फोटो सौजन्य: @MGMotorIn (X.com)
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे. हीच वाढती मागणी अनेक ऑटो कंपन्यांना इलेक्ट्रिक वाहन उत्पादित करण्यास प्रोत्साहित करत आहे. ग्राहक देखील इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहेत.
भारतात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करीत आहेत. सध्या मार्केटमध्ये टाटा दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. मात्र, टाटाच्या इलेक्ट्रिक कार्सना MG Windsor EV ने जोरदार टक्कर केली आहे. एमजी विंडसर ईव्हीने विक्रीच्या बाबतीत सर्व विक्रम मोडले आहेत. FY2025 मध्ये, विंडसर ईव्हीने 19,394 युनिट्सच्या विक्रीसह अव्वल स्थान पटकावले आहे..
FY 2025 मध्ये भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात ग्राहकांचा कल झपाट्याने वाढला आहे. तसेच, या काळात एमजी विंडसर ईव्ही सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार बनली आहे. एमजी विंडसर ईव्हीने एकूण 19,394 युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामुळे ती नंबर-1 वर पोहोचली.
यानंतर, टाटा पंच ईव्ही दुसऱ्या स्थानावर होती, 17,966 युनिट्स विकल्या गेल्या. Tata Tiago EV तिसऱ्या स्थानावर होती, जी 17,145 ग्राहकांनी खरेदी केली. Tata Nexon EV चौथ्या स्थानावर होती आणि त्याने 13,978 युनिट्स विकल्या. एमजी कॉमेट ईव्ही पाचव्या स्थानावर, १०,१४९ युनिट्स विकल्या.
टाटा कर्व्ह ईव्ही सहाव्या स्थानावर असून या कारचे 7,534 युनिट्स विकले गेले. तर MG ZS EV सातव्या स्थानावर होती, जिथे या कारचे 7,042 युनिट्स विकल्या. या यादीत Mahindra XEV 9e आठव्या स्थानावर आहे. या कारचे 5,422 युनिट्स विकले गेले आहे. तर Mahindra XUV400 नवव्या स्थानावर आहे. या कारला 4,843 ग्राहकांनी पसंत केली आहे. Tata Tigor EV दहाव्या स्थानावर असून या कारचे 4,820 युनिट्स विकले गेले आहे.
घरादारावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या Osho कडे तब्बल 93 Rolls Royce Cars, एवढा पैसा आला कुठून?
विक्रीच्या बाबतीत एमजी विंडसर ईव्ही पहिल्या स्थानापर्यंत पोहोचण्यामागे अनेक कारणे आहेत. या कारचे फ्यूचरिस्टिक डिझाइन आणि प्रीमियम आहे, जे ग्राहकांना आकर्षित करते. त्यात कुटुंबासाठी अनुकूल एमपीव्हीसारखी जागा आहे, ज्यामुळे ही कार मोठ्या कुटुंबांसाठी देखील एक परिपूर्ण ईव्ही बनते.
एमजी विंडसर ईव्ही वेगवेगळ्या बॅटरी व्हेरिएंट्समध्ये येते, जे लॉंग रेंज ऑफर करते. त्यात एडीएएस, पॅनोरॅमिक सनरूफ, डिजिटल कन्सोल आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसारखी प्रगत फीचर्स आहेत. इतर प्रीमियम ईव्हीच्या तुलनेत त्याची किंमत देखील परवडणारी आहे, ज्यामुळे ही कार बजेट फ्रेंडली सुद्धा आहे.