
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
जळगाव साफसफाई व कचरा संकलन करणारा मक्तेदार बी.व्ही.जी. कंपनीचे काम असमनाधाकारक असतांनाही प्रशासना त्यांचा मक्ता का रदद करत नाही? असा सवाल उपस्थित करून स्थायी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी प्रशासकिय अधिकाऱ्यावर आसूड ओढले. स्थायी समितीची सभा आज सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. Jalgaon News:
व्यासपिठावर अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, पंकज गोसावी, संजय राऊत, नगरसचिव मनोज शर्मा, शहर अभियंता आर. टी. पाटील, मुख्य लेखाधिकारी राजू लाकुडझोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ उपस्थित होते. स्थायी समितीच्या सूरुवातीला सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय तसेच १२ ते ३१ ऑक्टोबरदरम्यानच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांचा अद्ययावत अहवालाची माहिती घेण्यात आली. याशिवाय ऑगस्ट महिन्यातील अग्निशमन विभागाचा आगीच्या घटनांचा अहवाल व साप्ताहिक लेखापरीक्षण अहवालाची माहिती घेण्यात आली.
नळांना वॉटर मिटर बाबत प्रश्न उपस्थित केला. मिटर बसविण्याचे काम व्यवस्थित न होणे, कमी दाब वेण्यासह आदी स्थायी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी स्थायी सदस्य अॅड. पोकळे यांनी थेट हे मीटर बसविण्याच्या कामात मोठा गैरव्यवाहर होत असून पुढील बैठकीत या वॉटर मीटरच्या सर्व लेखाजोखा व माहिती सभेपुढे सादर करण्याच्या सूचना दिल्या.
बीव्हीजी कंपनीकडून कचरा संकलनाचा क्यूआर कोड स्कॅनचे काम किती होत आहे? कचरा संकलन करतांना कर्मचारी माती, दगड भरून कचर्याचे वजन वाढविण्याचा प्रकार वारंवार समोर येत आहे. तसेच दिवाळीत अचानक कचरा संकलनात कशी वाढ झाली याबाबत विष्णू भंगाळे, अॅड, दिलीप पोकळे, नितीन सपके, दिपक सूर्यवंशी व नितीन लड्डा यांनी सभेत विचारणा करून संताप व्यक्त केला. दिवाळीत शहरात कचरा संकलन कसे वाढले याची देखील विचारणा केली.
Jalgaon News: जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी, मेळाव्यातच नेत्यांमध्ये खडाजंगी
यावेळी उपायुक्त निर्मला गायकवाड यानी कचरा संकलनात मक्तेदारांकडून अतिरिक्त वाहन लीवल असल्यान कचरा संकलनात वाढ झालेली आहे असे सांगितले. त्यावर सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. जर बी.व्ही.जी.चे काम समाधानकार नाही असे वारंवार सांगितले जात आहे. तरी प्रशासन त्याचा मक्ता का रद्द करीत नाही? अधिकारी सभेत उपस्थित राहतात. परंतु कोणतीही कार्यवाही करीत नाही. ते सभेत का उपस्थित राहतात? असा सवाल उपस्थित केला. आयुक्त स्थायी सभेत का उपस्थित राहत नाही असा सवालही त्यांनी केला.