
स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर
Flydubai Attack: फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानातील कॉकपिटमध्ये झालेल्या गंभीर घटनेत जखमी झालेले भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये स्मित मच्छार स्ट्रेचरवर झोपलेल्या अवस्थेत दिसत असून वैद्यकीय कर्मचारी त्यांना उपचारासाठी नेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या खांद्यावर मोठी पट्टी बांधलेलीही दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन स्मित मच्छार यांच्या खांदा, छाती, हात आणि पोटाला दुखापत झाली आहे. त्यांना सौदी अरेबियातील तबूक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून भारतीय दूतावासाकडूनही त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
फ्लायदुबईचे FZ1073 विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जात असताना कॉकपिटमध्ये गंभीर घटना घडली. सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला देखील झाला. या घटनेनंतर विमान आपत्कालीन परिस्थितीत सापडल्याचे सांगण्यात आले.
चाकू से हमले के बाद कैप्टन स्मिट की विमान के बाहर पहली तस्वीरें सामने आई हैं। तस्वीरों में उनके सीने और पेट पर भारी पट्टियां बंधी दिखाई दे रही हैं। रिपोर्ट के मुताबिक, उन्होंने कथित तौर पर हमलावर सह-पायलट से खुद को बचाने की कोशिश की। #CaptainSmit #AviationNews #NavbharatLive pic.twitter.com/94v3r0smsn — NavBharat Live (@TheNavbharatliv) October 1, 2026
रिपोर्ट्सनुसार, जखमी अवस्थेतही कॅप्टन मच्छार यांनी कॉकपिटचे दार उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर विमानातील इतर क्रू सदस्य आणि प्रवाशांना मदत करता आली. विमानात उपस्थित असलेल्या अतिरिक्त वैमानिकांनी पुढे विमानाचे नियंत्रण घेतले.
या घटनेनंतर विमानाचा मार्ग बदलून ते सौदी अरेबियातील तबूक येथे उतरवण्यात आले. दिलेल्या माहितीनुसार विमानात एकूण 174 जण प्रवास करत होते आणि प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमी वैमानिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कृतीचे कौतुक होत असल्याचे वृत्त आहे. मात्र, कॉकपिटमध्ये नेमकी घटना कशी घडली, हल्ल्यामागील कारण काय होते आणि विमानाबाबत कथितपणे काय करण्याचा प्रयत्न झाला, यासंबंधीचे तपशील संबंधित अधिकाऱ्यांच्या अधिकृत तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.