इंडिगोने प्रवाशांसाठी अधिकृत निवेदन जारी केले
इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि शक्य तितक्या लवकर सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत. ग्राहकांना नवीनतम सल्ला आणि अपडेट्ससाठी आमचे अधिकृत चॅनेल पाहत राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आम्ही सामान्य सेवा पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहोत आणि तुमच्या संयम आणि समजुतीबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत.” इंडिगो व्यतिरिक्त, टाटा ग्रुप एअरलाइन एअर इंडियाने मंगळवारी नेपाळमध्ये सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि काठमांडू दरम्यान उड्डाण करणाऱ्या 4 उड्डाणे रद्द केली.
Travel Advisory
In view of the prevailing situation in #Kathmandu, the airport has been closed for operations. Consequently, all flights to and from Kathmandu stand suspended as of now.
If your travel is impacted, you may conveniently opt for an alternate flight or claim a…
— IndiGo (@IndiGo6E) September 9, 2025
एअर इंडियाने काठमांडूला जाणाऱ्या ४ उड्डाणे रद्द केली
मंगळवारी काठमांडूचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद झाल्यानंतर इंडिगो आणि नेपाळ एअरलाइन्सने त्यांच्या उड्डाणे रद्द केली. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, “काठमांडूमधील सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता, दिल्ली-काठमांडू-दिल्ली मार्गावरील AI 2231/2232, AI 2219/2220, AI 217/218 आणि AI 211/212 या उड्डाणे आज (मंगळवार) रद्द करण्यात आली आहेत.
काठमांडू विमानतळावर पोहोचल्यानंतर परिसरातून धूर येत असल्याचे दिसल्यानंतर मंगळवारी एअर इंडियाचे एक विमान दिल्लीला परतले, असे सूत्रांनी सांगितले.