Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय रिटस् मार्केटची दमदार घोडदौड; परतावा आणि विकासाच्या बाबतीत आशियाई देशांना टाकले मागे, अनॅरॉक अहवाल

भारतीय REITs कडून गुंतवणूकदारांना ९% परतावा! आशियाई देशांच्या तुलनेत भारत गुंतवणूक क्षेत्रात अव्वल. ६७ हजार कोटींच्या कमाईची संधी. वाचा सविस्तर अहवाल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 03, 2026 | 06:06 PM
भारतीय रिटस् मार्केटची दमदार घोडदौड; परतावा आणि विकासाच्या बाबतीत आशियाई देशांना टाकले मागे, अनॅरॉक  अहवाल
Follow Us
Follow Us:

 

  • भारतीय रिटस् मार्केटची दमदार घोडदौड
  • परतावा आणि विकासाच्या बाबतीत आशियाई देशांना टाकले मागे
  • अनॅरॉक अहवाल
मुंबई, २ एप्रिल २०२६: भारताचे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रीटस्) मार्केट सध्या जोरदार प्रगती करत असून, केवळ देशांतर्गतच नव्हे, तर आशियाई देशांच्या तुलनेत एक आकर्षक गुंतवणूक पर्याय म्हणून समोर येत आहे.

नॅरेडको महाराष्ट्र नेक्स्टजेन द्वारे आयोजित ‘एक्सेलरेट २०२६’ या फिनक्लेव्हच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनरॉकच्या ताज्या अहवालानुसार, भक्कम पायाभूत सुविधा, नियामक पाठबळ आणि वाढता गुंतवणूकदार विश्वास यामुळे हे क्षेत्र वेगाने परिपक्व आणि उच्च कामगिरी करणारे मालमत्ता क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. अहवालात पुढे नमूद केले आहे की, २०२५ मध्ये ‘स्मॉल अँड मीडियम रीट्ससच्या समावेशामुळे रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीला अधिक चालना मिळाली आहे. यामुळे ‘फ्रॅक्शनल ओनरशिप’ मॉडेलच्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग सुलभ झाला असून, ६७,००० ते ७१,००० कोटी रुपयांच्या कमाईची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

अहवालात आशियाई बाजारपेठांच्या तुलनेत भारताच्या वाढत्या स्पर्धात्मकतेवर भर देण्यात आला आहे, कारण भारताने हाँगकाँगसारख्या परिपक्व केंद्रांच्या बरोबरीने विस्तार साध्य केला आहे. याशिवाय, भारतीय रिटस्ने गेल्या पाच वर्षांत जवळपास ९% इतका उत्कृष्ट परतावा दिला आहे, जो अनेक प्रादेशिक देशांच्या तुलनेत अधिक आहे. तसेच त्यांचा ‘डिस्ट्रीब्युशन यील्ड’ ५ ते ६% इतका स्पर्धात्मक राहिला आहे.

Price Rise in Air Travel : विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर! दर भिडले गगनाला, पाहा किती मोजावे लागणार पैसे?

अहवालाच्या निरीक्षणानुसार, भारतीय रिट्सच्या यशात त्यांच्या कामकाजातील कामगिरीचा मोठा वाटा आहे. भारतीय रिट्समधील पोर्टफोलिओ ऑक्युपन्सी (मालमत्ता व्यापण्याचे प्रमाण) सातत्याने ९०% च्या वर राहिली आहे, ज्यामध्ये तंत्रज्ञान, बँकिंग आणि वित्त, सल्लागार आणि दूरसंचार अशा क्षेत्रांतील जागतिक कंपन्यांचा समावेश आहे. भाडेतत्वावर देण्याच्या प्रक्रियेबाबत सकारात्मकता व्यक्त करताना अहवालात म्हटले आहे की, २०२६ आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताच्या एकूण ऑफिस लीजिंगमध्ये रिट्सचा वाटा २०% हून अधिक होता.

करांमधील सवलत हा रिट्सकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. नियामक नियमांनुसार, रिट्सना त्यांच्या निव्वळ वितरणपात्र रोकड प्रवाहापैकी किमान ९०% रक्कम गुंतवणूकदारांना वाटणे बंधनकारक आहे. तसेच, ६५% पेक्षा जास्त वितरण हे गुंतवणूकदारांसाठी करमुक्त असल्याने कर-पश्चात परतावा लक्षणीयरीत्या वाढतो.

भारतातील केवळ ३२% ‘रिट्स-पात्र’ मालमत्ता सध्या सूचीबद्ध आहेत, त्यामुळे भविष्यात विस्तारासाठी मोठी संधी असल्याचे अहवालात म्हटले आहे. लॉजिस्टिक पार्क, डेटा सेंटर्स, आरोग्य सुविधा आणि निवासी रिअल इस्टेट यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधील विस्तारामुळे गुंतवणुकीची व्याप्ती अधिक वाढेल.

HDFC बँकेचा मोठा दणका! 12 बड्या अधिकाऱ्यांचं Increment रोखलं, Employee Stock Option ही रद्द; नेमकं प्रकरण काय?

Web Title: Indian reit market growth anarock report naradco accelerate 2026 updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • Business News
  • investment

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे देशातील इंधन दरांबाबत सर्वात मोठे विधान
1

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे देशातील इंधन दरांबाबत सर्वात मोठे विधान

श्रीराम फायनान्सने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले! आता गुंतवणुकीवर मिळणार ७.५०% पर्यंत व्याज; जाणून घ्या नवे दर
2

श्रीराम फायनान्सने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले! आता गुंतवणुकीवर मिळणार ७.५०% पर्यंत व्याज; जाणून घ्या नवे दर

RBI Rules: बँक खात्याचे KYC अपडेट नसल्यास Freez होऊ शकतं अकाऊंट? काय आहे RBI चा नियम
3

RBI Rules: बँक खात्याचे KYC अपडेट नसल्यास Freez होऊ शकतं अकाऊंट? काय आहे RBI चा नियम

एबीबी इनोव्हेशन सेंटर मध्ये 37 देशांतील 1,000 हून अधिक नवोन्मेषक एकत्र आले; औद्योगिक एआय विकासाला मिळणार गती
4

एबीबी इनोव्हेशन सेंटर मध्ये 37 देशांतील 1,000 हून अधिक नवोन्मेषक एकत्र आले; औद्योगिक एआय विकासाला मिळणार गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.