Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : पहाटे दाट धुके तर दुपारी कडक उन्ह अन् रात्री पुन्हा थंडी; राज्यात संमिश्र हवामान

पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पहाटे गारवा, तर दुपारी उन्हाचा चटका जाणवेल. काही ठिकाणी दुपारनंतर किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ होऊ शकते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 21, 2026 | 07:45 AM
Weather Update : पहाटे दाट धुके तर दुपारी कडक उन्ह अन् रात्री पुन्हा थंडी; राज्यात संमिश्र हवामान

Weather Update : पहाटे दाट धुके तर दुपारी कडक उन्ह अन् रात्री पुन्हा थंडी; राज्यात संमिश्र हवामान

Follow Us
Follow Us:
  • राज्यात थंडीची प्रतीक्षा कायम; पहाटे धुके, दुपारी उन्हाचा चटका
  • नोव्हेंबरमध्येही थंडी गायब? राज्यात तापमानाचा चढ-उतार सुरूच
  • गुलाबी थंडीऐवजी दुपारी उन्हाचा तडाखा; हवामान विभागाचा नवा अंदाज

पुणे : सध्या नोव्हेंबर महिना सुरु आहे. तरीही अपेक्षित असा गारठा अद्याप अनुभवायला मिळत नाही. राज्यात सध्या हवामानाचे संमिश्र स्वरूप पाहायला मिळत आहे. पहाटेच्या वेळी गुलाबी थंडीचा अनुभव येत असतानाच दुपारच्या सत्रात उन्हाचा चटका जाणवत आहे. त्यात भारतीय हवामान विभागाने राज्यातील हवामानाबाबत अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार, कोकणापासून विदर्भापर्यंत राज्याच्या बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पहाटे अनेक ठिकाणी धुके आणि गारवा जाणवेल, तर दुपारी तापमानात वाढ होऊन उष्णता कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पहाटे गारवा, तर दुपारी उन्हाचा चटका जाणवेल. काही ठिकाणी दुपारनंतर किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ होऊ शकते. पुण्यात किमान तापमान 14 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. असे जरी असले तरी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामानाचा कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.

याशिवाय, मुंबईसह परिसरात सकाळच्या वेळी धुके किंवा धूसर वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहील. त्यामुळे कोकणात पावसाची शक्यता नसून कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये किमान तापमान 12 अंश, तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. या विभागातही हवामान विभागाने कोणताही विशेष इशारा दिलेला नाही.

उबदार कपड्यांचा वापर करा

राज्यात सध्या पावसापासून दिलासा कायम असून पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचा अनुभव नागरिकांना येणार आहे. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा, तसेच दुपारच्या उन्हापासून बचाव करण्याची काळजी घ्यावी.

FAQ

1. नोव्हेंबर महिन्यातही राज्यात अपेक्षित थंडी का जाणवत नाही?

राज्यात सध्या तापमानात चढ-उतार होत असून पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे.

2. राज्यातील हवामान कसे राहणार आहे?

कोकणापासून विदर्भापर्यंत बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

3. पहाटेच्या वेळी हवामान कसे असेल?

पहाटे अनेक ठिकाणी धुके आणि गुलाबी थंडी जाणवण्याचा अंदाज आहे.

Web Title: Mixed weather in maharashtra sometimes cold sometimes hot nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 07:45 AM

Topics:  

  • Climate Change
  • maharashtra news
  • Weather Update

संबंधित बातम्या

Jalgaon News: यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट! अवैध सावकारी, दारू, सट्टा अन् वाळू वाहतुकीने नागरिक त्रस्त
1

Jalgaon News: यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट! अवैध सावकारी, दारू, सट्टा अन् वाळू वाहतुकीने नागरिक त्रस्त

Satara News: साताऱ्यात घर खरेदीसह गुंतवणुकीची संधी; साताऱ्यात २६ नोव्हेंबरपासून ‘रचना २०२६’ प्रदर्शन!
2

Satara News: साताऱ्यात घर खरेदीसह गुंतवणुकीची संधी; साताऱ्यात २६ नोव्हेंबरपासून ‘रचना २०२६’ प्रदर्शन!

Mumbai Railway Demolition: मुंबईत पुन्हा बुलडोजर ॲक्शन! प्रभादेवीत १०० कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर,पाहा photos
3

Mumbai Railway Demolition: मुंबईत पुन्हा बुलडोजर ॲक्शन! प्रभादेवीत १०० कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर,पाहा photos

Weather Update : अर्धा नोव्हेंबर महिना संपला तरीही गुलाबी थंडीची अद्याप प्रतिक्षाच; तापमानात चढ-उतार सुरूच
4

Weather Update : अर्धा नोव्हेंबर महिना संपला तरीही गुलाबी थंडीची अद्याप प्रतिक्षाच; तापमानात चढ-उतार सुरूच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.