Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Unemployment Rate : देशातील रोजगाराचे ‘हे’ आहे सध्याचे चित्र! कुठे खुशी, तर कुठे गम

India Unemployment Rate : भारतातील बेरोजगारी दरात सप्टेंबर 2026 मध्ये वार्षिक आधारावर 0.2 टक्के अंकांची घट नोंदवण्यात आली असून तो 5 टक्क्यांवर आला आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारी दरात घट झाली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 15, 2026 | 09:24 PM
India Unemployment Rate : देशातील रोजगाराचे 'हे' आहे सध्याचे चित्र! कुठे खुशी, तर कुठे गम

India Unemployment Rate : देशातील रोजगाराचे 'हे' आहे सध्याचे चित्र! कुठे खुशी, तर कुठे गम

Follow Us
Follow Us:
  • देशाचा बेरोजगारी दर सप्टेंबर २०२६ मध्ये ५ टक्क्यांवर आला
  • ग्रामीण बेरोजगारी दर ४.२ टक्क्यांवर; शहरी दर ६.८ टक्क्यांवर स्थिर
  • ग्रामीण महिलांचा श्रमशक्ती सहभाग दर वाढून ३८.९ टक्क्यांवर पोहोचला
 

भारतातील बेरोजगारी दरात (India Unemployment Rate) सप्टेंबर 2026 मध्ये वार्षिक आधारावर 0.2 टक्के अंकांची घट नोंदवण्यात आली असून तो 5 टक्क्यांवर आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारी दरात घट झाली असली, तरी शहरी भागातील दर 6.8 टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. त्यामुळे एकप्रकारे देशात कुठे खुशी, तर कुठे गम अशीच परिस्थिती आहे, म्हणावी लागेल.

NSOच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील बेरोजगारी दर सप्टेंबरमध्ये 0.4 टक्के अंकांनी घटून 4.2 टक्क्यांवर आला. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 4.6 टक्के होता. दुसरीकडे, शहरी भागातील बेरोजगारी दर गेल्या वर्षीच्या तुलनेत बदल न होता 6.8 टक्क्यांवर कायम राहिला.

 

श्रम सहभाग दरात वाढ

सप्टेंबरमध्ये देशातील श्रमशक्ती सहभाग दर (LFPR) वार्षिक आधारावर 0.2 टक्के अंकांनी वाढून 55.5 टक्क्यांवर पोहोचला. सप्टेंबर 2025 मध्ये तो 55.3 टक्के होता. ग्रामीण भागातील श्रमशक्ती सहभाग दर 57.4 टक्क्यांवरून वाढून 58 टक्के झाला. मात्र, शहरी भागातील हा दर 50.9 टक्क्यांवरून घसरून 50.7 टक्क्यांवर आला.

तथापि, शहरी भागातील श्रमशक्ती सहभाग दरात मासिक आधारावर 0.3 टक्के अंकांची सुधारणा दिसून आली.

Reliance: जिओच्या IPO आधी आकाश अंबानींचा मास्टरप्लॅन तयार! मोबिलिटीपासून डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी झेप

महिलांच्या श्रम सहभागात चढ-उतार

सप्टेंबर 2026 मध्ये देशातील महिलांचा एकूण श्रमशक्ती सहभाग दर 34.6 टक्के नोंदवण्यात आला. ऑगस्टमध्ये तो 34.8 टक्के होता. मात्र, वार्षिक आधारावर त्यात 0.5 टक्के अंकांची वाढ झाली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये हा दर 34.1 टक्के होता.

ग्रामीण महिलांचा श्रमशक्ती सहभाग दर 37.9 टक्क्यांवरून वाढून 38.9 टक्क्यांवर पोहोचला. शहरी महिलांच्या बाबतीत मासिक आधारावर 0.5 टक्के अंकांची वाढ नोंदवण्यात आली. हा दर 25.4 टक्क्यांवरून वाढून 25.9 टक्के झाला. ऑक्टोबर 2025 नंतरची ही या दराची सर्वोच्च पातळी आहे.

Earn Money Selling Old Clothes Online : जुने कपडे फेकून देण्याऐवजी विकून करा कमाई! ऑनलाइन कुठे, कसे विकायचे? जाणून घ्या ट्रिक्स

शहरी रोजगार निर्देशांकात सुधारणा

सप्टेंबरमध्ये देशातील एकूण श्रमिक लोकसंख्या प्रमाण (WPR) 52.7 टक्क्यांवर जवळपास स्थिर राहिले. वार्षिक आधारावर त्यात 0.3 टक्के अंकांची वाढ झाली. सप्टेंबर 2025 मध्ये हे प्रमाण 52.4 टक्के होते.

शहरी भागातील श्रमिक लोकसंख्या प्रमाण ऑक्टोबर 2025 नंतरच्या सर्वोच्च म्हणजेच 47.2 टक्क्यांवर पोहोचले. शहरी पुरुषांचे हे प्रमाण 70.7 टक्क्यांवरून वाढून 71 टक्के झाले, तर महिलांचे प्रमाण 23.2 टक्क्यांवरून वाढून 23.5 टक्क्यांवर पोहोचले.

NSOच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये बेरोजगारी दरात झालेली घट प्रामुख्याने ग्रामीण भागात दिसून आली. त्याचवेळी महिलांचा श्रम सहभाग आणि शहरी श्रमिक लोकसंख्या प्रमाण यांमध्येही काही सकारात्मक बदल नोंदवण्यात आले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सप्टेंबर २०२६ मध्ये भारताचा बेरोजगारी दर किती होता?

    Ans: राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, भारताचा बेरोजगारी दर ५ टक्के होता.

  • Que: ग्रामीण भागातील बेरोजगारी दर किती झाला?

    Ans: ग्रामीण भागातील बेरोजगारी दर ४.२ टक्क्यांवर आला. गेल्या वर्षी याच काळात तो ४.६ टक्के होता.

  • Que: शहरी भागातील बेरोजगारी दर किती आहे?

    Ans: सप्टेंबर २०२६ मध्ये शहरी भागातील बेरोजगारी दर ६.८ टक्क्यांवर स्थिर राहिला.

  • Que: श्रमिक लोकसंख्या प्रमाण (WPR) म्हणजे काय?

    Ans: एकूण लोकसंख्येपैकी रोजगारात असलेल्या व्यक्तींचे प्रमाण म्हणजे श्रमिक लोकसंख्या प्रमाण (Worker Population Ratio).

Web Title: India unemployment rate falls to 5 percent september 2026 nso rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • Rural Development
  • Urban Development Department
  • women employment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.