
नोव्हेंबरमध्ये ऑटो सेक्टरची झेप! सर्व कंपन्यांच्या विक्रीत जबरदस्त वाढ
Indian Auto Sector Sales: नोव्हेंबरमध्ये प्रत्येक कंपनीची विक्री वाढल्याने उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्र सध्या वेगाने वाढत आहे. देशातील विविध कार उत्पादकांनी नोव्हेंबर महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. कंपन्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. मारुती, हूंदाई, टाटा आणि महिंद्रा यांच्यासह इतर कंपन्यांच्या वाहनांच्या विक्रीत वाढ दिसून आली आहे.
नोव्हेंबरमध्ये एकूण वाहन विक्री वर्षानुवर्षे २६ टक्क्यांनी वाढून २२९,०२१ युनिट्सवर पोहोचली आहे. कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात १८१,५३१ वाहने विकली होती. मारुती सुझुकी यांनी सोमवारी सांगितले की, देशांतर्गत घाऊक विक्री वर्षानुवर्षे २१ टक्क्यांनी वाढून १७०,९७१ युनिट्सवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात १४१,३१२ युनिट्स होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये अल्टो आणि एस-प्रेसोसह छोट्या कारची विक्री वाढून १२,३४७युनिट्स झाली, जी नोव्हेंबर २०२४ मध्ये ९.७५० युनिट्स होती.
हुंडई मोटर इंडियाने नोंदवले की, या वर्षी नोव्हेंबरमध्ये एकूण विक्रीत ९ टक्क्यांनी वाढ होऊन ती ६६,८४० युनिट्स झाल्ली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने त्यांच्या डीलर्सना ६१,२५२ युनिट्स पाठवल्या होत्या. कंपनीची देशांतर्गत विक्री ५०,३४० युनिट्सवर पोहोचली, जी नोव्हेंबर २०२४ मध्ये ४८,२४६ युनिट्स होती, ज्यामुळे देशांतर्गत विक्रीत ४ टक्के वाढ झाली. नोव्हेंबर २०२५ मध्ये निर्यात एकूण १६,५०० युनिट्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षों याच कालावधीत १३.००६ युनिट्स होती.
व्हेइकल्सची विक्री नोव्हेंबरमध्ये वार्षिक आधारावर २६ टक्क्यांनी वातून ५९,१९९ युनिट्स झाली आहे. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ४७,११७ वाहने डीलर्सना पाठवली होती. टाटा मोटर्सने सांगितले की, त्यांची देशांतर्गत विक्री नोव्हेंबर २०२४ मधील ४७,०६३ युनिट्सवरून २२ टक्क्यांनी वाढून नोव्हेंबर २०२५ मध्ये ५७,४३६ युनिट्स झाली आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांची विक्री वर्षानुवर्षे २९ टक्क्यांनी वाढून ३५,५३९ युनिट्स इवली आहे. या कालावधीत देशांतर्गत विक्री २५ टक्क्यांनी वाढली आहे.
हेही वाचा : Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या किंमतीवर निवडणुकीचा परिणाम? 24 तासांत दरात झाली मोठी वाढ
वाहन उत्पादक महिंद्राची नोव्हेंबरमध्ये एकूण विक्री १९ टक्क्यांनी वाढून ९२.६७० युनिट्स झाली आहे. महिंद्रा अॅड महिंद्रा (एम अॅड एम) ने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवासी वाहन विभागात, कंपनीने देशांतर्गत बाजारात ५६.३३६ वाहने विकली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ४६.२२२ वाहनांपेक्षा २२ टक्के जास्त आहे. तसेच, नोव्हेंबरमधील विक्री वर्षानुवर्षे २४ टक्क्यांनी वाढून २५,४८९ यूनिट्सवर पोहोचली, कंपनीने नोव्हेंबर २०२४ मध्ये २०,६०० युनिट्सची विक्री केली.
टोयोटा किर्लोस्कर मोटरची घाऊक विक्री नोव्हेंबरमध्ये १९ टक्क्यांनी वाढून ३०,०८५ युनिट्सवर पोहोचली. कंपनीने नोव्हेंबर २०२४ मध्ये २५,१८२ युनिट्स विकले. रॉयल एनफिल्डची नोव्हेंबरमध्ये एकूण विक्री वर्षानुवर्ष २२ टक्क्यांनी वाढून १००,६७० युनिट्स झाली. कंपनीने नोव्हेंबर २०२४ मध्ये ८२.२५० युनिट्स विकल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये बजाज ऑटोची देशांतर्गत दुचाकी विक्री वर्षानुवर्षे एक टक्क्याने घटून २०२,५१० युनिट्स झाली.