फक्त 4 दिवस बाकी! 30 नोव्हेंबरपर्यंत ‘हे’ प्रमाणपत्र जमा कर नाही तर थांबेल तुमचं पेन्शन (फोटो-सोशल मीडिया)
Life Certificate Deadline: दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सरकारी पेन्शन घेणाऱ्यांसाठी अनिवार्य असते. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. जर तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुमची पेंशन बंद होऊ शकते. या पूर्वी पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ऑफिस किंवा अन्य ठिकाणी जावे लागते आता मात्र, आता तुम्ही ते कागदपत्र घरबसल्या ऑनलाइन देखील सादर करू शकता.
दरवर्षी पेन्शनधारकांकडून जीवन प्रमाणपत्र मिळविण्याचा मुख्य हेतु पेन्शन निधी फक्त योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि कोणीही फसवणूक करून पेन्शन मिळवू शकणार नाही याची खात्री करणे असल्याचे सरकारने सांगितले आहे. पेन्शन सुरू ठेवण्यासाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाची अट असून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे. मात्र, तुम्ही तोपर्यंत जर जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुमची पेंशन बंद होऊ शकते.
हेही वाचा : SEBI Margin reduction: कमी पैशात जास्त शेअर्स! सेबी मोठा धक्का देणार..; गुंतवणूकदारांची लॉटरी?
जीवन प्रमाणपत्र सादर करणे ही केवळ औपचारिकता असलेलेल प्रमाणपत्र नसून पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने सुरू केलेली एक आवश्यक प्रक्रिया सुद्धा आहे. यापूर्वी, पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्रे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावून सादर करावी लागत होती. तेव्हा रांगेत तासनतास उभे राहावे लागत असे, काही वेळ बऱ्याच चकरा माराव्या लागत असतं. यामुळे वृद्ध पेन्शनधारकांचे हाल व्हायचे किंवा त्यांना यायला जमायचे नाही. आता मात्र, पेंशनधारक घरबसल्या मोबाईलवर जीवन प्रमाण पोर्टल किंवा जीवन प्रमाण अॅपद्वारे हे जीवन प्रमाणपत्र काढू शकतात.
जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे?






