Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaza News : हिवाळी पावसाने गाझातील विस्थापितांचे हाल; हजारो तंबू पाण्याखाली, दीड लाखांहून अधिक तंबू सीमेवर अडकले

Gaza News : गाझामधील हिवाळी पावसामुळे हजारो विस्थापित पॅलेस्टिनींचे तंबू पाण्याखाली गेले आहेत. दीड लाखांहून अधिक तंबू गाझाबाहेर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असून थंडी आणि आजारांचा धोका वाढला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 20, 2026 | 10:18 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पावसामुळे हजारो तंबूंचे नुकसान
  • दीड लाखांहून अधिक तंबू गाझाबाहेर
  • थंडी आणि आजारांचा वाढता धोका
Gaza News : गाझा पट्टीत हिवाळ्याच्या पावसाने विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांचे संकट अधिक गंभीर झाले आहे. आधीच युद्धामुळे घरे गमावलेल्या हजारो कुटुंबांना तात्पुरत्या तंबूंमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. मात्र, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हे तंबू फाटत असून अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. थंडी, पावसाचे पाणी आणि जीवनावश्यक सुविधांचा अभाव यामुळे लहान मुले, महिला आणि वृद्धांचे हाल होत आहेत.

पावसामुळे हजारो तंबूंचे नुकसान

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या हिवाळी वादळामुळे गाझामधील सुमारे ७० हजार तंबूंमध्ये पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे. अनेक विस्थापन छावण्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे कपडे, अन्नधान्य आणि इतर साहित्य भिजले.

काही ठिकाणी आधीच युद्धामुळे कमकुवत झालेल्या इमारतींच्या भिंती कोसळल्या. अनेक कुटुंबांना पुन्हा सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात बाहेर पडावे लागले. संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी कार्यालयाच्या माहितीनुसार, २६ हजारांहून अधिक कुटुंबांनी त्यांच्या निवाऱ्याचे किंवा वस्तूंचे नुकसान झाल्याची मदत मागितली आहे.

World News : एपस्टीनला रशिया का आवडायचा? महिला ,अब्जाधीश आणि पुतिनपर्यंत पोहोचण्याची महत्वाकांक्षा; धक्कादायक खुलासे

दीड लाखांहून अधिक तंबू गाझाबाहेर

पॅलेस्टिनी एनजीओ नेटवर्कचे मोहम्मद साल्हा यांनी मदत साहित्य गाझामध्ये पोहोचत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विस्थापित नागरिकांना तातडीने तंबू आणि निवारा साहित्याची गरज आहे; मात्र सीमांवरील निर्बंधांमुळे मदत पोहोचवण्यात अडथळे येत आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, मानवतावादी संस्था आणि सदस्य देशांनी खरेदी केलेले दीड लाखांहून अधिक तंबू गाझाबाहेर प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये इजिप्तमधील अल-अरिश येथे साठवलेल्या सुमारे १ लाख १७ हजार तंबूंचा समावेश आहे.

Indonesia News : यूट्यूबची १९ हजारांहून अधिक चॅनेल्स हटवली; गुगलला इंडोनेशिया सरकारचा जाब

थंडी आणि आजारांचा वाढता धोका

तंबूंमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी हिवाळा अधिक धोकादायक ठरत आहे. पावसाचे पाणी आणि थंडीमुळे लहान मुलांना श्वसनाचे आजार, त्वचेचे विकार आणि हायपोथर्मियाचा धोका वाढत आहे. आरोग्य सुविधांवरही पावसाचा परिणाम झाला असून काही ठिकाणी वैद्यकीय सेवा विस्कळीत झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनेही पुरेसा निवारा आणि मदत साहित्य उपलब्ध न झाल्यास हिवाळ्यात आणखी मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली आहे. दुसरीकडे, इस्रायलच्या मदत साहित्य प्रवेशावरील निर्बंधांवर मानवतावादी संघटनांनी टीका केली आहे. इस्रायलकडून मात्र मदत आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गाझातील नागरिकांना सुरक्षित निवारा मिळण्यासाठी सीमांवरील मदतपुरवठा वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Gaza news winter floods displaced palestinians tents cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 10:18 PM

Topics:  

  • Gaza
  • israel-palestine war
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : हंगेरीला पुन्हा फुटबॉल महासत्ता बनवण्याचे स्वप्न; फुटबॉलवेड्या पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी मोहीम
1

World News : हंगेरीला पुन्हा फुटबॉल महासत्ता बनवण्याचे स्वप्न; फुटबॉलवेड्या पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी मोहीम

World News : एपस्टीनला रशिया का आवडायचा? महिला ,अब्जाधीश आणि पुतिनपर्यंत पोहोचण्याची महत्वाकांक्षा; धक्कादायक खुलासे
2

World News : एपस्टीनला रशिया का आवडायचा? महिला ,अब्जाधीश आणि पुतिनपर्यंत पोहोचण्याची महत्वाकांक्षा; धक्कादायक खुलासे

Pakistan News : भारताच्या भेटीवर पाकिस्तानचे मंत्री गदगदले; म्हणाले, ‘मला वाटते दोन्ही देशांचे संबंध सुधारतील
3

Pakistan News : भारताच्या भेटीवर पाकिस्तानचे मंत्री गदगदले; म्हणाले, ‘मला वाटते दोन्ही देशांचे संबंध सुधारतील

Indonesia News : यूट्यूबची १९ हजारांहून अधिक चॅनेल्स हटवली; गुगलला इंडोनेशिया सरकारचा जाब
4

Indonesia News : यूट्यूबची १९ हजारांहून अधिक चॅनेल्स हटवली; गुगलला इंडोनेशिया सरकारचा जाब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.