Stock Market Today: आनंदवार्ता! सकारात्मक पातळीवर उघडणार शेअर बाजार, 'हे' स्टॉक्स खरेदी करून तुम्हीही मालामाल
गुरुवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली, ज्यामुळे सलग तीन दिवसांच्या प्रभावी तेजीला ब्रेक लागला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,००० च्या पातळीजवळ घसरला. सेन्सेक्स २,४ ९६.८९ अंकांनी, म्हणजेच ३.२६ टक्क्यांनी घसरून ७४,२०७.२४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ७७५.६५ अंकांनी, म्हणजेच ३.२६ टक्क्यांनी घसरून २३,००२.१५ वर स्थिरावला. बँक निफ्टी निर्देशांक गुरुवारी १,८७५.०५ अंकांनी, म्हणजेच ३.३९ टक्क्यांनी घसरून ५३,४५१.०० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (SVP) अजित मिश्रा यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन शेअर्सची शिफारस केली आहे. अजित मिश्रा यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टाटा पॉवर कंपनी, पीजी इलेक्ट्रोप्लास्ट यांचा समावेश आहे. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज गुंतवणूकदारांना पाच शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. राजा व्यंकटरमण यांनी इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड, ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी लिमिटेड, कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड हे पाच शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
Anil Ambani च्या संकटात वाढ! CBI च्या कार्यालयात तासनतास चौकशी, काय आहे नक्की प्रकरण
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आजच्या व्यवहारात खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना पाच शेअर्सची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया यांनी सल्ला दिल्याप्रमाणे आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार टॉरेंट पॉवर, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, लिंडे इंडिया, फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर आणि कोल इंडिया हे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार, एचडीएफसी बँक, टाटा एल्क्सी, एनटीपीसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, जेके सिमेंट, जेएसडब्ल्यू सिमेंट, आयसीआयसीआय बँक, एनबीसीसी, अंबर एंटरप्रायझेस या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.






