Essel World , Essel World Closed
९०च्या दशकातील मुलांना काही गोष्टी आठवत असेल किंवा नसेल, पण एस्सेल वर्ल्डचा Essel World जिंगल आजही कायम लक्षात आहे!
त्या काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागण्यापूर्वीच मुले गुल्लक फोडून पैसे जमवू लागायची किंवा आईवडिलांवर हट्ट धरायची की त्यांना एस्सेल वर्ल्डलाच जायचंय. पण ज्याने आपल्या बालपणाला सर्वात संस्मरणीय आठवणी दिल्या, तो एस्सेल वर्ल्ड आज स्वतःच एक आठवण बनून राहिला आहे.
सन २०२२ मध्ये एस्सेल वर्ल्डचे गेट तात्पुरते बंद करण्यात आले. पण हे “तात्पुरते” आता कायमचे झाले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरीही ते गेट पुन्हा कधीच उघडलेले नाही. मग प्रश्न असा उठतो की, जर हे तात्पुरते बंद होते तर अजूनही का उघडले गेले नाही? की प्रत्यक्षात ते कायमचेच बंद झाले आहे?
आणखी एक मोठा प्रश्न असा आहे की, जर एस्सेल वर्ल्ड कायमचे बंद झाले तर पुढचा नंबर वॉटर किंगडमचाही आहे का? कारणे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, Zee ग्रुपसारखी पॅरेंट कंपनी असूनसुद्धा एस्सेल वर्ल्डला शटर खाली का करावे लागले?
त्या काळी सुभाष चंद्रा यांच्या कुटुंबावर साडेतीन लाख रुपयांचे कर्ज झाले होते. उच्चशिक्षणासाठी घरच्यांनी मदत करू शकत नसल्याने केवळ १५ व्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडून कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला.
१९८० च्या दशकात त्यांनी एस्सेल प्रोपॅक या नावाने पॅकेजिंग कंपनी सुरू केली, जी टूथपेस्टसाठी प्लास्टिक ट्यूब तयार करायची. ही भारतातील पहिली लेमिनेटेड ट्यूब कंपनी होती. व्यवसायातून नफा मिळाल्यानंतर त्यांनी नवीन क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा विचार केला.
त्या काळात बहुतांश घरांमध्ये टीव्ही नव्हते. मनोरंजनासाठी सर्कस हाच मोठा मार्ग होता. पण लोकांना तोच-तोच जोकर आणि करामती कंटाळवाण्या वाटू लागल्या. इथेच सुभाष चंद्रा यांना कल्पना सुचली – एक इंटरॅक्टिव्ह आणि आधुनिक मनोरंजन केंद्र उभारण्याची.
१९८३ मध्ये गोराई (मुंबई) येथे अम्यूजमेंट पार्क उभारण्याचे काम सुरू झाले आणि १९८९ मध्ये एस्सेल वर्ल्ड पब्लिकसाठी खुले झाले पण स्केलच्या दृष्टीने एस्सेल वर्ल्ड खूप मोठे आणि आधुनिक होते.पहिल्यांदाच लोकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे राईड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर अनुभवायला मिळाले. पण या प्रवासात आव्हाने कमी नव्हती. BMC सह विविध सरकारी विभागांनी अनेक केस टाकल्या. राईड्सवर मोठे Import Duty, Entertainment Tax, Octroi duty, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे रेड्स – एक ना अनेक समस्या !
त्या काळी “अम्यूजमेंट पार्क” ही कॅटेगरीच कोणत्याही कायद्यात, टॅक्स किंवा लँड रेग्युलेशनमध्ये नव्हती. त्यामुळे एस्सेल वर्ल्डला “इतर” कॅटेगरीत ढकलले जात असे.
कार लोन घेताय? सर्वोत्तम ऑफर कुठे मिळेल? देशातील काही प्रमुख बँकांचे व्याजदर जाणून घ्या
गोराईतील स्थानिक लोकांच्या मनात सुरुवातीला शंका निर्माण केली गेली की इथे लोकल लोकांना काम मिळणार नाही. पण प्रत्यक्षात ९०% पेक्षा जास्त कर्मचारी स्थानिकच होते. मात्र, मीडियाने वाद रंगवला आणि जनमानसात एस्सेल वर्ल्डविरोधात नकारात्मक छबी निर्माण झाली.
९० च्या दशकात टीव्ही घराघरात पोहोचल्यावर एस्सेल वर्ल्डने आक्रमक ब्रँडिंग सुरू केली. त्यांचा जिंगल मुलांचा “अनऑफिशियल अँथम”. १९९८ मध्ये वॉटर किंगडम सुरू केले – आशियातील सर्वात मोठे वॉटर पार्क.
एस्सेल वर्ल्डमध्ये ७० हून अधिक आकर्षणं जोडली गेली – शॉर्ट ड्रॉप, टॉप स्पिन, टनेल ट्विस्टर, आइस स्केटिंग रिंक, बॉलिंग अॅली, डिस्को, ग्रीन स्पेस. त्यामुळे शाळा आणि कॉर्पोरेट पिकनिकसाठी हे ठिकाण फेव्हरेट झाले.२०१३ पर्यंत दरवर्षी १८ लाखांहून अधिक लोक येथे भेट देऊ लागले. २०१९ मध्ये देशातील पहिले इंटरॅक्टिव्ह बर्ड पार्क सुरू झाले. ६० पेक्षा जास्त प्रजाती, ५०० रेअर बर्ड्स आणि शेकडो स्पेशल झाडे-पाने यामुळे हे पार्क अधिक आकर्षक बनले.
IT कंपन्या बायबॅक का करतात? शेअर बाजारावर त्याचा काय परिणाम होतो? सविस्तर जाणून घ्या
२०१९ मध्ये ३० वर्ष पूर्ण झाले आणि ३ कोटींहून अधिक लोकांना एंटरटेन केल्याचा टप्पा गाठला. पण त्याआधीपासूनच कंपनी आर्थिक अडचणीत होती.
२०२० मध्ये Covid 19 मुळे अम्यूजमेंट पार्क बंद झाली. लॉकडाउननंतर पुन्हा उघडले तरी गर्दी पूर्वीसारखी परतली नाही. लोकांच्या खर्चावरच गदा आली होती. त्यातच एस्सेल ग्रुप आधीपासून कर्जाच्या बोजाखाली होता.अपग्रेड करणे अवघड झाले. काही रिपोर्टनुसार मॅनेजमेंटच्या चुका, ऑपरेशन्समधील ढिलाई आणि चुकीच्या स्ट्रॅटेजीमुळे परिस्थिती आणखी बिघडली.
आज प्रश्न असा आहे की – एस्सेल वर्ल्ड पुन्हा उघडेल का? की कायमच बंद झाले आहे? आणि जर तसे असेल तर पुढचा नंबर वॉटर किंगडमचाही आहे का?