
डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची नवराष्ट्रशी विशेष संवाद
भारत-अमेरिका संबंधांवर केले भाष्य
भारताच्या परराष्ट्र धोरणावर देखील केले भाष्य
सोनाजी गाढवे /पुणे: जागतिक राजकारणातील वाढते तणाव, अमेरिकेची आक्रमक धोरणे, ग्लोबल साऊथमधील घडामोडी, तसेच भारताच्या शेजारील देशांतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र धोरण अधिक महत्त्वाचे ठरत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय, अमेरिका- भारत संबंध, रशिया- युक्रेन युद्ध, सार्क- बिम्स्टेकचा बदलता पट आणि भारत- चीन संबंधांवरील परिणाम याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी ‘नवराष्ट्र’शी सखोल संवाद साधला.
१) डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनुझुआला देशावर केलेला हल्ला, राष्ट्राध्यक्षांना घातलेल्या बेड्या जागतिक पटलावर वाढलेल्या तणावाची नांदी आहे का ?
हा पूर्णपणे नवसाहतवादाचा प्रकार आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्पष्टपणे उल्लंघन झालेलं आहे युनायटेड देशाची मान्यता असलेला व्हेनुझुआला हा देश सार्वभौम देश आहे. असे असताना देखील एखाद्या सार्वभौम देशांमध्ये युनायटेड देशाची परवानगी न घेता हस्तक्षेप करणे, त्याचप्रमाणे देशाच्या राष्ट्राध्यक्षाला बेड्या घालणे यामधून अतिशय भयानक प्रवाह जागतिक राजकारणावर येऊ शकतात उद्या अशाच पद्धतीत अनुकरण इतर देशांकडून केले जाऊ शकते. अशा प्रकारची परिस्थिती दुसऱ्या महायुद्धापूर्वी होती त्याच मधून हिटलर आणि मुसोलिनी तयार झाले त्यामुळे ही एका मोठ्या संघर्षाची नांदी आहे.
२) अशा परिस्थितीत अमेरिका आणि भारताच्या संबंधांकडे कसे पाहता ? ( ट्रम्प यांनी लादलेला आयतकर आणि आत्मनिर्भर या दृष्टीने)
डोनाल्ड ट्रम्प यांनी लाभलेला आयातकर आपल्या विरुद्ध लावलेले ५० टक्के आहे. आपण कृषी वरती २५ टक्के आयात शुल्क, रशियाकडून तेल घेतो त्यासाठी पंचवीस टक्के ॲडिशनल पेनल्टी समर्थांमध्ये केलेला आहे. ही एका प्रकारचे शिक्षा आहे हा आर्थिक निर्बंधाचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे आणि तो देखील विश्वव्यापार संघटनेने केलेल्या नियमांच्या विरोधात जाणार आहे विश्व व्यापार संघटनेचे नियमानुसार ज्या ज्या देशांनी परस्पर मध्ये मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा दिलेला आहे त्यांना अशा स्वरूपाने कोणतेही प्रकारे आयात शुल्क वाढ करता येत नाही तोपर्यंत विश्व व्यापार संघटनेची परवानगी नसेल हे धोरण अतिशय चुकीचं आहे त्यांना वाटलं की भारत अडचणीत मधी येईल तसं काही घडलेलं नाही भारताच्या साधारणता ३२ अब्ज डॉलरचे गुड्स व्यापार याच्यामुळे बाधित झाला होता तो ३२ अब्ज डॉलाराच्या त्यांच्यामध्ये चार सेक्टर होते त्यात सेक्टर ऑटो पार्टस, जेम्स आणि ज्वेलरी, गारमेंट आणि लेदर, कृषी आणि डेली प्रॉडक्ट आपण आता चारही सेक्टरला डायव्हर्ट केल.
दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च
इनपुट कमी आणि एक्स्पोर्ट मध्ये वाढ
दरम्यान काळात आपण इंग्लंड सोबत फ्री ट्रेड एग्रीमेंट केला ओमान बरोबर केला इंग्लंड बरोबर केला आता आपण रशिया मार्केट आहे आफ्रिका मार्केट आहे या ठिकाणी वाढलेले आहे आपण इतर ठिकाणी वाढत आहोत आता ऑस्ट्रेलिया १ जानेवारीपासून मुक्त व्यापार करार ऑस्ट्रेलिया केला आहे. आता मात्र, भारतासाठी व्यापार तूट कमी झालेली आहे साधारणता ४१ डॉलरवरून व्यापार तूट आता २५ अब्ज डॉलर वरती आलेली आहे त्यामुळे आपला इनपुट कमी झाला आहे आणि एक्स्पोर्ट वाढला आहे नोव्हेंबर २०२५ पर्यंत आपला जो एक्स्पोर्ट होता महिन्याला ३८ अब्ज डॉलर होता आपण त्याचा पूर्णपणे उत्तर अमेरिकेला दिलेले आहे.
३) ग्लोबल साऊथ म्हणजे काय… बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळसारख्या आपल्या शेजारच्या देशातल्या गोंधळात भारतचे परराष्ट्र धोरण कसे असणार ?
