीही केली. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना कमी पाण्यावर तग धरू शकणारी फलोद्यान योजना आणली आणि त्यानंतर फूड प्रोसेसिंगमध्ये मोठी क्रांती महाराष्ट्रात झाली.

भाजपा सरकारच्या १२ वर्षांच्या कालावधीमध्ये शेती क्षेत्रात असे काही केल्याचे दिसत नाही. आज तुम्ही बांधावर गेले आहात, शेतकऱ्यांच्या समस्या तुम्हाला जवळून दिसल्या असतील, त्यांचे दुःख कळले असेल तर कदाचित काहीतरी चांगले होईल अशी अपेक्षा करूया, नाहीतर पुन्हा तेच, ये रे माझ्या मागल्या, रात्रीचा गोंधळ बरा होता, असे होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे, असेही काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

शेतकरी संकटात, पंचनामे युद्धपातळीवर करा SDRF ची मदत द्या; धीरज देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडल्या मागण्या

Web Title: Atul londhe fadnavis maharashtra drought farmer loan waiver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • Atul Londhe
  • CM Devendra Fadanvis
  • Farmer Crisis

संबंधित बातम्या

शेतकरी संकटात, पंचनामे युद्धपातळीवर करा SDRF ची मदत द्या; धीरज देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडल्या मागण्या
1

शेतकरी संकटात, पंचनामे युद्धपातळीवर करा SDRF ची मदत द्या; धीरज देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडल्या मागण्या

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
2

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Maharashtra Drought : बळीराजाला बाप्पा पावणार! राज्य सरकार शनिवारपूर्वी पहिली अधिसूचना काढणार, फडणवीसांची मोठी घोषणा
3

Maharashtra Drought : बळीराजाला बाप्पा पावणार! राज्य सरकार शनिवारपूर्वी पहिली अधिसूचना काढणार, फडणवीसांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : बळीराजाची चिंता वाढली! दुष्काळाबाबत ‘या’ महिन्यात होणार निर्णय, खुद्द मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती
4

Maharashtra Drought : बळीराजाची चिंता वाढली! दुष्काळाबाबत ‘या’ महिन्यात होणार निर्णय, खुद्द मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.