Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…

तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया खात्यांच्या संपर्कात राहून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 06, 2026 | 07:38 PM
सावधान! 'या' देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच...

सावधान! 'या' देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच...

Follow Us
Close
Follow Us:

इराणमध्ये परिस्थिती अधिक तणावपूर्ण
भारताने जारी केली ट्रॅव्हल ॲडव्हायजरी
गेल्या अनेक दिवसांपासून इराणमध्ये संघर्ष

नवी दिल्ली: इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सध्या इराणमध्ये असलेल्या आणि तिकडे प्रवासास जाण्याचा विचार करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधिकृत प्रवास मार्गदर्शक सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायजरी) जारी केल्या आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील सद्यस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराणचा कोणताही बिगर-जरुरी प्रवास टाळावा. जे भारतीय नागरिक कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी सध्या इराणमध्ये वास्तव्य करत आहेत, त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः ज्या भागात हिंसक आंदोलने किंवा मोठी गर्दी जमली आहे, अशा ठिकाणांपासून भारतीयांनी लांब राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

भारत सरकारने इराणमधील भारतीयांना स्थानिक बातम्या आणि घडामोडींवर सतत लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. तसेच, तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया खात्यांच्या संपर्कात राहून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

Venezuela त होणार निवडणुका? Maduro च्या कोर्टात सुनावणीनंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा

जे भारतीय नागरिक निवासी व्हिसावर तिथे राहत आहेत आणि ज्यांनी अद्याप दूतावासाकडे आपली नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने आपली माहिती नोंदवावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे सोपे होईल. इराणमध्ये गेल्या आठवडाभरात सरकारविरोधी आंदोलन सुरु असून, आंदोलक आणि सुरक्षा दलांमधील चकमकी वाढल्या आहेत. या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

Venezuela त होणार निवडणुका?

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने अटक केली आहे. सध्या ते अमेरिकेच्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर ड्रग्ज तस्करीचा, दहशतवादी संघटनांना मदत केल्याचा आणि दक्षिण अमेरिकेमधून अमेरिकेत तस्करीचे जाळे उभारल्याचे आरोप अमेरिकेने केले आहेत. दरम्यान त्यांच्या अकटकेनंतर व्हेनेझुएलात सत्ता बदल झाला असून उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज देशाचा कारभार तात्पुरत्या काळासाठी संभाळणार आहे. mनुकतेच मादुरो यांना अमेरिकेने सुनावणीसाठी न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात हजर केले होते. यावेळी मादुरो यांनी ते निर्दोष असल्याचा आणि अजूनही व्हेनेझुएलाचे अध्यक्ष असल्याचा युक्तिवाद केला आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून १७ मार्च २०२६ ला पुढील सुनावणी होणार आहे.

Web Title: Indian government issued travel advisory for people visit to iran world marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • india
  • Indian government
  • iran
  • World news

संबंधित बातम्या

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात
1

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?
2

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?

‘… तर NATO संपेल’ ; ग्रीनलँडवरील ट्रम्पच्या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा थेट इशारा 
3

‘… तर NATO संपेल’ ; ग्रीनलँडवरील ट्रम्पच्या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा थेट इशारा 

Operation Sindoor ने घाबरला होता पाकिस्तान; सीजफायरसाठी अमेरिकेकडे कोटींची लॉबिंग, रिपोर्टमध्ये खुलासा
4

Operation Sindoor ने घाबरला होता पाकिस्तान; सीजफायरसाठी अमेरिकेकडे कोटींची लॉबिंग, रिपोर्टमध्ये खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.