Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी संकटात, पंचनामे युद्धपातळीवर करा SDRF ची मदत द्या; धीरज देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडल्या मागण्या

Dhiraj Deshmukh on Drought Relief Package To CM fadnavis: बाधित तालुके व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, पीक विमा लाभ आणि विशेष दुष्काळ निवारण पॅकेज द्यावे, अशी मागणी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 23, 2026 | 07:55 PM
Dhiraj Deshmukh on Drought Relief Package

Dhiraj Deshmukh on Drought Relief Package

Follow Us
Follow Us:
  • मराठवाड्यात दुष्काळाची झळ
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या
  • धीरज देशमुखांचे मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन
मुंबई: मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अपुरा व विस्कळीत पाऊस, पावसातील दीर्घ खंड, घटलेली मृदा आर्द्रता व खालावत चाललेली भूजल पातळी यामुळे गंभीर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, ऊस, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी यांसह सर्व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने मराठवाड्यातील परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून बाधित तालुके व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करावीत, तसेच शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, पीक विमा लाभ आणि विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली आहे.

aditya thackeray : अखेर 500 कोटींच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचं उत्तर, नेमकं काय म्हणाले पहा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यास आले असता धिरज देशमुख यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीच्या मागण्यांचे एक निवेदन मुख्यमंत्री यांना दिले.धिरज देशमुख या निवेदनात पुढे म्हणतात की, सरकारने MahaMADAT, MahaRain, पर्जन्यमान, मृदा आर्द्रता, भूजल पातळी, जलसाठा आणि प्रत्यक्ष पीक नुकसान यांच्या आधारे गावनिहाय व शेतनिहाय वस्तुनिष्ठ दुष्काळ मूल्यांकन करावे.आवश्यक निकष पूर्ण करणारे तालुके व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करा. बाधित शेतकऱ्यांचे गावनिहाय व शेतनिहाय पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून SDRF अंतर्गत मदत तातडीने वितरित करण्यात यावी तसेच NDRF अंतर्गत विशेष मदतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर सरसकट अनुदान मंजूर करून, पारदर्शक व सुलभ पद्धतीने लाभ वितरण सुनिश्चित करण्यात यावे.कृषी कर्जवसुलीस स्थगिती, कर्ज पुनर्गठन तसेच नवीन पीक कर्ज उपलब्धतेबाबत सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी व इतर वित्तीय संस्थांना आवश्यक निर्देश देण्यात यावेत.

संभाव्य पाणीटंचाई व पशुधन संरक्षणासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा, पर्यायी जलव्यवस्था, चारा छावण्या, चारा डेपो व आवश्यक पशुवैद्यकीय सुविधा यांचे पूर्वनियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला द्याव्यात. मराठवाड्यासाठी विशेष दुष्काळ निवारण पॅकेज तसेच “मराठवाडा रब्बी पुनर्बांधणी विशेष योजना” मंजुरीसाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा, जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे, खते, सूक्ष्म सिंचन व तांत्रिक सहाय्य उपलब्ध होईल.

सन 2023-24 मधील 72 तासांच्या कारणावरून नाकारलेले अथवा प्रलंबित ठेवलेले सर्व पीक विमा दावे पुनर्विचारासाठी खुले करण्यात यावेत. महसूल विभागाचे पंचनामे, कृषी विभागाचे अहवाल, पर्जन्यमान नोंदी, WINDS माहिती, हवामान अहवाल व इतर शासकीय अभिलेखांच्या आधारे पात्रता निश्चित करण्यात यावी. संबंधित नुकसानग्रस्त क्षेत्रांचा PMFBY अंतर्गत “Wide-spread Localized Calamity” म्हणून विचार करण्यात यावा. बँक, कृषी विभाग, महसूल विभाग किंवा इतर अधिकृत माध्यमांद्वारे नुकसानाची माहिती दिलेल्या शेतकऱ्यांचे दावे ग्राह्य धरण्यात यावेत. PIL No. 91/2021 मधील उच्च न्यायालयाने स्थापित केलेली तत्त्वे मराठवाड्यातील प्रकरणांनाही लागू करण्यात यावीत.

72 तासांनंतरही मंजूर करण्यात आलेल्या दाव्यांची तपासणी करून समान परिस्थितीतील सर्व शेतकऱ्यांना समान न्याय देण्यात यावा. “प्रत्यक्ष नुकसान झालेले असताना केवळ तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हक्कापासून वंचित ठेवू नये. सर्व पात्र शेतकऱ्यांना निश्चित कालमर्यादेत त्यांचा हक्काचा पीक विमा लाभ मिळावा,” अशी मागणी धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे यावेळी त्यांच्यासोबत लातूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके व काँग्रेस प पदाधिकारी उपस्थित होते.

Tata Group Clash: टाटा समूहातील वाद चिघळला? शरद पवारांची एन्ट्री, महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं लक्ष, म्हणाले…

Web Title: Dhiraj deshmukh marathwada drought relief package fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Dhiraj Deshmukh
  • drought news
  • Latur news

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३ दिवसांत मदतीची पहिली अधिसूचना, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३ दिवसांत मदतीची पहिली अधिसूचना, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा

वाशिममध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा
2

वाशिममध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा

Buldhana: दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा; पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा
3

Buldhana: दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा; पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
4

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.