Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने मॅझोर एक्स स्टील्थ एडिशनसह एआय-सक्षम रोबोटिक O-Arm® लाँच केल्याची माहिती देण्यात आली आहे. या एकात्मिक प्लॅटफॉर्ममध्ये रिअल-टाइम 2D आणि 3D इंट्राऑपरेटिव्ह इमेजिंग, AI-सहाय्यित सर्जिकल प्लॅनिंग, रोबोटिक मार्गदर्शन आणि प्रगत नेव्हिगेशनचा समावेश आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 01, 2026 | 06:30 PM
Lilavati Hospital Robotic O-Arm: (फोटो- सोशलमीडिया)

Lilavati Hospital Robotic O-Arm: (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने मॅझोर एक्स स्टील्थ एडिशनसह एकीकृत नेक्स्ट-जनरेशन एआय-सक्षम रोबोटिक ओ-आर्म® लाँच केले आहे. लाँच करण्यात आलेले हे तंत्रज्ञान जागतिक दर्जाच्या क्लिनिकल पायाभूत सुविधांद्वारे नाविन्यता-संचालित, रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा प्रदान करण्याप्रती हॉस्पिटलच्या कटिबद्धतेतील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

यंत्रणा सर्जिकल नियोजन अधिक सक्षम

हा एकात्मिक प्लॅटफॉर्म गुंतागुंतीच्या स्पाईन शस्त्रक्रियांदरम्यान सर्जन्सना साहाय्य करण्यासाठी रीअल-टाइम २डी आणि ३डी इंट्राऑपरेटिव्ह इमेजिंग, एआय-सहाय्यित सर्जिकल नियोजन, रोबोटिक मार्गदर्शन आणि प्रगत नेव्हिगेशन एकत्र आणतो. मणक्याची अंतर्गत रचना आपोआप ओळखून, रचनांचे मोजमाप करून आणि योग्य स्क्रू आकार, अचूक दिशा तसेच प्रत्यारोपणाची योग्य जागा सुचवून ही यंत्रणा सर्जिकल नियोजन अधिक सक्षम करते. तसेच, शस्त्रक्रियेदरम्यान सर्जनचे प्रत्येक क्लिनिकल निर्णयावर संपूर्ण नियंत्रण राहील याची खात्री देते. Lilavati Hospital Robotic O-Arm:

अचूक दिशा सुचवून मदत करते

हे सॉफ्टवेअर व्हर्टिब्रा, पेडिकल्स, एंडप्लेट्स आणि मुख्य शारीरिक खुणा काही सेकंदांत अचूक ओळखण्यासाठी प्रगत अल्गोरिदमचा वापर करते. हजारो प्रमाणित सर्जिकल प्लॅनिंग पॅरामीटर्सचा संदर्भ घेऊन ते सर्जन्सना इम्प्लांटचे आकारमान आणि अचूक दिशा सुचवून मदत करते, जे क्लिनिकल अभ्यासाच्या आधारे स्वीकारले, बदलले किंवा नाकारले जाऊ शकते. शस्त्रक्रियेदरम्यान, रोबोटिक यंत्रणा उपकरणांच्या सातत्यपूर्ण ट्रॅकिंगसह नियोजित दिशा राखण्यास मदत करते, तर ओ-आर्म® रीअल-टाइम पडताळणीसाठी उच्च-रिझोल्यूशन इमेजिंग देते.

AI Survey : डिजिटल ट्विनने वाढवले चुकीचे आकडे; एका जगप्रसिद्ध सर्वेक्षण कंपनीने केली स्वतःच्याच डेटाची तुलना, अहवाल धक्कादायक

हे प्लॅटफॉर्म डीजनरेटिव्ह स्पाईन डिसऑर्डर, स्कोलियोसिस, कायफोसिस, स्पाईन ट्रॉमा, ट्यूमर, इन्फेक्शन्स आणि रिव्हिजन स्पाईन सर्जरींसह मणक्याशी संबंधित विकारांवरील उपचारांमध्ये साहाय्य करते. हे विशेषतः अधिक अचूकता आवश्यक असलेल्या मिनिमली इन्वेसिव्ह आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी अत्यंत मोलाचे ठरते. नेव्हिगेशन-सहाय्यित रोबोटिक तंत्रज्ञानाने क्लिनिकल लक्षणे आणि सर्जिकल स्वरूपानुसार स्पायनल इम्प्लांट आणि पेडिकल स्क्रू बसवण्यात ९५ ते ९९ टक्‍के अचूकता सिद्ध केली आहे.

