Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : एपस्टीनला रशिया का आवडायचा? महिला ,अब्जाधीश आणि पुतिनपर्यंत पोहोचण्याची महत्वाकांक्षा; धक्कादायक खुलासे

World News : जेफ्री एपस्टीनचे रशियातील महिलांपासून अब्जाधीश आणि राजकीय नेत्यांपर्यंत संबंध होते. नव्या तपासातून किमान १७ महिलांचे शोषण, रशियन धनकुबेरांशी व्यावसायिक संपर्क आणि पुतीन यांची भेट घेण्याचे प्रयत्न समोर आले आहेत. मात्र, रशियन गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा पुरावा मिळालेला नाही.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 20, 2026 | 09:34 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • मॉडेलिंगच्या नावाखाली तरुण महिलांचे जाळे
  • रशियन धन कुबेरांशी मैत्री; व्यावसायिक संबंध वाढवण्याचा प्रयत्न
  • पुतीन भेटीसाठी अनेक प्रयत्न
World News : जगातील सगळ्यात प्रसिद्ध तसेच अमेरिकेतीलकुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याचे रशियाशी असलेले संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत . महिलांचे जाळे , रशियन पैसेवाल्यांशी मैत्री आणि क्रेमलिनमधील प्रभावशाली व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची धडपड, अशा अनेक गोष्टींचा उलगडा एपस्टीनच्या अमेरिकेतील संशयास्पद मृत्यूनंतर नवीन तपासात समोर आला आहे .

एपेस्टीनला रशियामध्ये फक्त महिलांमध्येच रस न्हवता ,तर तेथील श्रीमंत आणि राजकीय वर्तुळातील व्यक्तींशी संबंध आणि मैत्री निर्माण करून स्वतःची प्रतिमा सुधारण्याचीही त्याची महत्वाकांक्षा होती . यामधील खास बाब म्हणजे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट घेण्यासाठीही त्याने अनेकदा प्रयत्न केले होते . पण पुतीन आणि एपस्टीन यांच्या भेटीचे कोणतेही पुरावे अजून तरी समोर आले नाहीत .

या एपस्टीनच्या नादाला मोठ्या मोठ्या देशांचे लोक लागले असून संपूर्ण जगातील समाजकारण आणि राजकारण यामुळे बदलणार आहे . अशा चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणात विश्लेषक करत आहेत . सध्या अमेरिकेत याबाबत कोर्टात केस सुरु असून ,हळूहळू यामागील उलगडा होताना दिसत आहे .

मॉडेलिंगच्या नावाखाली तरुण महिलांचे जाळे

रशियातील महिलांशी एपस्टीनचे संबंध मॉडेलिंगच्या व्यवसायातून वाढले . सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर पूर्व यूरोप मधील अनेक तरुणी आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रयत्नशील होत्या . याच संधीचा वापर एपस्टीनने केल्याचे तपासात समोर आले आहे . फ्रेंच मॉडेलिंग एजंट जीन ल्युक ब्रुनेल याच्याशी त्याचे जवळचे संबंध होते .

ब्रुनेलच्या माध्यमातून तरुणींना अमेरिका आणि युरोपमधील मॉडेलिंगच्या संधी देण्याचे अमिश दाखवले जात होते . तपासानंतर माजी सोव्हियेत संघातील किमान १७ महिला एपस्टीनच्या लैंगिक शोषण आणि तस्करीच्या जाळ्यात ओढल्या गेल्या होत्या . काही महिलांना नोकरी , व्हिसा आणि राहण्याची व्यवस्था देण्याच्या नावाखाली त्याच्यावर अवलंबून ठेवण्यात आले . त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे पिडीतांनी सांगितले आहे .

Pakistan News : भारताच्या भेटीवर पाकिस्तानचे मंत्री गदगदले; म्हणाले, ‘मला वाटते दोन्ही देशांचे संबंध सुधारतील

रशियन धन कुबेरांशी मैत्री; व्यावसायिक संबंध वाढवण्याचा प्रयत्न

२००८ मध्ये अल्पवयीन मुलींशी संबंधित लैंगिग गुन्ह्यात दोषी ठरवल्यानंतर एपस्टीनची प्रतिमा मोठ्या प्रमाणात खराब झाली होती . त्यानंतर त्याने रशियातील प्रभावशाली व्यावसायिकांशी संबंध वाढवण्यास सुरवात केली . रशियन अब्जाधीश व्लादिस्लाव डोरोनीन यांच्याशी त्याचे संबंध होते .

दोघांमध्ये मॉस्कोमधील कोट्यवधी डॉलर्सच्या रिअल इस्टेट प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याचे ई -मेलमधून समोर आले . याशिवाय अॅल्युमिनियम उद्योगातील उद्योगपती ओलेग डेरीपास्का याच्याशी संपर्क साधण्याचाही एपस्टीनने प्रयत्न केला होता . मात्र त्यांची प्रत्यक्षात भेट झाली नाही . रशियातील श्रीमंत उद्योगपतींच्या संपर्कातून आर्थिक संधी आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवणे हा त्याच्या प्रयत्नाचा महत्वाचा भाग होता .

Indonesia News : यूट्यूबची १९ हजारांहून अधिक चॅनेल्स हटवली; गुगलला इंडोनेशिया सरकारचा जाब

पुतीन भेटीसाठी अनेक प्रयत्न

एपस्टीनची सर्वात मोठी महत्वाकांक्षा म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची वैयक्तीक भेट घेणे . २०११ मध्ये त्याने पुतीन यांच्याशी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता . मात्र पुतीन यांची भेट झाल्याचे किंवा एपस्टीन रशियन गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे तपासात आढळलेले नाहीत . ऑगस्ट २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात एपस्टीनचा मृत्यू झाला, अधिकृतरीत्या आत्महत्या घोषित करण्यात आले .

Web Title: World news epstein russia putin ambition revelations cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • Epstein Files
  • Marathi News
  • Russia

संबंधित बातम्या

Pakistan News : भारताच्या भेटीवर पाकिस्तानचे मंत्री गदगदले; म्हणाले, ‘मला वाटते दोन्ही देशांचे संबंध सुधारतील
1

Pakistan News : भारताच्या भेटीवर पाकिस्तानचे मंत्री गदगदले; म्हणाले, ‘मला वाटते दोन्ही देशांचे संबंध सुधारतील

Indonesia News : यूट्यूबची १९ हजारांहून अधिक चॅनेल्स हटवली; गुगलला इंडोनेशिया सरकारचा जाब
2

Indonesia News : यूट्यूबची १९ हजारांहून अधिक चॅनेल्स हटवली; गुगलला इंडोनेशिया सरकारचा जाब

MakeMyTrip Travel Sale: Year-End Holiday चं प्लॅनिंग स्वस्तात! MakeMyTrip घेऊन आलं खास ऑफर्सचं पॅकेज
3

MakeMyTrip Travel Sale: Year-End Holiday चं प्लॅनिंग स्वस्तात! MakeMyTrip घेऊन आलं खास ऑफर्सचं पॅकेज

World News : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन एकाच मंचावर; तीन महासत्तांच्या नेत्यांची ऐतिहासिक बैठक
4

World News : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन एकाच मंचावर; तीन महासत्तांच्या नेत्यांची ऐतिहासिक बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.