Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

Oil Politics: अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी जाहीर केले आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाविरुद्ध निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला पाठिंबा दर्शविला आहे, ज्यामध्ये रशियावर ५०० टक्के कर लादले जातील.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 08, 2026 | 09:39 AM
Trump approves bill to impose 500% tax on Russia targeting India China and Brazil

Trump approves bill to impose 500% tax on Russia targeting India China and Brazil

Follow Us
Close
Follow Us:
  •  ट्रम्प प्रशासनाने रशियातून आयात होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांवर ५००% पर्यंत आयात शुल्क लादण्याच्या विधेयकाला (Sanctioning Russia Act 2025) हिरवा कंदील दिला आहे.
  •  रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे सुरूच ठेवल्यास भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांवर कठोर आर्थिक निर्बंध आणि प्रचंड आयात शुल्क लावले जाईल, अशी स्पष्ट धमकी अमेरिकेने दिली आहे.
  •  ट्रम्प यांनी स्वतः कबूल केले आहे की, अमेरिकेने लादलेल्या उच्च करांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या त्यांच्यावर नाराज आहेत, मात्र रशियन तेल खरेदी थांबवण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

Trump 500 percent tariff Russia bill : जागतिक राजकारणात सध्या एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाच्या विरोधात आतापर्यंतचे सर्वात कठोर पाऊल उचलले आहे. रशियाची युद्धयंत्रणा कमकुवत करण्यासाठी ट्रम्प यांनी ‘सँक्शनिंग रशिया ॲक्ट २०२५’ (Sanctioning Russia Act 2025) या द्विपक्षीय विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकाचा सर्वात मोठा फटका केवळ रशियालाच नाही, तर रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारत, चीन आणि ब्राझील यांसारख्या देशांनाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रशियावर ५००% कराचा ‘इकोनॉमिक बंकर बस्टर’

अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी जाहीर केले की, ट्रम्प यांनी या विधेयकावर मोहोर उमटवली आहे. या कायद्यांतर्गत रशियातून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांवर किमान ५००% आयात शुल्क (Tariff) लादले जाईल. ग्राहम यांनी या विधेयकाला “इकोनॉमिक बंकर बस्टर” असे संबोधले आहे. हे विधेयक केवळ रशियाला रोखण्यासाठी नसून, रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल आणि युरेनियम खरेदी करणाऱ्या देशांना शिक्षा देण्यासाठी वापरले जाणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump: ‘जर आपण हरलो, तर ते मला सोडणार नाहीत!’; अमेरिकन रिपब्लिकन खासदार ‘असा’ करणार डोनाल्ड ट्रम्पचा गेम ओव्हर

भारतावर काय होणार परिणाम?

भारतासाठी ही बातमी अत्यंत चिंताजनक आहे. अमेरिकेने यापूर्वीच भारतीय वस्तूंवर सुमारे ५०% कर लादला आहे, ज्यापैकी २५% कर हा थेट रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दलच्या दंडाच्या स्वरूपात आहे. नव्या विधेयकानुसार, जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे पूर्णपणे बंद केले नाही, तर हे शुल्क ५०० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. याचा थेट परिणाम भारताच्या निर्यातीवर आणि देशांतर्गत महागाईवर होईल.

Trump greenlights Russian sanctions bill, says US Senator Graham, that paves way for 500% tariff on countries importing energy from Moscow. The Senator points out that the bill will ‘incentivize’ China, India and Brazil to stop ‘buying the cheap Russian oil’ pic.twitter.com/mcZOyJJtcp — Sidhant Sibal (@sidhant) January 8, 2026

credit : social media and Twitter

पंतप्रधान मोदी नाराज; ट्रम्प यांची कबुली

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हाऊस जीओपी मेंबर रिट्रीट’मध्ये बोलताना सांगितले की, “पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत, पण सध्या ते माझ्यावर नाराज आहेत.” ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेने लादलेल्या प्रचंड करामुळे भारताची आर्थिक कोंडी होत आहे. “मोदींना मला खुश करायचे आहे, त्यांनी रशियन तेलाची आयात काही प्रमाणात कमीही केली आहे, पण जोपर्यंत ते पूर्णपणे रशियाची साथ सोडत नाहीत, तोपर्यंत आम्ही कर कमी करणार नाही,” अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी आपली भूमिका मांडली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War: ‘शस्त्रे सोडली होती, पण आता पुन्हा उचलेन’ Maduro अटकेनंतर आता या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांचाही ट्रम्पला युद्धाचा इशारा

युक्रेन शांतता चर्चेचा दबाव

हे विधेयक अशा वेळी समोर आले आहे जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की शांतता चर्चेसाठी अमेरिकन शिष्टमंडळाची भेट घेत आहेत. ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ या वाटाघाटीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. रशियावर आर्थिक दबाव वाढवून पुतिन यांना वाटाघाटींच्या टेबलावर आणणे, हा ट्रम्प यांचा मुख्य उद्देश असल्याचे दिसून येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'सँक्शनिंग रशिया ॲक्ट २०२५' काय आहे?

    Ans: हे एक अमेरिकन विधेयक आहे ज्यामध्ये रशियातून आयात होणाऱ्या वस्तूंवर ५००% कर लावण्याची आणि रशियाकडून ऊर्जा खरेदी करणाऱ्या देशांवर (उदा. भारत, चीन) कठोर निर्बंध लादण्याची तरतूद आहे.

  • Que: ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या नाराजीबद्दल काय म्हटले?

    Ans: ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेने रशियन तेलाच्या मुद्द्यावरून भारतीय वस्तूंवर उच्च कर लादल्यामुळे पंतप्रधान मोदी त्यांच्यावर नाराज आहेत, मात्र त्यांनी भारताने तेल आयात कमी केल्याचे मान्यही केले आहे.

  • Que: भारतावर या कराचा काय परिणाम होईल?

    Ans: जर हे विधेयक अमलात आले, तर अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या भारतीय वस्तूंवर प्रचंड कर लागेल, ज्यामुळे भारतीय कंपन्यांचे नुकसान होईल आणि व्यापारात घट होईल.

Web Title: Trump approves bill to impose 500 tax on russia targeting india china and brazil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • india
  • Russia

संबंधित बातम्या

ट्रम्प यांचा जगाला मोठा झटका! UN सह ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिकेची एक्झिट
1

ट्रम्प यांचा जगाला मोठा झटका! UN सह ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिकेची एक्झिट

व्हेनेझुएलाच्या बदल्यात रशियाला मिळणार होता ‘हा’ देश; अमेरिकेशी केला होता गुप्त करार
2

व्हेनेझुएलाच्या बदल्यात रशियाला मिळणार होता ‘हा’ देश; अमेरिकेशी केला होता गुप्त करार

ट्रम्पचा व्हेनेझुएलावर दबाव वाढला! ‘या’ देशांसोबत आर्थिक संबंध तोडण्याचा दिला अल्टीमेटम
3

ट्रम्पचा व्हेनेझुएलावर दबाव वाढला! ‘या’ देशांसोबत आर्थिक संबंध तोडण्याचा दिला अल्टीमेटम

डोनाल्ड ट्रम्पने दिला भारतीय विद्यार्थ्यांना झटका! US मध्ये स्टुडंट-वर्क व्हिसावर सक्ती
4

डोनाल्ड ट्रम्पने दिला भारतीय विद्यार्थ्यांना झटका! US मध्ये स्टुडंट-वर्क व्हिसावर सक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.