Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPO Alert : पैशांचा पडणार पाऊस… पुढच्या आठवड्यात बाजारात धडकणार 9 नवे IPO; कोणत्या कंपनीत लावणार पैसे?

IPO Alert : गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. पुढील आठवड्यात तब्बल ९ नवीन IPO वर्गणीसाठी उघडणार आहेत. यामध्ये मेनबोर्ड आणि SME सेगमेंटमधील कंपन्यांचा समावेश असून, गुंतवणूकदारांना विविध क्षेत्रांत पैसे गुंतवण्याची संधी मिळणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 09, 2026 | 04:59 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पैशांचा पडणार पाऊस…
  • बाजारात धडकणार 9 नवे IPO;
  • कोणत्या कंपनीत लावणार पैसे?
IPO Alert : जर तुम्हीसुद्धा चांगल्या IPO च्या शोधात असाल आणि तुम्हालाही IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण येत्या आठवड्यात १० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ट्रेडिंग आठवड्यात तुम्हाला केवळ एक-दोन कंपन्यांच्याच नाही तर एकूण नऊ कंपन्यांच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. यापैकी पाच मेनबोर्ड सेगमेंटमध्ये आणि दोन SME सेगमेंटमध्ये असणार आहे. तर गेल्या आठवड्यात सुरू झालेले दोन IPO सुद्धा गुंतवणुकीची सुवर्णसंधीदेखील देतील. नेमके कोणते IPO ( IPO Alert ) आहेत त्यावर एकदा नजर टाकूयात.

Job vs Business : नोकरी की व्यवसाय? कोणता पर्याय तुम्हाला वेगाने बनवू शकतो श्रीमंत; हे आहे फायद्या-तोट्याच गणित?

मेनबोर्ड सेगमेंटमधील ५ प्रमुख IPO

Milky Mist Dairy Food IPO – ​​डेअरी उत्पादने कंपनी मिल्की मिस्ट डेअरी फूड्स लिमिटेडचा IPO ११ ऑगस्ट ते १३ ऑगस्टपर्यंत खुला राहणार आहे. आयपीओचा आकार ₹१,५३३ कोटी आहे. प्रति शेअर किंमत पट्टा ₹१३३-₹१४० आहे. IPO अंतर्गत १४ ऑगस्ट रोजी शेअर्सचे वाटप केले जाईल. कंपनीचे शेअर्स १८ ऑगस्ट रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध होतील.

Dhoot Transmission IPO – ​​ऑटो क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असलेल्या धूत ट्रान्समिशन लिमिटेडचा IPO १० ऑगस्ट रोजी खुला होत असून, बोली १२ ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल. प्रति शेअर किंमत पट्टा ₹८२९ ते ₹८७१ आहे. कंपनीचा IPO ग्रे मार्केटमध्ये ₹२५९ च्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे.

Molbio Diagnostics IPO – ​​मेडिकल डायग्नोस्टिक सेक्टरमधील मोठी कंपनी मोलबायो १० ऑगस्ट रोजी आपला IPO आणत आहे. हा IPO १२ ऑगस्टपर्यंत खुला राहील. याचा प्राइस बँड प्रति शेअर ₹७६८-८०७ निश्चित करण्यात आला आहे. कंपनी या IPO द्वारे ०.२५ कोटी नवीन शेअर्स जारी करेल, तर ७३९.७० कोटी शेअर्स ऑफर-फॉर-सेल द्वारे विकले जातील.

Shiprocket IPO – ​​ई-कॉमर्स लॉजिस्टिक्स प्लॅटफॉर्मचा हा IPO १२ ते १४ ऑगस्टपर्यंत खुला राहील. याचा प्राइस बँड प्रति शेअर ₹९२-९७ दरम्यान आहे. हा IPO ११ ऑगस्ट रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. शिपरॉकेट IPO अंतर्गत, ₹८८५ कोटी किमतीचे ९,१२,९९,२०३ नवीन शेअर्स जारी केले जातील. दरम्यान, कंपनीचे प्रवर्तक OFS द्वारे ₹७३२ कोटी किमतीचे ७,५४,६२,३६३ शेअर्स विकतील.

Behari Lal Engineering IPO – ​​मेटल रोल उत्पादन करणारी कंपनी बिहारी लाल इंजिनिअरिंगचा ₹३०१.६२ कोटींचा IPO १२ ऑगस्ट रोजी खुला होणार आहे. तो १४ ऑगस्टपर्यंत खुला राहील. याचा प्राइस बँड प्रति शेअर ₹२७१ ते ₹२८५ आहे.

SME सेगमेंट IPO

Pramodini Medicare IPO – ​​वैद्यकीय क्षेत्रातील या एमएसएमई कंपनीचा IPO १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्टपर्यंत खुला राहील. याचा प्राईस बँड प्रति शेअर ₹११०-११८ असून लॉट साईज १,२०० शेअर्स आहे.

Fascinate Textiles IPO – ​​हा एसएमई IPO ११ ऑगस्ट ते १३ ऑगस्टपर्यंत खुला राहील. IPO चा आकार ₹६६.९८ कोटी आहे. याचा प्राईस बँड प्रति शेअर ₹१४८-१५६ निश्चित करण्यात आला आहे.

आधीच सुरू असलेल्या IPO मधील संधी

या आठ IPO व्यतिरिक्त, गुंतवणूकदारांना ११ ऑगस्टपर्यंत LEAP India IPO आणि गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या Technocraft Ventures IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी देखील आहे.

( Disclaimer : येथे दिलेली माहिती केवळ माहितीसाठी आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या. )

US Russia Bill : अमेरिकेचा भारताला मोठा झटका? रशियाशी व्यापारावर 100 % टॅरिफची टांगती तलवार; काय होणार परिणाम?

Web Title: Ipo alert next week list details in marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Business News
  • IPO
  • IPO News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
1

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
2

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
3

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
4

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.