Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Luxury Index Launch: कोटकचा भारतातील पहिलावहिला ‘लक्झरी इंडेक्स’ लॉन्च! दाखवला भारतीय श्रीमंतांचा बदलता ट्रेंड

कोटक प्रायव्हेट लिमिटेडने लक्झरी इंडेक्सचा भारतातील पहिलावहिला निर्देशांक प्रदर्शित केले असून भारताचा अतिश्रीमंत वर्ग कसा जगतो व कशावर खर्च करतो याचे मापन करणार आहे. याबद्दल जाणूया सविस्तर 

  • By Priti Hingane
Updated On: Nov 27, 2025 | 04:30 PM
कोटकचा भारतातील पहिलावहिला ‘लक्झरी इंडेक्स’ लॉन्च

कोटकचा भारतातील पहिलावहिला ‘लक्झरी इंडेक्स’ लॉन्च

Follow Us
Close
Follow Us:
  • कोटकचा ‘लक्झरी इंडेक्स’ लॉन्च
  • अतिश्रीमंत भारतीयांच्या खर्चाचा खुलासा
  • वेलनेस, ट्रॅव्हल, रिअल इस्टेटची धूम
 

Luxury Index Launch: कोटक प्रायव्हेट लिमिटेडने लक्झरी इंडेक्सचा भारतातील पहिलावहिला निर्देशांक प्रदर्शित केले असून भारताचा अतिश्रीमंत वर्ग कसा जगतो व कशावर खर्च करतो याचे मापन करणार आहे. वेलनेस रिट्रीट्स, क्युरेटेड अनुभव आणि ब्रॅण्डेड निवासस्थानांमुळे उंची उत्पादनांच्या किंमतीत २०२२ पासून ६.७ टक्‍क्‍यांची वार्षिक वाढ झाली आहे.

कोटक प्रायव्हेट बँकिंगने आज कोटक प्रायव्हेट लक्झरी इंडेक्स (केपीएलआय) या उंची उत्पादने व अऩुभवांच्या १२ श्रेणींमधील किंमतींचे चढउतार नोंदविणाऱ्या अशा प्रकारच्या पहिल्यावहिल्या इंडिकेटरचे अनावरण केले. हा निर्देशांक प्रकाशित करण्याच्या कमी सहाय्यक म्हणून कोटक प्रायव्हेट बँकिंगने अर्न्स्ट अँड यंग एलएलपी (ईवाय)ची नियुक्ती केली होती. भारतातील अतिश्रीमंत, उच्च निव्वळ मालमत्ता असलेल्या (अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ इंडिव्हिज्युअल्स – यूएचएनआय) आलिशान जगण्याच्या व्याख्येला कशाप्रकारे नवा आकार देत आहे¸ याचे आकडेवारीवर आधारित दर्शन हा निर्देशांक घडवितो.

हेही वाचा : Life Certificate Deadline: फक्त 4 दिवस बाकी! 30 नोव्हेंबरपर्यंत ‘हे’ प्रमाणपत्र जमा कर नाही तर थांबेल तुमचं पेन्शन

भारतातील उंची उत्पादनांची बाजारपेठेची २०३० पर्यंत ८५ बिलियन्स डॉलर्सपर्यंत पोहोचण्याकडे वाटचाल सुरू असताना केपीएलआयमधून मालकीकडून अनुभवांपर्यंतचे आणि भौतिक गोष्टींकडून सजगतेने जगण्यापर्यंतचे एक सुस्पष्ट असे परिवर्तन उघड झाले आहे. गुंतवणूकदार, ब्रॅण्ड्स आणि सल्लागारांसाठी हा निर्देशांक केवळ किंमतीचा मागोवा घेत नाही तर तो एक सांस्कृतिक बॅरोमीटरही आहे.