ग्लोबल साऊथ म्हणजे पूर्वीचे थर्ड वर्ल्ड किंवा डेव्हलपिंग वर्ल्ड देश असून त्यात आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील बहुसंख्य राष्ट्रांचा समावेश होतो. हे देश वसतवादातून मुक्त झाले असून आल्पतावादी चळवळीचे सदस्य राहिले आहेत. आज त्यांच्या ऐकीला मोठे महत्त्व आहे आणि भारत त्यांचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करीत आहे. २०२३ मधील भारतातील जी-२० परिषदेत आफ्रिकन युनियनला सदस्यत्व देणे हे याचे उदाहरण आहे. शेजारी देशांतील अस्थिरतेत काही भारतविरोधी घटक सक्रिय असले तरी देश भारतविरोधी नाहीत. चीनकडून वाढणारे कर्ज व प्रकल्प भारतासाठी आव्हान असून विश्वास वाढवण्यासाठी भारताने आर्थिक मदत व प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे आहे.
४)सार्कचे महत्त्व कमी होत का चालले आहे आणि बिम्स्टेकचे महत्त्व वाढत का चालले आहे?
सार्कही १९८५ ला संघटना प्रादेशिक पातळीवरची संघटना होती ड्रेड बॉल्क म्हणून पुढे आलेली संघटना होती परंतू साऊथ एशिया मधल्या राष्ट्रामधले व्दिपक्षीय तनाव त्याचे परिणाम सार्क मध्ये पडायलागले आहेत त्यात विशेष भारत आणि पाकिस्तान त्या प्रतिबिंब पाहीला मिळतात सार्कचे कोणतेही निर्णय पुर्णत्वास आलेले नाहीत. साफ्टा, साफ्ता कोणतेही पुर्णत्वास येऊ शकले नाहीत प्रतेकवेळी पाकीस्तान कडून आडमुठे धोरण घेतल आहे. त्यानंतर सार्कसंघाटना आली त्या भारताने कनेक्टेविटी चा नारा दिला होत परंतू त्याच्या मध्ये फारस काही होऊ शकल नाही बिम्स्टेक त्याच्यातला सब गृप म्हणून पुढे आलेला आहे. बिम्स्टेकच्या माध्यमातू आपन बगतो की बांगलादेश, म्यानमार, नॉर्थइस्टच्या विकासासाठी बांगलादेशासोबत ड्रेड वाढावा या कारणान त्यात बिम्स्टेकच महत्व वाढताना दिसत आहे. त्यामुळे सार्कच पुर्रजिवण होण फार कठीण आहे. बिम्स्टेक किंवा अशा प्रकारचे सब गृप पुढे वाढू शकतात त्याच्या माध्यामातून व्यापार हितसबंध जोपासूशकतो विशेष म्हणजे भारताला वेगळा काही फायादा नाही परंतू शेजारी देशाला भारताचा फायदा होत आहे.
Nicolas Maduro : ‘मी निर्दोष आहे…’ ; हातकड्यांमध्ये मादुरो न्यूयॉर्कच्या कोर्टात हजर
५)भारताच्या शेजारील देशांतील आंतरिक विवादांचा भारत–शेजारी संबंधांवर कसा परिणाम होतो?
-भारताची अंतरीक सुरक्षा हि आपल्या शेजारील देशाच्या अंतर्गत सुरेक्षेसी जोडलेला आहे. शेजारील देशा मध्ये शांतता असेल तर स्वभावीक पणे भारत सुध्दा शांतता असेल हे भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उदिष्ट आहे. भारताचा प्रर्यंन्त जवळील देशात शांतता आणि स्थेर्यां राहो यासाठी भारत हा सतत्यांने प्रयन्तशिल आहे. आता जी शेजारील देशातील अस्थिरता आहे ती आर्थीक परस्थिर खराब आहे त्यामुळे आहेत. भ्रष्टाचार, घराणेशाही, लोकशाही स्थिर नाही हे त्याचे मुळ कारण आहे शेजारी देशासाठी राजकीय, आर्थिक परस्थिती साठी भारताने वेळोवेळी शेजारील देशाला त्यांच्या खराब काळात मदत सुध्दा केली आहे.
६) रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक भू-राजकारणात कोणते मोठे बदल झाले आहेत. याचा काय परिणाम झालेला आहे?
याचा परिणाम स्पष्ट पणे दिसून येत आहे रशिया–युक्रेन युद्ध सोडवण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे अपयशी आहेत. त्यासाठी काही प्रमाणात भारताला जबबदार धरल्या जात मात्र, भारत रशीया कडून तेल खरेदी करत असल्यामुळे रशीयाच युध्द धोरण चालू आहे. त्यासाठी २५ टक्के आयात कर, रशीया बरोबरचा सर्व व्यापार बंद करावेत त्यासाठी अमेरीकेकडून दबाव टाकत आहे. येत्या काळात भारत रशीया कडून खरेदी कमी करु शकतो भारत आणि अमेरीका मध्ये जो तनाव आहे निश्चीतच रशिया–युक्रेन युद्ध मुळेच आहे. भरताने ठरवल आहे की, हे युध्द शांततेने सुटावे भारताने पर्यंत करत आहे.
७) एस.सी.ओ. शिखर परिषदेतील भारताच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीनंतर भारत–चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत का?
भारत चीनच्या बाबतीत काही सकारात्मक बदल दिसून येतात ते म्हणेजे भारत आणि चीन मध्ये २०२१ पासून विमान सेवा ठेट नव्हती ती आता चालू झाली आहे. अनेक चीनी प्रकल्प प्रलंबीत होते आता त्यानां मान्यात मिळाली आहे. चीनची गुनतवनुक वाढली आहे. भारत आणि चीन चा मुख वाद हा आता फक्त सिमा वाद आहे.