Indriya Jewellery कडून 'आस्मानियत' डायमंड कलेक्शन लाँच
आदित्य बिर्ला ग्रुपच्या इंद्रिया या ज्वेलरी ब्रँडकडून ‘आस्मानियत’ हे अलौकिक डायमंड कलेक्शन सादर करण्यात आले आहे. या कलेक्शनची संकल्पना ब्रह्मांडातील रहस्य, तेज आणि रंगछटांपासून प्रेरित आहे. यामध्ये हिरे, मौल्यवान रत्ने आणि उत्कृष्ट कारागिरी यांचे आकर्षक मिश्रण आहे. इंद्रियाने हे कलेक्शन केवळ सौंदर्यप्रदर्शनापुरते न ठेवता आधुनिक स्त्रीच्या आत्मविश्वास आणि अभिव्यक्तीचा साज मांडण्यासाठी तयार केले आहे.
आस्मानियतमध्ये हार, बांगड्या, अंगठ्या आणि इअररिंग्सचा समावेश असून, प्रत्येक दागिना पारंपरिक तंत्र आणि समकालीन डिझाईनचे संयोजन सादर करतो. या आभूषणांमध्ये ट्वायलाइट ब्लू, ऑरोरा ग्रीन यांसारख्या रंगछटांनी प्रेरित रत्ने वापरण्यात आली आहेत, जी आकाशातील रंगसंगतीसारखी वाटतात. या कलेक्शनमधून इंद्रियाचा कलात्मक दृष्टिकोन, भारतातील कारागिरीचा वारसा आणि जागतिक दर्जाची अचूकता प्रकट होते.
या इलेक्ट्रिक कारने Tata च्या लोकप्रिय EVs ला दाखवला बाहेरचा रस्ता, सटासट विकले गेले 19,394 युनिट्स
या कलेक्शनसाठी प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी हिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आले असून, प्रतिष्ठित दिग्दर्शिका अन्विता दत्त यांनी या कॅम्पेनची निर्मिती केली आहे. जाहिरातीत ब्रह्मांडात हरवलेल्या स्त्रीचे दृष्य दाखवले आहे, जिथे तारे, आकाशगंगा आणि ऑरोरा बोरेलिसच्या सौंदर्यातून प्रेरणा घेऊन दागिन्यांचे तेज तिच्या व्यक्तिमत्वात मिसळते. या मोहक व्हिज्युअल्समुळे दागिन्यांमधील सौंदर्य अधिक खुलून दिसते.
इंद्रियाचे मार्केटिंग प्रमुख शांतिस्वरूप पांडा म्हणाले, “’आस्मानियत’ हे केवळ दागिन्यांचे कलेक्शन नसून, आधुनिक स्त्रीच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आहे. हे आभूषण महिलांना त्यांच्या अनोख्या मोहकतेसह स्वतःला साजरे करण्याची प्रेरणा देते.”
डिझाईन आणि आरअॅण्डडी विभागाचे प्रमुख अभिषेक रस्तोगी म्हणाले, “प्रत्येक दागिना ब्रह्मांडातील आश्चर्य आणि सखोलतेचा अनुभव देतो. हे दागिने परिधान केल्यावर जणू काही आपण ताऱ्यांच्या सान्निध्यात आहोत, असे वाटते.”
घरादारावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या Osho कडे तब्बल 93 Rolls Royce Cars, एवढा पैसा आला कुठून?
इंद्रियाचे भारतातील 25 स्टोअर्स दिल्लीत पाच, हैदराबादला चार, मुंबई व पुण्यात प्रत्येकी तीन, तर अहमदाबाद, जयपूर, पटणा, इंदूर, सुरत, आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेशातही विस्तारले आहेत. यामुळे ब्रँडचा प्रेझेन्स आणि ग्राहकांशी असलेली जवळीक अधोरेखित होते.
जुलै 2024 मध्ये सुरु झालेल्या इंद्रिया ब्रँडचा उद्देश केवळ पारंपरिक दागिने देणे नाही, तर संवेदी अनुभव, आधुनिक डिझाइन आणि सांस्कृतिक वारशाचा मिलाफ सादर करणे आहे. वधूंसाठी खास डिझाईन केलेल्या कलेक्शनपासून ते वैयक्तिक अभिव्यक्तीपर्यंत इंद्रिया प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खास क्षण अधिक सुंदर बनवतो.