Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील व्यावसायिकांबद्दल LinkedIn चे संशोधन! 89 टक्के व्यावसायिक अग्रस्थानी राहण्यासाठी मार्गदर्शनाचा शोध घेतात

जगातील सर्वात मोठे व्‍यावसायिक नेटवर्क लिंक्‍डइन (LinkedIn)च्‍या नवीन संशोधनाच्‍या मते, भारतातील व्‍यावसायिक कामामध्‍ये झपाट्याने होत असलेल्‍या परिवर्तनाबाबत जाणून घेत आहेत, जेथे ८९ टक्‍के व्‍यावसायिक पूर्वीपेक्षा अधिक मार्गदर्शन आणि सपोर्टचा शोध घेत आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Oct 04, 2024 | 02:45 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

जगातील सर्वात मोठे व्‍यावसायिक नेटवर्क लिंक्‍डइन (LinkedIn)च्‍या नवीन संशोधनाच्‍या मते, भारतातील व्‍यावसायिक कामामध्‍ये झपाट्याने होत असलेल्‍या परिवर्तनाबाबत जाणून घेत आहेत, जेथे ८९ टक्‍के व्‍यावसायिक पूर्वीपेक्षा अधिक मार्गदर्शन आणि सपोर्टचा शोध घेत आहेत.
रोजगार विकसित होत असताना भारतातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी संधी म्‍हणजे दैनंदिन टास्‍क्‍समध्‍ये एआयचे एकीकरण (४० टक्‍के). मुंबईतील ६८ टक्‍के व्‍यावसायिकांनी मान्‍य केले आहे की, करिअरमध्‍ये प्रगती करण्‍यासाठी एआयबाबत माहित असणे आवश्‍यक आहे. या प्रतिसादात, नॉन-टेक्निकल व्‍यावसायिकांमधील एआय योग्‍यतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या लिंक्‍डइन लर्निंग कोर्सेसच्‍या वापरामध्‍ये गेल्‍या वर्षभरात ११७ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

लिंक्‍डइन डेटामधून गेल्‍या दोन वर्षांत स्थिर कामाचा  उल्‍लेख करणाऱ्या पोस्‍ट्समध्‍ये १२३ टक्‍के वाढ निदर्शनास येते, तसेच कंपन्‍या त्‍यांच्‍या रिटर्न-टू-ऑफिस (आरटीओ) धोरणांमध्‍ये बदल करत असताना कर्मचारी कशाप्रकारे या बाबीला प्राधान्‍य देत आहेत हे देखील दिसून येते.
व्‍यावसायिकांनी ओळखले आहे की फक्‍त अनुभव पुरेसा नाही

शहरातील ६३ टक्‍के व्‍यावसायिक सतत शिकत राहण्‍याची गरज मान्‍य करतात, तर ३५ टक्‍के व्‍यावसायिकांचा विश्‍वास आहे की करिअरमध्‍ये प्रगती करण्‍यासाठी अपस्किलिंग आवश्‍यक आहे. संशोधनाच्‍या मते, ६२ टक्‍के कामाच्‍या ठिकाणी परिवर्तनामधून नेव्हिगेट करण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या कौशल्‍यांसंदर्भात मार्गदर्शनाचा शोध घेत आहेत. अनेकजण माहितीपूर्ण राहण्‍यासाठी आणि भावी संधींकरिता सुसज्‍ज राहण्‍यासाठी तंत्रज्ञान सुधारणा (४५ टक्‍के), विभाग-विशिष्‍ट बाजारपेठ विश्‍लेषण (३४ टक्‍के) आणि सामाजिक ट्रेण्‍ड्स (३४ टक्‍के) याबाबत ज्ञान मिळवत आहेत.

ज्ञान मिळवण्‍याकरिता व्‍यावसायिकांसाठी व्हिडिओ हे सर्वात लोकप्रिय माध्‍यम आहे

मुंबईतील ४५ टक्‍के व्‍यावसायिक संलग्‍न होण्‍यास सोपे असलेल्‍या शॉर्ट-फॉर्म व्हिडिओजना प्राधान्‍य देतात, तर ५५ टक्‍के विशिष्‍ट कौशल्‍यांवर लक्ष केंद्रित केलेल्‍या लाँग-फॉर्म व्हिडिओ कोर्सेसना प्राधान्‍य देतात आणि ते सर्वात उपयुक्‍त असल्‍याचे मानतात. व्‍यावसायिक विशेषत: किस्‍से व माहिती असलेले व्हिडिओज (४६ टक्‍के) आणि अनस्क्रिप्‍टेड पॉडकास्‍ट संवाद (४५ टक्‍के) यांना महत्त्व देतात, जे त्‍यांना योग्‍य व्‍यावसायिक निर्णय घेण्‍यास आणि संभाव्‍य करिअरचे मूल्‍यांकन करण्‍यास मदत करतात.

