
Diwali Food Poisoning (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिवाळीत गोड खाऊन पोट बिघडलंय? फूड पॉइझनिंगपासून वाचायला हे नक्की वाचादिवाळी म्हटलं की घरात गोडाचा वास, मिठाईची ताटं, फराळाचे डबे. बाजारात पण सगळीकडे गर्दी. मिठाई, चिवडा, लाडू, करंजी… खायला तर सगळं भारी वाटतं.
पण सणाच्या नादात आपण एक गोष्ट विसरतो, खाण्यापिण्याची काळजी. जरा चुकलं की पोट बिघडतं. बाहेरचं खराब अन्न, भेसळीची मिठाई, किती वेळ उघड्यावर ठेवलेले पदार्थ खाल्ले की फूड पॉइझनिंग होतं. मग दिवाळी आनंदात जायची सोडून दवाखान्यात जाते. म्हणून खाताना थोडं जपून खा. Diwali Food Poisoning:
दिवाळीत मिठाई आणि फराळाला खूप मागणी असते. त्यामुळे दुकानदार पण घाईघाईत बनवतात. काही पदार्थ नीट साठवले जात नाहीत. बराच वेळ बाहेर ठेवलेलं अन्न, घाण पाणी, भेसळीची मिठाई, शिळं झालेलं खाणं यातूनच विषबाधा होते.शिवाय आपल्याच काही चुका असतात. जेवायच्या आधी हात न धुणे, कच्चं आणि शिजवलेलं अन्न एकाच ठिकाणी ठेवणे, घाण भांडी वापरणे यामुळे पण अन्न खराब होतं.
Diwali Eye Makeup Tips: सणासुदीत Smoky eyes आणि काजळ लावण्याचा विचार करताय? मग आधी वाचा या 5 टिप्स!
फूड पॉइझनिंग झालं की आधी पोटात दुखायला लागतं. पोटात मुरडा येतो, मळमळतं, उलटी होते. सारखे जुलाब होतात, ताप येतो, डोकं दुखतं आणि खूप अशक्त वाटतं.उलटी आणि जुलाब यामुळे शरीरातलं पाणी कमी होतं. याला डिहायड्रेशन म्हणतात. तोंड सुकतं, चक्कर येते. अशी लक्षणं दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.खाणं साठवताना काय काळजी घ्यायची?शिजवलेलं अन्न बाहेर दोन तासांपेक्षा जास्त ठेवू नका. बाहेर जर जास्त गरमी असेल, 32 अंशापेक्षा जास्त तापमान असेल तर एका तासाच्या आत ते फ्रिजमध्ये ठेवा.
उरलेलं अन्न नीट झाकून फ्रिजमध्ये ठेवा. परत खायच्या आधी ते चांगलं गरम करूनच खा. अन्नाचा वास बदललाय, चव बदललीय असं वाटलं तर ते अजिबात खाऊ नका, फेकून द्या.आणि एक महत्वाची गोष्ट, कच्चं आणि शिजवलेलं अन्न कधीच एकत्र ठेवू नका. ते वेगवेगळं ठेवा.
स्वच्छता पाळली तर अर्धा त्रास कमी होईल
स्वयंपाक करायच्या आधी आणि जेवायच्या आधी हात साबणाने स्वच्छ धुवा. फळं आणि भाज्या स्वच्छ पाण्याने धुवूनच वापरा.स्वयंपाकाची भांडी, सुरी, कटिंग बोर्ड हे सगळं स्वच्छ असावं. कच्चं मांस कापायला आणि भाज्या कापायला वेगवेगळा बोर्ड वापरा. आणि प्यायला नेहमी स्वच्छ पाणीच वापरा.बाहेर खात असाल तर दुकान स्वच्छ आहे का, हे बघूनच खा. उघड्यावर ठेवलेली मिठाई, माशा बसलेलं खाणं टाळाच.
घाबरून जाऊ नका. आधी भरपूर पाणी प्या. शरीरातलं पाणी भरून काढायला ओआरएस घ्या. हलकं आणि पचायला सोपं खाणं खा. जास्त तेलकट, तिखट खाऊ नका. शरीराला पूर्ण आराम द्या.डॉक्टरांना विचारल्याशिवाय उगाच कोणतीही गोळी घेऊ नका.पण जर सारख्या उलट्या होत असतील, शौचातून रक्त येत असेल, खूप ताप आला असेल किंवा लघवी कमी होत असेल तर वेळ न घालवता लगेच डॉक्टरांकडे जा.दिवाळी ही खायची, आनंद करायची आहे. पण पोटाची काळजी घेतली तरच सणाचा खरा आनंद घेता येईल. त्यामुळे गोड खा, पण जपून खा.
Ans: शिळे अन्न, भेसळयुक्त मिठाई, दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे फूड पॉइझनिंग होऊ शकते.
Ans: पोटदुखी, उलट्या, जुलाब, ताप, मळमळ आणि अशक्तपणा ही प्रमुख लक्षणे आहेत.
Ans: शिजवलेले अन्न दोन तासांपेक्षा जास्त बाहेर ठेवू नये. 32 अंशांपेक्षा जास्त तापमानात एका तासाच्या आत फ्रिजमध्ये ठेवावे.