Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mittal Deal: IPL मध्ये खळबळ! लक्ष्मी निवास मित्तल यांनी खरेदी केली Rajasthan Royals; जाणून घ्या किती आहे संपत्ती

मित्तल कुटुंबाने आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स विकत घेण्यासाठी एक ऐतिहासिक करार केला आहे. हा करार केवळ क्रीडा जगतातच नव्हे, तर व्यावसायिक जगातही चर्चेचा विषय बनला आहे. पण या मित्तल परिवाराची किती संपत्ती आहे?

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 03, 2026 | 07:02 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मित्तल कुटुंबाने IPL संघ राजस्थान रॉयल्स विकत
  • लक्ष्मी मित्तल कोण आहेत?
  • लक्ष्मी मित्तल किती श्रीमंत आहेत?
Lakshmi Mittal IPL Deal: आपल्या पोलाद साम्राज्यासाठी जगभरात ओळखले जाणारे भारतीय अब्जाधीश लक्ष्मी मित्तल आता क्रिकेटच्या मैदानावरही आपली छाप सोडण्यास सज्ज झाले आहेत. मित्तल कुटुंबाने आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स विकत घेण्यासाठी एक ऐतिहासिक करार केला आहे. हा करार केवळ क्रीडा जगतातच नव्हे, तर व्यावसायिक जगातही चर्चेचा विषय बनला आहे. पण या मित्तल परिवाराची किती संपत्ती आहे? जाणून घेऊयात

Medical Emergency: Flight मध्ये आजारी पडलात तर उपचारांचा खर्च कोण करतं? Airlines, विमा कंपनी की तुम्ही स्वतः?

राजस्थान रॉयल्समधील बहुसंख्य हिस्सेदारी

लक्ष्मी मित्तल आणि त्यांचे पुत्र आदित्य मित्तल यांनी, सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांच्यासह, राजस्थान रॉयल्समधील बहुसंख्य हिस्सेदारी विकत घेतले आहे. या व्यवहाराचे मूल्य अंदाजे १.६५ अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे १५,६६० कोटी रुपये इतकं आहे. संघात मित्तल कुटुंबाची ७५ टक्के, तर आदर पूनावाला यांची १८ टक्के मालकी असेल.

लक्ष्मी मित्तल कोण आहेत?

लक्ष्मी मित्तल जगभरात ‘स्टील किंग’ म्हणून ओळखले जातात. ते जगातील सर्वात मोठ्या पोलाद कंपन्यांपैकी एक असलेल्या आर्सेलरमित्तल या जागतिक पोलाद कंपनीचे अध्यक्ष आहेत. भारतात जन्मलेल्या मित्तल यांनी आपला व्यवसाय युरोप, अमेरिका आणि आशियामध्ये विस्तारला आणि आज त्यांची गणना जगातील सर्वात प्रभावशाली उद्योगपतींमध्ये होते.

लक्ष्मी मित्तल किती श्रीमंत आहेत?

अहवालानुसार, लक्ष्मी मित्तल यांची एकूण संपत्ती ३१ अब्ज डॉलर्स (अंदाजे २.७ लाख कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे. एकेकाळी ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. आजही ते भारतातील १० सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये गणले जातात. त्यांचे निवासस्थान लंडनच्या केन्सिंग्टन पॅलेस गार्डन्समध्ये आहे, जे जगातील सर्वात महागड्या खाजगी घरांपैकी एक मानले जाते.

लक्ष्मी मित्तल यांचे राजस्थानशी घनिष्ठ नात

केवळ एक व्यावसायिक निर्णय नसून, ते एक भावनिक नातेदेखील आहे. त्यांचा जन्म राजस्थानमधील सादुलपूर  येथे झाला होता. संघाच्या नवीन मालकांचे म्हणणे आहे की, त्यांना जागतिक स्तरावर राजस्थानचा वारसा पुढे न्यायचा आहे. नवीन मालकी बदलानंतर राजस्थान रॉयल्स मैदानावर कसा प्रभाव पाडेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. सध्या, सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा सुरू आहे की लक्ष्मी मित्तल यांची ही नवी खेळी किती यशस्वी ठरेल.

संपत्तीचा मुख्य स्रोत काय ?

अहवालानुसार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांची एकूण संपत्ती अंदाजे $16.3 अब्ज (अंदाजे ₹1.36 लाख कोटी) आहे. त्यांच्या संपत्तीचा मुख्य स्रोत जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी, सीरम इन्स्टिट्यूट आहे आणि ते पूनावाला फिनकॉर्पचे अध्यक्ष देखील आहेत. ते त्यांच्या आलिशान
जीवनशैलीसाठी ओळखले जातात. २०२३ मध्ये, त्यांनी लंडनमध्ये अंदाजे ₹1,446 कोटी किमतीचे ‘अबरकॉनवे हाऊस’ हे आलिशान घर खरेदी करून प्रसिद्धी मिळवली होती. त्यांनी अलीकडेच करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ या कंपनीत ५०% हिस्सा विकत घेऊन मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला आहे.

8th Pay Commission: 283 टक्क्यांपर्यंत वाढणार सॅलरी, निवृत्तीवेतनातही वाढ निश्चित; मागण्या पूर्ण होणार का?

Web Title: Latest lakshmi mittal ipl deal rajasthan royals net worth update see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 07:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.