अग्रस्‍थानी राहण्‍यासाठी सोल्‍यूशन्‍सचा शोध

व्‍यावसायिक कामाच्‍या ठिकाणी झपाट्याने होत असलेल्‍या परिवर्तनांशी जुळून जाण्‍यास मदत करण्‍यासाठी आवश्‍यक असलेले ज्ञान व कौशल्‍यांकरिता लिंक्‍डइनला प्राधान्‍य देत आहेत. तज्ञांकडून माहिती, एआय-पॉवर्ड कोचिंग आणि रिअल-टाइम बातम्‍यांसह लिंक्‍डइनकडे त्‍यांना अग्रस्‍थानी राहण्‍यास आवश्‍यक असलेले टूल्‍स आहेत.

लिंक्‍डइन इंडियाच्‍या करिअर एक्‍स्‍पर्ट आणि संपादकीय प्रमुख निरजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee, Career Expert and Head of Editorial, LinkedIn India) म्‍हणाल्‍या, ”एआय व हायब्रिड वर्क मॉडेल्‍स आपल्‍या कामाच्‍या पद्धतींमध्‍ये बदल घडवून आणत असताना नवीन उद्योग ट्रेण्‍ड्सबाबत माहिती असणे अधिक महत्त्वाचे आहे. आज, मुंबईतील १० पैकी ८ (७८ टक्‍के) कर्मचारी सल्ला घेण्‍याकरिता उद्योग प्रमुख व सहकाऱ्यांकडे येत आहेत, ज्‍यामधून व्‍यावसायिक सक्रियपणे ज्ञान मिळवण्‍याचे महत्त्व दिसून येते. ही मानसिकता अंगिकारत, जिज्ञासू राहत आणि सतत नवीन कौशल्‍ये विकसित करत तुम्‍ही यशाच्‍या दिशेने वाटचाल करू शकता आणि तुम्‍हाला परिवर्तनाच्‍या अग्रस्‍थानी राहण्‍यास मदत होऊ शकते.”

परिवर्तनाशी जुळून जात अग्रस्‍थानी राहण्‍यासाठी लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्टच्‍या टिप्‍स:

1. परिवर्तनाच्‍या अग्रस्‍थानी राहा: एआय व हायब्रिड वर्क यांसारखे विषय सतत बदलत आहेत. लिंक्‍डइन टॉप वॉईसेस सारख्‍या विश्‍वसनीय तज्ञांकडून नवीन बातम्‍या व माहितीसह अद्ययावत राहत तुम्‍हाला या विकासांचा दैनंदिन कामावर होणारा परिणाम, तसेच भविष्‍यातील परिणाम उत्तमरित्‍या जाणून घेण्‍यास मदत होऊ शकते.
2. विकाससंदर्भातील मानसिकतेचा अवलंब करा: परिवर्तन घडवून आणणे आव्‍हानात्‍मक आहे, ज्‍यामुळे नर्व्‍हस होणे स्‍वाभाविक आहे. पण खुल्‍या मनाने प्रक्रियेचा अवलंब करण्‍याचा प्रयत्‍न करा. शिकण्‍याप्रती उत्‍सुकता दाखवत तुम्‍ही क्षेत्रांबाबत ज्ञान मिळवू शकता, ज्‍यामुळे परिवर्तनामधून नेव्हिगेट करणे सोपे होईल. एआयचे उदाहरण घ्‍या. मीटिंगमधील नोट्स घेण्‍यासाठी झटपट लेखनाचा सराव किंवा एआयचा वापर केल्‍यास भविष्‍यात हे टूल्‍स वापर करणे सोपे जाईल. लिंक्‍डइनने २५ नोव्‍हेंबर २०२४ पर्यंत ‘बिल्डिंग अ‍ॅन अ‍ॅडप्‍टॅबिलिटी माइण्‍डसेट इन द एज ऑफ एआय (Building an Adaptability Mindset in the Age of AI)’ यासारख्‍या लर्निंग कोर्सेसची सिरीज मोफत अनलॉक केली आहे आणि २०२५च्‍या अखेरपर्यंत जेन एआयवरील दोन कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी प्रोफेशनल सर्टिफिकेट्स (two complimentary professional certificates) देखील ऑफर करत आहे.
3. लहान गोष्‍टी जाणून घ्‍या: नवीन कौशल्‍ये व ज्ञान संपादित करण्‍याचे सोपे मार्ग शोधा, ज्‍यामुळे सतत शिकत राहणे अधिक सुव्‍यवस्थित होईल. व्‍यावसायिकांना माहितीसंदर्भात शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अधिक उपयुक्‍त व सर्वसमावेशक वाटतात आणि लिंक्‍डइनवर याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, जेथे व्हिडिओ अपलोड्स दरवर्षाला ३४ टक्‍क्‍यांहून (34% year-over-year) अधिकने वाढत आहे.

Web Title: Linkedin research on entrepreneurs in india 89 percent of entrepreneurs seek guidance to stay ahead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?
1

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
2

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया
3

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
4

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.