या प्रसंगी मत व्यक्त करत लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे पर्मनंट ट्रस्टी श्री. राजीव मेहता म्हणाले, “लीलावती हॉस्पिटलमध्ये आम्ही करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतो, तसेच क्लिनिकल उत्कृष्टता देणाऱ्या जागतिक स्तरावरील प्रगत तंत्रज्ञानामध्ये सातत्याने गुंतवणूक करतो.

मॅझोर एक्स स्टील्थ एडिशनसह एआय-सक्षम रोबोटिक ओ-आर्म®चा समावेश आमच्या सर्जन्सना उपलब्ध असणाऱ्या सर्वोत्तम आणि अत्याधुनिक टूल्सचा पुरवठा करण्‍याप्रती आमच्या कटिबद्धतेला निदर्शनास आणतो, ज्यामुळे अधिक अचूकता, सुव्यवस्थित सर्जिकल कार्यपद्धती आणि रुग्णांसाठी अधिक चांगले वैद्यकीय परिणाम साध्य करता येतील. ही गुंतवणूक भारतातील रुग्णांसाठी जागतिक दर्जाचे आरोग्यसेवा तंत्रज्ञान सहज उपलब्ध करून देण्याप्रती आमच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करते.”

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश

आत्मविश्वासाने अत्यंत अचूक शस्त्रक्रिया

लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डॉ. रवींद्र करंजेकर म्हणाले, “रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान स्पाईन सर्जरीच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रगती आहे. एआय-सहाय्यित नियोजन, रोबोटिक मार्गदर्शन आणि रीअल-टाइम इमेजिंगमुळे सर्जन्सना विशेषतः गुंतागुंतीच्या आणि मिनिमली इन्वेसिव्ह केसेसमध्ये अधिक आत्मविश्वासाने अत्यंत अचूक शस्त्रक्रिया करता येतात. इम्प्लांट अधिक अचूक बसवल्याने उतींना होणारा त्रास कमी होऊ शकतो, पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची शक्यता कमी होते, हॉस्पिटलमधील मुक्काम कमी होतो आणि रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. हे तंत्रज्ञान उत्कृष्ट मार्गदर्शन पुरवत असले, तरी शस्त्रक्रियेसंबंधी प्रत्येक निर्णय पूर्णपणे संबंधित सर्जनला घ्यावा लागतो, ज्यामुळे रुग्णाच्या उपचारांमध्ये क्लिनिकल तज्ज्ञतेला प्राधान्य दिले जाईल याची खात्री मिळते.”

भारतातील स्पाईन व न्यूरोसर्जिकल केअरमध्ये नवीन मापदंड

एआय-सक्षम रोबोटिक ओ-आर्म® आणि मॅझोर एक्स स्टील्थ एडिशनच्या समावेशासह लीलावती हॉस्पिटलने अचूक वैद्यकीय उपचार पद्धतींना पुढे नेणाऱ्या, रुग्णांचे आरोग्य परिणाम सुधारणाऱ्या आणि भारतातील स्पाईन व न्यूरोसर्जिकल केअरमध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आपले अग्रगण्य स्थान अधिक दृढ केले आहे.

Web Title: Lilavati hospital ai robotic o arm mazor x stealth spine surgery rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • ai
  • AI model
  • Business News

संबंधित बातम्या

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
1

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

Forbesच्या श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! गौतम अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींचं स्थान घसरलं
2

Forbesच्या श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! गौतम अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींचं स्थान घसरलं

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा
3

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा

LPG Cylinder Price Hike: सणासुदीच्या तोंडावर गॅस सिलिंडर महागला! ‘या’ शहरात सर्वाधिक दरवाढ
4

LPG Cylinder Price Hike: सणासुदीच्या तोंडावर गॅस सिलिंडर महागला! ‘या’ शहरात सर्वाधिक दरवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.