फोटो सौजन्य- Social Media
देशातील बहुप्रतिक्षित रेसिंग इव्हेण्ट व्हॅली रन– विंटर एडिशन ही २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. भारतातील आघाडीच्या उच्च- कार्यक्षम ल्युब्रिकण्ट उत्पादन कंपनी असलेल्या कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड या रेसिंग इव्हेण्ट व्हॅली रन– विंटर एडिशनसाठी टायटल स्पॉन्सरशिपची घोषणा केली आहे. पुण्यातील अॅम्बी व्हॅली एअरस्ट्रिप येथे ड्रॅग रेस इव्हेण्टचे आयोजन करण्यात आले आहे.
६०० हून अधिकांचा सहभाग आणि १२००० हून अधिक प्रेक्षक
नवीन एडिशन स्टण्ट्स, ड्रिफ्टिंग प्रदर्शन व रेसेससह देशातील सर्वात वेगवान कार्स आणि मोटरसायकल्सच्या अॅड्रेनालाइन-पॅक प्रदर्शनाची माहिती देते. ६०० हून अधिक सहभागी आणि तब्बल १२,००० हून अधिक प्रेक्षक यामध्ये सहभागी होतील. यावरुनच अॅक्शनने भरलेल्या दोन दिवसांमध्ये या इव्हेंटची लोकप्रियता त्यात सहभागी होणाऱ्या वाहनचालक ते प्रेक्षकांपासून कळते. ज्यामधून वेग, अचूकता व नाविन्यतेचा अनुभव मिळणार आहे.
कॅस्ट्रॉल इंडिया अॅम्बेसेडर्स करणार बाईकिंग
या इव्हेण्टमध्ये कॅस्ट्रॉल इंडिया परस्पसंवादी उपक्रमांच्या माध्यमातून आपली प्रमुख उत्पादने कॅस्ट्रॉल पॉवर१ आणि कॅस्ट्रॉल एजला दाखवेल, ज्यामध्ये त्यांच्या अपवादात्मक परफॉर्मन्स क्षमता पाहायला मिळतील. तसेच, कॅस्ट्रॉल सर्व सहभागींना लास्ट माइल वेइकल तपासणी देण्यासाठी कॅस्ट्रॉल परफॉर्मन्स पिटस्टॉप स्थापित करेल, ज्यामुळे त्यांच्या रेसिंग अनुभवामध्ये अधिक उत्साहाची भर होईल. तसेच उत्साहामध्ये अधिक भर करत कॅस्ट्रॉल इंडिया अॅम्बेसेडर्स श्वेता चिथ्रोडे व जसमिंदर सिंग (जेएस फिल्म्स) हे या ईव्हेंटमध्ये सक्रिय सहभागी होणार आहेत आणि या वर्षी व्हॅली रन ड्रॅग रेसमध्ये मोटरस्पोर्ट्समधील त्यांची कौशल्ये दाखवतील.
कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडच्या विपणन विभागाचे उपाध्यक्ष रोहित तलवार म्हणाले, “देशात मोटरस्पोर्ट्स रेसिंग संस्कृती झपाट्याने वाढत आहे आणि कॅस्ट्रॉलला या उत्साहवर्धक इव्हेण्टमध्ये उच्च-कार्यक्षम इंजिनांना शक्ती देण्याचा वारसा आणण्याचा अभिमान वाटतो. कॅस्ट्रॉल एज आणि कॅस्ट्रॉल पॉवर१ गती देत असताना आमचा सर्वोत्तम कार्यक्षमता देण्याचा मनसुबा आहे, ज्यामध्ये ड्रॅग रेसिंगचा रोमांच व अचूकता समाविष्ट आहे.’’
कॅस्ट्रॉल इंडिया उच्च-कार्यक्षम रेसिंगला पाठिंबा देत, उच्च सुरक्षितता मानक राखत आणि समुदायामधील टॅलेंटला निपुण करत मोटरस्पोर्ट्सला पाठिंबा देते. प्रीमियर मोटो-रेसिंग कॉम्पीटिशन – कॅस्ट्रॉल पॉवर१ प्रस्तुत इंडियाज अल्टिमेट मोटोस्टार अशा उपक्रमांसह कॅस्ट्रॉल महत्त्वाकांक्षी रेसर्सना त्यांची कौशल्ये निपुण करण्यास, त्यांची क्षमता दाखवण्यास आणि त्यांची स्वप्ने साकारण्यास प्लॅटफॉर्म देते. अशा उपक्रमांच्या माध्यमातून मोटरस्पोर्ट उत्साहींना सक्षम करत कॅस्ट्रॉल इंडिया कार्यक्षमता, अचूकता व दर्जाप्रती महत्व देत आहे, तसेच चॅम्पियन्सच्या भावी पिढीला निपुण करत आहे आणि देशभरात रेसिंग संस्कृतीच्या विकासाला गती देत आहे.