Share Market Today: सपाट पातळीवर उघडणार आजचा शेअर बाजार! पुढील काही तास ठरू शकतात निर्णायक, तज्ज्ञांचा अंदाज जाणून घ्या
सोमवारी, भारतीय शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २६,२०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ६४.७७ अंकांनी म्हणजेच ०.०८% ने घसरून ८५,६४१.९० वर बंद झाला, तर निफ्टी ५० २७.२० अंकांनी म्हणजेच ०.१०% ने घसरून २६,१७५.७५ वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ७१.३५ अंकांनी किंवा ०.१२% ने घसरून ५९,६८१.३५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आजच्या व्यवहारात नफा मिळावा, यासाठी तीन शेअर्सची शिफारस केली आहे. चंदन टपारिया यांच्या सल्ल्यानुसार आज गुंवणूकदार सिटी युनियन बँक , इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX) आणि वन ९७ कम्युनिकेशन्स (Paytm) चे शेअर्स खरेदी करू शकतात. बाजारातील तज्ज्ञांनी केलेल्या शिफारसीनुसार, आज गुंतवणूकदार बजाज हाऊसिंग फायनान्स, अंबुजा सिमेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारतीय हॉटेल्स, भारत डायनॅमिक्स, ह्युंदाई मोटर इंडिया, एनएमडीसी, अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, टाटा मोटर्स, आदित्य बिर्ला कॅपिटल या शेअर्सवर अधिक लक्ष केंद्रीत करू शकतात.
प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे ट्रेडिंग स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये NHPC, PB फिनटेक किंवा पॉलिसी बाजार आणि इन्फो एज (नोकरी) यांचा समावेश आहे.
मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे विष्णुकांत उपाध्याय आणि चॉइस इक्विटी ब्रोकिंगचे हितेश टेलर यांनी पुढील १-२ आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी सहा स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये एमआरपीएल, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (एलटीटीएस), वरुण बेव्हरेजेस (VBL), कल्याण ज्वेलर्स इंडिया, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि मॅरिको या शेअर्सचा समावेश आहे.
सुमीत बगाडिया (चॉईस ब्रोकिंग), गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) या बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये सिटी युनियन बँक लिमिटेड, वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम), गेल (इंडिया) लिमिटेड, सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, इंडियन बँक , मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआरपीएल) आणि नॅटको फार्मा लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे.






