फोटो सौजन्य: luxury (X.com)
भारतीय भूमीत असे अनेक अध्यात्मिक गुरु झालेत, ज्यांनी लाखो लोकांना आपल्याकडे प्रभावित केले. वेळप्रसंगी काही वादग्रस्थ बाबांचे प्रकरण सुद्धा भारतात गाजले. यातीलच एक वादग्रस्थ नाव म्हणजे ओशो. ओशोचे विचार नेहमीच वादात सापडले आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
मध्य प्रदेशातील कुचवाडा गावात 11 डिसेंबर 1931 रोजी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव चंद्र मोहन जैन. या मुलाचे इतर मुलांप्रमाणेच संगोपन झाले. मात्र, तो लहानपणापासूनच वेगळा होता. तो कायमच प्रश्न विचारत असे आणि नवनवीन प्रयोग करत असे. शालेय शिक्षणानंतर हा मुलगा कॉलेजला पोहोचला तेव्हा चक्क त्याचे प्राध्यापकाशी भांडण झाले. यानंतर प्राध्यापकांनी त्या मुलाची तक्रार केली. हा प्रश्न विचारणारा मुलगा म्हणजे आचार्य रजनीश ज्याला अनेक जण ओशो म्हणून ओळखतात.
1957 मध्ये, जेव्हा रजनीश फक्त 26 वर्षांचा होता, तेव्हा त्यांनी रायपूर येथील संस्कृत विद्यापीठात व्याख्याता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे तीन वर्षांनंतर, रजनीश 1960 मध्ये जबलपूर विद्यापीठात आला आणि तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक झाला.
इतर विद्यार्थ्यांना शिकवण्यात रजनीश इतका मग्न झाला की त्याच्या तोडीस तोड असणारा दुसरा कोणीही प्राध्यापक नव्हता. काही दिवसांनी, त्याने धर्म, राजकारण आणि समाज या सर्व गुंतागुंतीच्या विषयांवर व्याख्याने देण्यास सुरुवात केली.
यानंतर रजनीश शारीरिक संबंधांवर बोलू लागला. त्या काळात लैंगिकता शब्दच निषिद्ध मानला जात होता आणि कोणीही त्याबद्दल सार्वजनिकपणे बोलणे पसंत करत नव्हते. काही काळानंतर, रजनीश यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडली आणि ते पूर्ण आध्यात्मिक गुरू बनले आणि इथेच त्यांना ओशो या नावाने ओळखले जाऊ शकते.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना ओशोंच्या संपर्कात आले. सुरुवातीला दर आठवड्याला विनोद खन्ना ओशोंच्या पुणे आश्रमात जात असत. एक वेळ अशी आली की त्यांनी त्यांचे सर्व चित्रपट पुण्यात चित्रित करण्यास सुरुवात केली आणि नंतर अचानक त्यांनी चित्रपटांमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे संपूर्ण बॉलिवूड स्तब्ध झाले. कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे विनोद खन्ना स्वतःला “सेक्सी संन्यासी” म्हणवू लागले.
जेव्हा विनोद खन्ना ओशोंसोबत अमेरिकेतील त्यांच्या ‘रजनीशपुरम’ आश्रमात गेले तेव्हा त्यांनी चक्क शौचालये स्वच्छ करण्यापासून ते बागकाम आणि भांडी धुण्यापर्यंतची सर्व कामे केली.
दिल्लीत ‘या’ नियमामुळे कवडीमोल भावात विकली गेली Mercedes, कार मालकाची उडाली झोप
याच काळात ओशोंकडे अनेक आलिशान कार्स पाहायला मिळाले. त्यांच्याकडे एक-दोन नव्हे तर 93 रोल्स-रॉयस कार होत्या. एका संन्यासीला इतक्या रोल्स-रॉइसची गरज का असते? असा प्रश्न एका मुलाखतीत ओशोंना विचारण्यात आला. तेव्हा ओशो म्हणाले, “मला यापैकी कोणत्याही गाड्यांची गरज नाही आणि त्या माझ्याही नाहीत. पण माझ्या शिष्यांना वाटते की मी वर्षातील 365 दिवस वेगवेगळ्या रोल्स-रॉयसमध्ये प्रवास करावा. जर माझ्या शिष्यांना यातून आनंद मिळत असेल आणि ते समाधानी होत असतील तर मी त्यांचा आनंद नष्ट करू इच्छित नाही. यात काहीही चुकीचे नाही…”
ओशोंचे साम्राज्य त्यांच्या श्रीमंत पाश्चात्य अनुयायांच्या देणग्यांवर भरभराटीला आले, विशेषतः 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला ओशो अमेरिकेत स्थलांतरित झाल्यानंतर त्यांना जास्त देणग्या मिळू लागल्या. भक्तांनी अनेकदा त्यांच्या आयुष्यातील सेव्हिंग्ज, इस्टेट आणि व्यवसाय दान केले आणि लाखो लोक या चळवळीत सामील झाले.