हा अहवाल प्रकाशित करताना कोटक प्रायव्हेट बँकिंगच्या सीईओ ओइशर्या दास म्हणाल्या, “भारताच्या चोखंदळ अल्ट्रा-एनएनआय वर्गासाठी लक्झरी म्हणजे केवळ उंची गोष्टींची मालकी नव्हे, तर वैयक्तिक आवडीनिवडीनुसार घडविलेल्या गोष्टी, कारागिरी आणि वारसा हे घटकही उंची जीवनशैलीचा भाग असतात. आम्हाला मिळालेला आर्थिक विशेषज्ज्ञचा वारसा व मालमत्तेच्या हालचालीविषयीचे सखोल ज्ञान यांचा लाभ घेत, या अहवालाची ही उद्घाटनपर आवृत्ती विविध प्रकारच्या मालमत्ता व जीवनशैलीच्या श्रेणींमधील उंची उत्पादनांसाठीचे सर्वसमावेशक मापदंड पुरविते. ज्यातून क्लाएन्ट्सना आपल्या संपत्तीत वाढ करण्यास व आपले आयुष्य समृद्ध करण्यास मदत करण्याप्रती कोटकची बांधिलकी प्रतिबिंबित झाली आहे.”

२०२५ मध्ये केपीएलआय १२२ अंकांनी वाढून २२% उंचावला. आलिशान रिअल इस्टेट, डिझायनर हॅण्डबॅग्ज आणि हेल्थ रिट्रीट्समध्ये लक्षणीय वाढ दिसली.  तंत्रज्ञान-सुसज्ज घरे, स्वास्थ्य-केंद्रित जीवनशैली आणि उच्चभ्रू शिक्षणावरील खर्च वाढला, तर महागडी घड्याळे व फाइन वाइन्समध्ये घट नोंदली गेली. चैनीच्या वस्तूंबाबतही चढउताराचे चक्र सुरू असते याचाच हा पुरावा म्हटला पाहिजे.

हेही वाचा : Navbhart Kazakhstan Event: ‘नवभारत’ शिखर परिषदेत भारत–कजाकिस्तान व्यापार संबंधांना नवे बळ! भारताला दिले गुंतवणुकीचे निमंत्रण

केपीएलआय मूल्‍य धारणा, यूएचएनआयच्‍या खर्चाच्‍या पद्धती आणि प्रमाणानुसार १२ श्रेणींमध्‍ये वार्षिक किमतीमधील बदलांवर देखरेख ठेवते. आधार वर्ष २०२२ तुलनात्‍मक विश्‍लेषणासाठी महामारीनंतरचे पहिले बेंचमार्क वर्ष आहे. या श्रेणींमध्‍ये प्रमुख रिअल इस्‍टेट, डिझायनर हँडबॅग्‍ज, लक्‍झरी घड्याळे, आलिशान अनुभव, आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य, लक्‍झरी ऑटोमोबाइल्‍स, फाइन आर्ट, फाइन ज्‍वेलरी, डिझायनर शूज, उच्‍चभ्रू युनिव्‍हर्सिटीज, फाइन वाइन्‍स व दुर्मिळ व्हिस्‍की आणि लक्‍झरी प्रवासाचा समावेश आहे.

भारतातील लक्‍झरी बाजारपेठेला मोठ्या प्रमाणात प्राधान्‍य दिले जात आहे, ज्‍यामधून सांस्‍कृतिक उत्‍क्रांती, आर्थिक स्थिरता आणि महत्त्वाकांक्षी ओळख दिसून येते. केपीएलआय निदर्शनास आणते की, लक्‍झरी हे एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या मालमत्तेपुरते मर्यादित राहिले नसून कशाप्रकारे जीवन जगले जाते, यावर अवलंबून आहे.

Web Title: Kotak launches indias first luxury index shows the changing trend of the indian rich

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 04:30 PM

Topics:  

  • india
  • Kotak Mahindra Bank
  • Lifestyles

संबंधित बातम्या

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात
1

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात

India Defence Exports: ऑपरेशन ‘सिंदूर’नंतर जागतिक बाजारात वाढला भारताचा दबदबा; भारत बनतोय शस्त्रास्त्र पुरवठादार
2

India Defence Exports: ऑपरेशन ‘सिंदूर’नंतर जागतिक बाजारात वाढला भारताचा दबदबा; भारत बनतोय शस्त्रास्त्र पुरवठादार

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात
3

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Sarabjit Kaur : निकाह, धर्मपरिवर्तन अन् आता अटक! सरबजीत कौर प्रकरणात पाकिस्तानचा मोठा ‘यु-टर्न’; वाचा सविस्तर
4

Sarabjit Kaur : निकाह, धर्मपरिवर्तन अन् आता अटक! सरबजीत कौर प्रकरणात पाकिस्तानचा मोठा ‘यु-टर्न’; वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.