फोटो सौजन्य सोशल मिडिया
महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तसेच डोंगरमाथ्यावरील शेतांमध्ये वाटाणा, फरसबी यांसारख्या नगदी पिकांची लागवड केली जाते. पावसाच्या दीर्घ खंडामुळे या पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला होता. विशेषतः स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी आवश्यक ओलावा मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. आता झालेल्या पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढून स्ट्रॉबेरी पिकाला नैसर्गिक नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
Karanja : विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक, शेतकरी एल्गार समितीतर्फे आंदोलन; प्रशासनाचे वेधले लक्ष
दुसरीकडे, जमिनीखाली तयार झालेला भुईमूग काढणेही पावसाअभावी कठीण झाले होते. कडक जमिनीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना खुरप्याने माती टोकरून भुईमूग काढावा लागत होता. मात्र, पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्याने आता भुईमूग सहज उपटून काढणे शक्य झाले आहे.
यंदा पेरणीसाठी केलेला खर्च तरी पदरात पडेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. काहींच्या मते, पेरलेले बियाणे तरी परत मिळेल का, अशी परिस्थिती होती. त्यामुळे झालेल्या पावसाने दिलासा मिळाला असला, तरी उत्पादनाच्या नुकसानीची चिंता कायम आहे.






