Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Cylinder Price Hike: सणासुदीच्या तोंडावर गॅस सिलिंडर महागला! ‘या’ शहरात सर्वाधिक दरवाढ

LPG Cylinder Price Hike: सणासुदीच्या काळात १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. कोलकात्यात सर्वाधिक ७० रुपयांची वाढ झाली असून दिल्लीमध्ये ६२ रुपये, मुंबईत ६३ रुपये आणि चेन्नईत ६६ रुपयांची वाढ झाली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 01, 2026 | 12:02 PM
LPG Cylinder Price Hike: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

LPG Cylinder Price Hike: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Commercial LPG Cylinder: सणासुदीच्या दिवसांता घरात गोडाधोडाचे खाद्यपदार्थ बनवले जातात. पण आता याच सणासुदीच्या काळात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होत आहे. 1 ऑक्टोबरपासून सरकारी तेल कंपन्यानी मोठा झटका दिला. १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 70 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे दिल्लीमध्ये हाच सिलेंडर २८१० रुपयांना मिळणार आहे.

नवरात्री, दिवाळीच्या तोंडावर ही दरवाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाईवाल्यांचं बजेट बिघडणार. दरम्यान बाहेरचं खाणं महागणार आहे. नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी रात्रभर गरब्याचे आयोजन केले जाते. अशावेळी अनेकदा बाहेरचे खाणे होते. या वाढत्या दरवाढीचा सामान्याच्या खिशावर परिणाम होईल हे नक्कीच. हे सर्व असताना एक आनंदाची बातमी समोर येत आहे की, घरगुती १४.२ किलोचा सिलिंडरवर कोणतीही दरवाढ केली गेली नाही. LPG Cylinder Price Hike:

चार मोठ्या शहरात किती वाढ झाली?

१ ऑक्टोबरपासून नवीन दर लागू झाली. सगळीकडेच दर वाढले आहेत.

  • कोलकात्यामध्ये सगळ्यात जास्त ७० रुपयांची वाढ
  • दिल्लीत आधी २७४७ रुपये होता, आता २८१० रुपये झाला आहे म्हणजेच तब्बल ६२ रुपयांची वाढ.
  • कोलकात्यात आधी २८८४ होता, आता २९५४ झाला आहे. ७० रुपयांची वाढ.
  • मुंबईत आधी २७०१ होता, आता २७६४ रुपये झाला आहे. जवळपास ६३ रुपयांची वाढ.
  • चेन्नईत आधी २९१६ होता, आता २९८३ झाला आहे. ६६ रुपयांची वाढ.

हा दुसरा महिना आहे दर वाढीचा

सलग दुसऱ्या महिन्यात कमर्शियल सिलिंडरचे दरवाढवले आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये १० रुपये वाढ झाली होती. त्याआधी जुलै आणि ऑगस्टमध्ये दिलासा मिळाला होता. जुलैमध्ये १८३ रुपये आणि ऑगस्टमध्ये २०९ रुपये दर कमी झाला होता. पण वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी ते जून या सहा महिन्यात तर सातवेळा दर वाढले होते.

October 1 Rule Changes 2026: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार: LPG पासून UPI पेमेंटच्या नियमांत मोठे बदल

दर का वाढले?

यामागचं कारण म्हणजे बाहेरच्या देशात चालू असलेला तणाव. अमेरिका आणि इराणमध्ये वाद वाढला आहे. पश्चिम आशियात परिस्थिती ठीक नाही. त्यामुळे बाहेरच्या बाजारात गॅसचे भाव वाढले आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या इथे पण झाला आहे.

घरगुती सिलिंडरला दिलासा

कमर्शियल सिलिंडर महागला असला तरी घरातला सिलिंडर महाग झालेला नाही. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरचे दर आहे तसेच ठेवले आहेत. शेवटची वाढ ७ जून २०२६ ला झाली होती तेव्हा २९ रुपये वाढले होते. त्यानंतर दर वाढले नाहीत.

नागरिकांनो लक्ष द्या ! देशात आजपासून बदलणार ‘हे’ नियम; LPG सिलिंडर …

सध्या घरगुती सिलिंडरचे दर असे आहेत –

  • दिल्ली – ९४२ रुपये
  • मुंबई – ९४१ रुपये
  • कोलकाता – ९६८ रुपये
  • चेन्नई – ९५७ रुपये

सणात खाणं महाग होणार

ऑक्टोबरमध्ये नवरात्र, दसरा, दिवाळी आहे. या काळात लोक बाहेर जास्त खातात. हॉटेलमध्ये गर्दी असते, मिठाई, फराळ खूप विकला जातो. पण आता गॅसच महाग झाला आहे त्यामुळे हॉटेलवाल्यांचा खर्च वाढणार आहे. ते खर्च वाढवून ग्राहकांकडूनच घेणार दरम्यान सामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. त्यामुळे हॉटेलचं जेवण, मिठाई, समोसा, कचोरी सगळंच महाग होण्याची शक्यता आहे.

Web Title: Lpg cylinder price hike commercial gas cylinder rates october 2026 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Business News
  • lpg cylinder
  • LPG Gas Price

संबंधित बातम्या

Gold Silver Price Today: महागाई भडकली! सोन्याचांदीच्या दराने फोडला सामन्यांना घाम, भाव वाचून उडेल झोप
1

Gold Silver Price Today: महागाई भडकली! सोन्याचांदीच्या दराने फोडला सामन्यांना घाम, भाव वाचून उडेल झोप

नागरिकांनो लक्ष द्या ! देशात आजपासून बदलणार ‘हे’ नियम; LPG सिलिंडर हवा असेल तर आता…
2

नागरिकांनो लक्ष द्या ! देशात आजपासून बदलणार ‘हे’ नियम; LPG सिलिंडर हवा असेल तर आता…

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा
3

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा
4

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.