
Maharashtra Police Recruitment: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
वर्षभर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. आता पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यामुळे आता तरुणींच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरणार नाही. पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीच्या दिवशी संबंधित तरुणीला मासिक पाळी असल्यास तिला काही दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे. या निर्णयामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणींना मोठा दिलासा मिळाला. यासाठी नेमके नियम आणि अटी काय आहेत, ते जाणून घ्या. Maharashtra Police Recruitment:
पोलीस भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. अनेक वेळा तरुणींना शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी येते. त्यामुळे वर्षभर केलेली मेहनत वाया जाते. पण आता यापुढे असं होणार नाही. कारण शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मैदानावरच्या आरोग्य पथकाच्या तपासणीनंतर तरुणीला 5 ते 6 दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे.
त्यानंतर तिची शारीरिक चाचणी घेतली जाईल. मासिक पाळीदरम्यान होणारी तीव्र पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, अशक्तपणा आणि चक्कर यामुळे अनेक तरुणींना धावण्यासह इतर शारीरिक चाचण्यांमध्ये आपली चांगली कामगिरी करता येत नव्हती. तरुणींच्या याच नैसर्गिक अडचणीची गंभीर दखल घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही मोठी घोषणा केली.
एवढंच नाही तर आरोग्य तपासणीच्या आधारे उमेदवाराची परिस्थिती बघून त्यानंतर तिला जास्त वेळ देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे संबंधित तरुणींनी अशा वेळी भरती प्रक्रियेतले अधिकृत नियम आणि सूचना पाळणं महत्त्वाचं राहणार आहे. एखाद्या महिला उमेदवाराची परिस्थिती जास्त मुदत देण्याची असल्यास त्याचाही विचार केला जाणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे ही सुविधा नेमक्या कोणत्या भरती प्रक्रियेला लागू आहे, आरोग्य तपासणी कोण करणार आणि मुदतवाढ मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रं द्यावी लागतील, याबाबतची सविस्तर अधिकृत माहिती उमेदवारांनी संबंधित भरती प्राधिकरणाकडून तपासून घ्यावी लागणार आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या तरुणींनी शारीरिक चाचणीची तारीख, लागणारी कागदपत्रं आणि आरोग्य तपासणीबाबतचे नियम यांची माहिती अधिकृत वेबसाईटवर बघावी.
टाटा समूहात मोठ्या घडामोडी! TATA Son’sचा वाद सुरू असतानाच ट्रस्टचे 5 महत्त्वाचे निर्णय
म्हणजे थोडक्यात, आता मुलींना पाळीच्या टेंशनमुळे ग्राउंडवर कमी पडायची भीती राहणार नाही. सरकारने हा निर्णय घेऊन मुलींना खरंच मोठा आधार दिला. तयारी चालू ठेवा, संधी वाया घालवू नका.