आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया (एएम/एनएस इंडिया) या आर्सेलरमित्तल आणि निप्पॉन स्टील या जगातल्या दोन आघाडीच्या स्टील उत्पादक कंपन्यांनी मॅग्नेलिस® या जागतिक मान्यताप्राप्त स्टील ब्रँडची घोषणा केली असून त्याचा गंज चढण्याबाबत उत्तम प्रतिरोध आहे आणि स्वतःहून दुरूस्त होण्याची क्षमता आहे.
या नावीन्यपूर्ण स्टील ब्रँडचे उद्घाटन मुंबईत झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात झाले. मॅग्नेलिस® – हा आर्सेलर मित्तलचा पेटंटप्राप्त ब्रँड असून त्याचे उत्पादन आणि वितरण आता भारतात होऊ लागले आहे. त्यामुळे देशाच्या आयात स्पेशालिटी स्टील उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करून नूतनक्षम ऊर्जांसारख्या महत्त्वाच्या तसेच वाढीची मोठी क्षमता असलेल्या क्षेत्रांसाठी पुरवठा कार्यक्षमता वाढीस लागेल.
आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया (एएम/एनएस इंडिया)चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप उमेन म्हणाले की, “भारतात मॅग्नेलिस®चे अनावरण हे आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नात योगदान देत असताना उच्च कामगिरी स्टीलची देशाची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या जागतिक दर्जाच्या आयातीऐवजी देशांतर्गत असलेल्या स्टीलची निर्मिती करून आम्ही दर्जेदार पायाभूत सुविधा उपाययोजना तर देत आहोतच पण त्याचबरोबर भारताच्या स्वच्छ ऊर्जा बदलाला वेग देण्यासाठी योगदान देत आहोत. मॅग्नेलिस® हे शाश्वत साहित्याचे भविष्य आहे आणि त्याचा समावेश हे देशाच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरते.”
मॅग्नेलिस® या विशेष सोल्यूशनने जागतिक सौर प्रकल्पांमध्ये आपली कामगिरी सिद्ध केली आहे
आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (एएम/एनएस इंडिया)चे विक्री आणि मार्केटिंग विभागाचे संचालक आणि उपाध्यक्ष श्री. रंजन धार म्हणाले की,“भारतात मॅग्नेलिस® चे अनावरण हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण आहे. कारण या विशेष सोल्यूशनने जागतिक सौर प्रकल्पांमध्ये आपली कामगिरी सिद्ध केली आहे आणि ५० जीडब्ल्यू स्थापित क्षमतेचे योगदान दिले आहे. नवीन उत्पादनांची निर्मिती झाल्यामुळे डिलिव्हरीचा वेळ कमी होईल आणि लॉजिस्टिक्सचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल. त्यामुळे भारत आपल्या राष्ट्र उभारणीच्या कार्यात एक पाऊल पुढे टाकत असताना देशांतर्गत ग्राहकांना आपल्या पायाभूत सुविधांच्या गरजांसाठी वेगवान आणि अधिक कार्यक्षमता उपाययोजना मिळतील. इतर अंतिम वापराच्या क्षेत्रांमध्ये रस्ते पायाभूत सुविधा (क्रॅश बॅरियर्स), कृषी पायाभूत सुविधा (ग्रेन सिलोज, शेती उपकरणे) आणि बांधकाम (आधीच तयार केलेल्या इमारतीच्या संरचना) यांचा समावेश आहे.”
मॅग्नेलिस® हे एक अद्ययावत संयुग कोटेड स्टील ब्रँड आहे. त्यात झिंक, अॅल्युमिनियम आणि मॅग्नेशियमची विशेष रचना आहे. त्यातून अद्वितीय घर्षण प्रतिरोध आणि स्वतःहून दुरूस्त होणारे घटक मिळतात. यापूर्वी हे उच्च दर्जाचे मूल्यवर्धित स्टील प्रामुख्याने कोरिया, जपान आणि चीनमधून आयात केले जात असे. त्याला डिलिव्हरीसाठी अनेक महिने लागत असत.
मॅग्नेलिस®साठी सुमारे १००० कोटी रूपयांची गुंतवणूक
एएम/एनएस इंडियाने मॅग्नेलिस®साठी एक उत्पादन वाहिनी स्थापित करण्यासाठी सुमारे १००० कोटी रूपये गुंतवले आहेत. हजिरा गुजरात येथील त्यांच्या मालकीच्या कारखान्यात वार्षिक ५ लाख टन क्षमता आहे. एएम/एनएस इंडियाने सौर प्रकल्पांना पुरवण्यात येणाऱ्या स्टीलसाठी ५० टक्क्यांपेक्षा जास्त देशांतर्गत बाजारवाटा ताब्यात घेण्याचे नियोजन केले आहे. कठीण वातावरणात या उत्पादनाची सिद्ध झालेली कामगिरी तिला सौर पॅनल माऊंटिंग यंत्रणा तसेच इतर नूतनक्षम ऊर्जा उपयोजनांसाठी आदर्श बनवते. या योजना भारताच्या ऊर्जा बदलासाठी एकात्मिक असतील. एएम/एनएस इंडिया सध्या भारतातील नूतनक्षम ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांना मॅग्नेलिस®चा पुरवठा करण्यासाठी चर्चा करत आहे. त्यात अदानी ग्रीन एनर्जी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसी यांचा समावेश आहे. या भागीदारींमुळे मॅग्नेलिस® हा देशभरात नूतनक्षम प्रकल्पांच्या पुढील पुढीच्या उभारणीत महत्त्वाचा टप्पा ठरेल.